(म्हणे) ‘गोव्यात धर्मांतरविरोधी कायद्याची आवश्यकता नाही !’ – मायकल लोबो, विरोधी पक्षनेते

गोव्यात न्यूनतम १ लाख ५० सहस्र लोकांचे धर्मांतर केले गेले आहे. १५ लाख लोकसंख्या असलेल्या गोव्यातील ही संख्या विरोधी पक्षनेत्यांना अल्प वाटते का ? कि ते पास्टर डॉम्निक याच्या धर्मांतराच्या कारवायांना पाठिंबा देत आहेत ?

पास्टर डॉम्निक याच्या विरोधात अन्वेषण चालूच रहाणार ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

उठसूठ कुठल्याही प्रकरणात हिंदु संतांना आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करून त्यांच्याविरोधात सातत्याने गरळकओक करणारी प्रसारमाध्यमे हिंदूंना आमिषे दाखवून त्यांचे बलपूर्वक धर्मांतर करणार्‍या पाद्र्याच्या कृतीविषयी अवाक्षरही काढत नाहीत !

धर्मांतरविरोधी कायदा हवाच !

धर्मांतर रोखण्यासाठी प्रसंगी हिंदुत्वनिष्ठांना पोलिसांचा मार खाणे, कारागृहात जाणे अशा दिव्यांना सामोरे जावे लागते. तरीही धर्मांतर रोखण्याचे कार्य ते इमानेइतबारे करतात.

हिंदूंना अल्पसंख्यांक करण्याचा प्रयत्न ख्रिस्ती मिशनरी करत आहेत ! – इस्टर धनराज, अध्ययनकर्त्या, ख्रिश्चन स्टडीज्, तेलंगाणा

भारतात आलेल्या ईस्ट इंडिया कंपनीच्या काळापासून ते आतापर्यंत ख्रिस्ती मिशनर्‍यांनी स्थापन केलेल्या कॉन्व्हेंट शाळांमध्ये हिंदु विद्यार्थ्यांचे धर्मांतर करणे, हे एकच लक्ष्य राहिले आहे.

आसाममध्ये हिंदूंचे धर्मांतर करण्यासाठी ख्रिस्ती धर्मप्रसारकांकडून पारंपरिक बिहू नृत्य आणि संगीत यांचा वापर !

हिंदूंची संस्कृती आणि परंपरा यांचा वापर त्यांच्या धर्मांतरासाठी करणारे कावेबाज ख्रिस्ती ! अशांना ताळ्यावर आणण्यासाठी भारतभर कठोर धर्मांतरविरोधी कायदा राबवून ख्रिस्ती धर्मप्रचारकांवर कारवाई करणे आवश्यक !

आगामी पावसाळी अधिवेशनात राज्यात धर्मांतरविरोधी कायदा करणार ! – डॉ. प्रमोद सावंत  मुख्यमंत्री

गोव्यात धर्मांतराच्या कारवायांना थारा दिला जाणार नाही आणि यापुढेही कुठे धर्मांतराच्या विरोधात तक्रार आल्यास त्वरित कारवाई केली जाणार आहे !

डॉम्निकचे अड्डे आणि त्याचे सर्व आर्थिक व्यवहार यांचे अन्वेषण करावे !

डॉम्निक करत असलेल्या धर्मांतराच्या प्रकरणात निष्पक्ष कारवाई अपेक्षित असून त्याचे सर्व आर्थिक व्यवहार यांचे अन्वेषण केले जावे, अशी मागणी राष्ट्रीय बजरंग दलाचे गोवा प्रमुख नितीन फळदेसाई यांनी केली.

पास्टर डॉम्निक याच्यावरील कारवाईविषयी गोव्यातील हिंदुत्वनिष्ठांच्या प्रतिक्रिया

धर्मांतराच्या विरोधात कठोर कायदा केल्यावरच ख्रिस्ती मिशनरींच्या कुकृत्याला चाप बसेल !

पास्टर डॉम्निक याला जामीन संमत

राज्यात धर्मांतराच्या विरोधात कठोर कायदा नसल्यामुळेच पास्टर डॉम्निक याच्यासारख्यांचे फावते आहे ! अशांना आजन्म कारागृहात डांबण्यासाठी गोव्यातील आणि केंद्रातील भाजप सरकारने कठोर कायदा करावा, असे हिंदूंना वाटते !

हिंदूंचे धर्मांतर करणार्‍या पास्टर डॉम्निक याच्यावर कठोर कारवाई करावी ! – हिंदुत्वनिष्ठ संघटनांची प्रशासनाकडे मागणी

पास्टर डॉम्निक यांचा शिवोली येथे ‘पॅलेस’ उभारण्याच्या प्रकल्पाला मान्यता मिळाली आहे. त्यापूर्वीच पास्टर डॉम्निक याच्यावर कारवाई झाली हे बरे झाले अन्यथा हिंदूंचे धर्मांतर करणारा एक मोठा ‘पॅलेस’ शिवोली येथे उभा राहिला असता !