(म्हणे) ‘१२ टक्के मुसलमान समाजाने ठरवले, तर इथले सैन्यही काहीच करू शकणार नाही !’

राष्ट्र्रीय स्वयंसेवक संघ ही देशातील एक आतंकवादी संघटना असून ते शस्त्रांची पूजा का करतात ? पोलीस, लष्कर असतांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला शस्त्रांची आवश्यकता काय ? यांना कोणापासून सुरक्षा हवी आहे ?

असदुद्दीन ओवैसी आणि प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा रहित करा !

२५ जानेवारी या दिवशी शहरातील राजवाडा परिसरातील गांधी मैदान येथे एम्आयएम् पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी आणि भारिप बहुजन महासंघाचे प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे.

(म्हणे) ‘सत्तेवर आलो तर सरसंघचालकांना तुरुंगात टाकू !’ – प्रकाश आंबेडकर

आम्हाला सत्ता मिळाल्यास ३ महिन्यांत अवैधपणे एके-४७ बाळगल्याच्या प्रकरणात सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांना कारागृहात डांबू. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शासनदरबारी कुठलीही नोंदणी नाही.

साम्यवादी आणि मुसलमान संघटना यांच्याकडून संभाजीनगर येथील सभेसाठी विखारी भाषणे देणारे कन्हैयाकुमार यांना आमंत्रण

येथील आमखास मैदानात ९ डिसेंबर या दिवशी सायं. ६ वाजता देशद्रोही विधाने करणारा जे.एन.यू.तील विद्यार्थी संघटनेचा माजी अध्यक्ष कन्हैयाकुमार याला बोलावण्यात आले आहे.

(म्हणे) ‘सनातन संघटनेकडून शस्त्रप्रशिक्षण दिले जाते !’ – प्रकाश आंबेडकर यांचा जावईशोध

सनातन संघटनेकडून शस्त्रप्रशिक्षण दिले जाते. तसा त्यांचा ‘ट्रेनिंग फोर्स’ कार्यरत आहे; मात्र याकडे लक्ष दिले जात नाही, असा जावईशोध भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी लावला.

आंबेडकरांचे नक्षली संबंध न्यायालयातच सिद्ध होतील ! – सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे

भारिप-बहुजन पक्षाचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांचे नक्षलवाद्यांशी असलेले संबंध आता न्यायालयातच सिद्ध होतील. त्यांचे नक्षलवाद्यांशी संबंध आहेतच; पण सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने त्यावर भाष्य करणार नाही….. – सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे

चौकशी आयोगासमोर प्रकाश आंबेडकर यांनी हिंदुत्वनिष्ठांवर दोषारोप टाळले !

कोरेगाव भीमा येथे १ जानेवारीला उसळलेल्या दंगलीसाठी मुख्यमंत्री, गृहराज्यमंत्री, सचिव, केंद्रीय गुप्तचर यंत्रणा, तसेच पालकमंत्री उत्तरदायी असल्याचे प्रतिपादन भारिप बहुजन महासंघाचे प्रकाश आंबेडकर यांनी चौकशी आयोगासमोर केले.

(म्हणे) ‘मित्रपक्ष एम्.आय.एम्.प्रमाणे आमचाही ‘वन्दे मातरम्’ला विरोध !’ – अधिवक्ता प्रकाश आंबेडकर

राष्ट्रगीत म्हणणारे सर्वच जण भारतीय आहेत. त्यामुळे मित्रपक्ष एम्.आय.एम्.प्रमाणे ‘वन्दे मातरम्’ला आमचाही विरोध आहे, असे मत भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष अधिवक्ता प्रकाश आंबेडकर यांनी परभणीमध्ये झालेल्या एका पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केले.

हा क्रांतीकारकांचा अवमान नाही का ?

‘राष्ट्रगीत म्हणणारे सर्वच जण भारतीय आहेत. मित्रपक्ष एम्.आय.एम्.प्रमाणे आमचाही ‘वन्दे मातरम्’ला विरोध आहे’, असे विधान भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष अधिवक्ता प्रकाश आंबेडकर यांनी परभणीतील एका पत्रकार परिषदेत केले.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now