पंढरपूर येथे अवैध वाळू वाहतुकीवर महसूल प्रशासनाची कारवाई !

पंढरपूर तालुक्यातील अवैध वाळू उपसा रोखण्यासह वाळूची अवैध वाहतूक करणार्‍यांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आणि प्रांताधिकारी सचिन इथापे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार सचिन लंगुटे यांनी पथकांची  नेमणूक केली आहे.

गुळण्या करतांना हटकल्याने हत्येचा प्रयत्न !

सिंहगड रस्ता भागात अल्पवयीन मुलाला गुळण्या करतांना हटकल्याने अल्पवयीनाने ज्येष्ठ नागरिकाच्या डोक्यात दगड मारला. हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी १६ वर्षांच्या मुलाला कह्यात घेतले आहे. या प्रकरणी समीर चौधरी यांनी पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली.

मिरज येथे छत्रपती शिवराय सांस्कृतिक मंडळाकडून २७ सप्टेंबरपासून व्याख्यानमाला !

येथील छत्रपती शिवराय सांस्कृतिक मंडळाच्या वतीने दिवंगत दामूअण्णा मोरेश्वर भट (मास्तर) स्मृती व्याख्यानमालेचे २७ सप्टेंबरपासून येथील ब्राह्मणपुरीमधील मुक्तांगण सभागृह, खरे मंदिर येथे आयोजन करण्यात आले आहे. मंडळाचे हे १३ वे वर्ष आहे.

नौसेना दिनानिमित्त करण्यात आलेल्या खर्चात कोणताही गैरव्यवहार नाही ! – प्रशासनाची स्पष्टोक्ती

मालवण येथे डिसेंबर २०२३ मध्ये झालेल्या नौसेना दिनाच्या कार्यक्रमासाठी प्रशासकीयदृष्ट्या खर्चाची तरतूद करण्यासाठी विशेष गोष्ट म्हणून शासनास प्रस्ताव सादर करण्यात आला होता.

१५ महिन्यांत धावणार पनवेल ते कर्जत लोकल

पनवेल ते कर्जत रेल्वे लिंक रोड १५ महिन्यांत कार्यान्वित होणार असून नवीन उपनगरीय रेल्वे कॉरिडॉरच्या बोगद्यातून रूळ टाकण्याच्या कामास प्रारंभ झाला आहे.

जात पडताळणी समितीचा जातवैधता प्रमाणपत्र रहित करण्याचा निर्णय न्यायालयाकडून अवैध !

जात पडताळणी समितीने ऐनवेळी बर्वे यांचे २८ मार्च या दिवशी जातवैधता प्रमाणपत्र रहित केल्यामुळे त्यांना लोकसभा निवडणूक लढवता आली नाही.

तासिका तत्त्वावरील शिक्षकांची मानधनात वाढ करण्याची मागणी

तासिका तत्त्वावरील शिक्षकांना अंगणवाडी शिक्षिका आणि सफाई कामगार यांच्यापेक्षा अल्प मानधन असल्याने उदरनिर्वाहाची मोठी समस्या निर्माण झाली आहे.

तिरुपती येथील प्रसादाच्या लाडूंत प्राण्यांच्या चरबीचे तेल मिसळणार्‍यांवर गुन्हे नोंदवा !

या वेळी महाराष्ट्र मंदिर महासंघाचे कार्यकर्ते आणि हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते. तहसीलदारांच्या माध्यमातून निवेदनाची प्रत पंतप्रधान नरेंद्र मोदी, तसेच आंध्रप्रदेश राज्याचे मुख्यमंत्री यांना देण्यात आली. 

जगभरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धकौशल्याचा विद्यापीठ स्तरावर अभ्यास चालू ! – ज्येष्ठ पत्रकार सुधीर जोगळेकर

आज संपूर्ण जग छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धकौशल्याचा विद्यापिठाच्या स्तरावरून अभ्यास करत आहे.

तिरुपती मंदिरातील प्रसादाच्या लाडूंमध्ये चरबीयुक्त तेल मिसळणार्‍यांवर कारवाई करावी !

अशी मागणी का करावी लागते ? प्रशासनाला ते लक्षात येत नाही का ?