भेसळ करणार्‍या पेट्रोलपंपाला जिल्हाधिकार्‍यांनी टाळे ठोकले !

सांगली-माधवनगर रस्त्यावर नवीन बायपास चौकात असणार्‍या मातोश्री  पेट्रोल पंपावर जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील यांनी धाड टाकली. या वेळी पेट्रोल-डिझेल यांमध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ, घनता आणि मापात अनेक त्रुटी असल्याचे उघड झाले.

एक सामाजिक चिंतन : खोले बाई आणि दांभिकांचा समाज !

डॉ. मेधा खोले यांनी त्यांच्याकडे स्वयंपाक करणार्‍या महिलेच्या विरुद्ध जात लपवून फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केल्याप्रकरणी सामाजिक संकेतस्थळावरील खालील उपरोधिक लिखाण वाचनात आले.

एका नामांकित रुग्णालयाकडून आधुनिक वैद्यांना लाच दिली जाणे

जुलै २०१७ मध्ये एका नामांकित रुग्णालयाचा एक प्रतिनिधी मला भेटायला माझ्या चिकित्सालयात आला. त्याने मला एक बंद लखोटा दिला. मी त्याला याविषयी विचारल्यावर तो म्हणाला, तुम्ही आमच्या रुग्णालयात दिलेल्या सेवेचे पैसे आहेत. त्यावर मी त्याला सांगितले, मी तुमच्या रुग्णालयात सेवा दिली नाही.

सोलापूर येथे ‘माहिती अधिकाराचा वापर कसा करावा’ याविषयी कार्यशाळेद्वारे मार्गदर्शन

सामाजिक दुष्प्रवृत्तीच्या विरुद्ध संघटित होऊन वैध मार्गाने कृती करणे हाच सुराज्य स्थापनेचा राजमार्ग आहे. सध्या लाचखोर शासकीय कर्मचारी, तसेच अधिकारी सर्वसामान्य जनतेची अडवणूक करून अन्यायच करत आहेत.

खोटे खोटे वृक्षप्रेम !

मध्यंतरी पुणे महानगरपालिकेने रोप संकलन, स्लाईड शो, व्याख्याने, वृक्षारोपण अशा उपक्रमांद्वारे जागतिक पर्यावरणदिन साजरा केला. पर्यावरणदिनानिमित्त वृक्षसंवर्धन आणि वृक्षलागवड करण्याच्या पुन्हा आणाभाका घेऊन काही रोपट्यांची लागवड केली गेली.

बांधकाम व्यवसायातील भ्रष्ट साखळी तुटेल का ?

घाटकोपर येथे नुकतीच इमारत कोसळून १७ निष्पाप जणांचा जीव गेला. नर्सिंग होमची दुरुस्ती करतांना चक्क इमारतीच्या पायावरच घाव घातल्यामुळे ही घटना घडली. मुळात पाहिले, तर सगळेच कारभारी व्यवस्थेच्या मुळावरच घाव घालत आहेत, असे लक्षात येईल.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now