वसई येथे ३० डिसेंबर या दिवशी ‘तोंडओळख साहसी खेळाची’ कार्यक्रमाचे आयोजन

‘अनुभूती’ आणि ‘पांचजन्य’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘तोंडओळख साहसी खेळाची’ या कार्यक्रमाचे आयोजन ३० डिसेंबर या दिवशी भुईगाव, वसई (प.) येथे आयोजित करण्यात आले आहे. हा कार्यक्रम सकाळी ९ ते सायंकाळी ६ या वेळेत होणार आहे.

नागपूर जिल्ह्यातील टेकेपार ग्रामवासियांचे बेमुदत ‘जलसत्याग्रह’ आंदोलन चालू !

गोसेखुर्द प्रकल्पांतर्गत कुही तालुक्यातील बाधित टेकेपार गावातील गावकर्‍यांनी गेल्या २ दिवसांपासून आम नदीतील जलाशयात ‘बेमुदत जलसत्याग्रह आंदोलन’ चालू केले आहे. शासनाने पुनर्वसन नियमबाह्यरित्या केल्याचा आरोप प्रकल्पग्रस्तांनी केला आहे.

वडार समाजातील युवकांसाठी १०० कोटींची तरतूद ! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

भारतात विश्‍वकर्म्याचे काम करणार्‍या वडार समाजाचे स्वातंत्र्यलढाईत मोठे योगदान आहे. ज्यांनी आम्हा सर्वांची घरे बांधली त्यांना उघड्यावर ठेवणार नाही. वडार समाजासाठी पंतप्रधान आवास योजनेतील अडीच लाखांसह आणखी दोन लाखांचे अनुदान त्यांना घर बांधण्यासाठी दिले जाईल………………..

केरळमधील हादियाच्या वडिलांचा भाजपमध्ये प्रवेश

केरळमध्ये स्वतःची मुलगी हादिया उपाख्य अखिला अशोकन् ही ‘लव्ह जिहाद’ची बळी ठरली असल्याचा दावा करणारे तिचे वडील के.एम्. अशोकन् यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

गोवारी समाजाचे आदिवासी जमातीत उल्लेख करण्यासाठी आंदोलन

गोवारी ही आदिवासी जमात असल्याचा स्पष्ट निर्वाळा ४ मासांपूर्वी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाने दिला होता. त्यानंतरही शासन गोवारी समाजाला आदिवासी मानायला सिद्ध नसल्याच्या निषेधार्थ आदिवासी गोवारी जमात संघटन समन्वय समितीने येथील शहिद गोवारी स्मारक परिसरात १५ डिसेंबरपासून अन्नत्याग आणि देहत्याग आंदोलन चालू केले आहे.

नवी मुंबई येथे जगद्गुरु अनंत श्री विभूषित विधुशेखरभारती महाराज यांचा दर्शन सोहळा !

श्री श्री जगद्गुरु शंकराचार्य महासंस्थान दक्षिणाम्नाय श्री शारदापीठ  शृंगेरी जगद्गुरु शंकराचार्य अनंत श्री विभूषित भारतीतीर्थ महाराज यांचे उत्तराधिकारी शिष्य शृंगेरी जगद्गुरु अनंत श्री विभूषित विधुशेखरभारती महाराज यांचा दर्शन सोहळा नवी मुंबई येथील एस्आयईएस् महाविद्यालयात पार पडला.

धारदार शस्त्राने खून करून गुन्हेगाराचे पलायन

१७ डिसेंबर या दिवशी सायंकाळी ७.३० वाजता किरकोळ भांडणातून नाज्या राजेखान भोसले याने बजरंग पुजारी याच्या डोक्यात खुर्ची घालून आणि धारदार शस्त्राने वार करून त्याचा खून केला. खून केल्यानंतर भोसले याने पलायन केले असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

शिवशाहीप्रमाणे आता ‘विठाई’ या नावाने एस्टीच्या बसगाड्या धावणार !

प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रीद असलेली एस्टीची बसगाडी आता ‘विठाई’ या विशेष नावाने निर्मित होत आहे. प्रासंगिक कराराच्या अंतर्गत प्रवाशांना पंढरपूर येथे जाण्यासाठी एसटी प्रशासनाचे १ सहस्र बसगाड्या बनवण्याचे उद्दिष्ट आहे.

नंदुरबार येथे श्री एकमुखी दत्त यात्रेस प्रारंभ !

सारंगखेडा येथील दत्तजयंतीला होणार्‍या श्री एकमुखी दत्ताच्या यात्रेस १२ डिसेंबरपासून प्रारंभ झाला आहे. या यात्रेला ३५० वर्षांची परंपरा आहे. राज्याच्या पर्यटन विभागाने यात्रेला देशभरात प्रसिद्धी दिली आहे.

अंधेरी (मुंबई) येथील कामगार रुग्णालयात भीषण आग !

अंधेरी येथील कामगार रुग्णालयात १७ डिसेंबर या दिवशी दुपारी ४.०५ मिनिटांनी अतीदक्षता विभाग आणि शस्त्रकर्म विभाग असलेल्या चौथ्या मजल्यावर भीषण आग लागली.


Multi Language |Offline reading | PDF