पळून जाण्यासाठी साहाय्य नव्हे, तर दारूगोळा हवा आहे !

बायडेन यांनी झेलेंस्की यांना युक्रेनमधून सुरक्षित बाहेर काढण्यासाठी साहाय्य देऊ केले; मात्र झेलेंस्की यांनी रशियन सैनिकांचा प्रतिकार करण्याचा निर्धार व्यक्त केला, तसेच राजधानी कीवध्येच रहाणार असल्याचे ठामपणे सांगत अमेरिकेचे साहाय्य नाकरले.

जगाने दीर्घकाळ युद्धासाठी सिद्ध रहावे ! – फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी युरोपमधील स्थैर्य आणि शांतता यांवरच घाला घातला आहे. फ्रान्स आणि त्याचे सहकारी देश यांनी हे संकट टाळण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले; पण ते व्यर्थ ठरले.’’

५ लाख किलो वजनाचे आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक (स्पेस स्टेशन) भारतावर पाडायचे आहे का? – निर्बंधांवरून रशियाचा अमेरिकेला प्रश्‍न

अमेरिकने युक्रेन युद्धामुळे रशियावर निर्बंध लादल्यानंतर दिमित्रि रोगोजिन यांनी हा प्रश्‍न ट्वीट करून विचारला आहे.

युद्धातूनी शिकावे !

‘बळी तो कान पिळी’, हाच जगाचा नियम आहे. भारताच्या दृष्टीने विचार केल्यास पूर्वीचे राजे चक्रवर्ती होते आणि संपूर्ण पृथ्वीवर त्यांचे राज्य होते. इंग्रजांच्या काळात लचके तोडले गेले. एकाच वेळी चीन आणि पाकिस्तान यांना धूळ चारायची असेल, तर भारताने स्वयंसिद्ध होणे अपरिहार्य ! अशाने भारताला गतवैभव मिळवणे शक्य होईल !

रशियाने युक्रेनवर केलेले आक्रमण आणि त्याचे जगावर होणारे परिणाम

या युद्धामुळे पेट्रोल, डिझेल आणि वायू यांच्या किमती वाढतील. यावर भारत सरकार मार्ग काढेलच; पण प्रत्येकाने ‘देशभक्त नागरिक’ म्हणून भूमिका पार पाडणे आवश्यक आहे.

रशियाविरुद्धच्या युद्धात जगाने आम्हाला वार्‍यावर सोडले ! – युक्रेन

युक्रेनला साहाय्य करण्याचे आश्‍वासन देऊनही अमेरिका, युरोपीय देश आणि ‘नाटो’ देश यांच्याडून ऐनवेळी माघार

युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांकडून पुतिन यांना वाटाघाटीसाठी आमंत्रण

युक्रेनच्या या प्रस्तावावर रशियाचे परराष्ट्र मंत्री सेर्गेई लावरोव्ह यांनी ‘युक्रेनच्या सैन्याने लढाई थांबवल्यासच आम्ही चर्चा करू’, असे म्हटले आहे.

युद्धाचा अपलाभ उठवत चीनकडून भारतविरोधी कुरघोडीची शक्यता !

अशा कुरापतखोर चीनला भारताने रशियाप्रमाणे आक्रमकपणे उत्तर देणे अपेक्षित आहे !

पुतिन यांच्या विरोधात रशियातील ५१ शहरांत आंदोलन : १ सहस्र ४०० आंदोलकांना अटक !

युक्रेनवरील आक्रमणाच्या निषेधार्थ रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्या विरोधात रशियातील ५१ शहरांमध्ये आंदोलन करण्यात आली. पोलिसांनी हे आंदोलन चिरडून टाकण्याचा प्रयत्न करत १ सहस्र ४०० आंदोलकांना कह्यात घेतले.

रशियाचे सैन्य युक्रेनची राजधानी कीवपासून अवघ्या १० कि.मी. अंतरावर !

कोणत्याही क्षणी राजधानी कीव रशियाच्या नियंत्रणात जाण्याची शक्यता आहे. रशियाने भूमीवरून, सागरी मार्गाने आणि आकाश मार्गाने युक्रेनवर आक्रमण केले आहे. रशियाचे तब्बल १ लाख सैन्य युक्रेनमध्ये घुसले आहे.