हुपरी (कोल्हापूर) शहरातील आरोग्य केंद्रात सुविधा उपलब्ध करून देण्याची नगराध्यक्षांची मागणी
जिल्ह्यातील हुपरी शहरात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या पार्श्वभूमीवर येथील आरोग्य केंद्रात रॅपिड टेस्टिंग किटची सुविधा आणि स्वॅब कलेक्शन केंद्र तात्काळ उपलब्ध करून देण्याची मागणी नगराध्यक्षा सौ. जयश्री गाट यांनी केली आहे.