चक्रीवादळाच्या पार्श्‍वभूमीवर मालवण येथे ‘आपत्ती निवारण दला’चे पथक तैनात

मालवण येथे ‘राष्ट्रीय आपत्ती निवारण दला’ अर्थात ‘एन्.डी.आर.एफ्.’च्या च्या २३ सैनिकांचे पथक तैनात करण्यात आले आहे.

विदेशी गोमंतकियांनी सशुल्क अलगीकरणास नकार दिल्याने दाबोळी विमानतळावर गोंधळ

दुबई येथील ११० प्रवाशांना घेऊन एक विमान १ जून या दिवशी मध्यरात्री दाबोळी विमानतळावर उतरले.

कोलवा येथील श्री विठ्ठल-रखुमाई मंदिरात चोरी

ओडली, कोलवा येथील श्री विठ्ठल-रखुमाई मंदिराची अर्पणपेटी फोडून आतील रोख रक्कम पळवण्यात आली. या प्रकरणी कोलवा पोलिसांनी अज्ञातांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे.

गोव्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत  

सोसाट्याच्या वार्‍यासह अविरत पावसामुळे गोव्यात अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडणे, रस्ता पाण्याखाली जाणे आणि वीजपुरवठा खंडित होणे, अशा घटना घडल्या. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले.

झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या बलीदान दिनानिमित्त पुणे येथे ऑनलाईन शौर्य जागरण उपक्रमाचे आयोजन

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जिल्ह्यातील सर्व धर्मप्रेमी महिलांसाठी झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या बलीदानदिनानिमित्त २९ मे या दिवशी ऑनलाईन शौर्य जागरण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

प्रश्‍न सोडवण्यास महाराष्ट्र सरकारने पुढाकार न घेतल्यास न्यायालयात जाणार ! – डॉ. सुजय विखे, खासदार

लष्कराच्या के.के. रेंज या युद्ध प्रशिक्षण आणि सराव क्षेत्राच्या विस्तारीकरणाचा विषय समोर आला आहे. मागील ३० वर्षांपासून महाराष्ट्र सरकार शेतकर्‍यांची दिशाभूल करत आहे, असा दावा खासदार डॉ. सुजय विखे यांनी केला आहे.

सोलापूर येथे १०५ इमारती धोकादायक

पावसाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर शहरात १०५ धोकादायक इमारती असून या इमारतींच्या मिळकतदारांना महापालिकेने नोटिसी बजावल्या आहेत.

सोलापूर जिल्ह्यामध्ये अलगीकरणात असतांना अन्यत्र फिरल्याप्रकरणी ३१ गुन्हे नोंद

३ मेपासून अन्य जिल्हा आणि राज्य येथून ४६ सहस्र ४३९ लोक सोलापूर ग्रामीण परिसरामध्ये आले आहेत. त्यांची वैद्यकीय पडताळणी करून अलगीकरण आणि संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले.

पुणे येथील अ‍ॅसिड गळती प्रकरणात गुन्हा नोंद

मुंबई-बेंगळुरू महामार्गावरील चांदणी चौकात २७ मे या दिवशी अ‍ॅसिटिक अ‍ॅसिड घेऊन जाणार्‍या टँकरमधून गळती झाली होती.

वास्को, गोवा येथे ५ सदस्यांचे कुटुंब आणि त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर कोरोनाबाधित

आईवडील, त्यांची २ मुले आणि एका मुलाची गर्भवती पत्नी मिळून ५ सदस्यांचे एक कुटुंब, तसेच त्यांच्यावर उपचार करणारे मांगोर हिल, वास्को येथील डॉक्टर प्राथमिक चाचणीत कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे.