कराड येथील प्राचीन मंदिर परिसरातील कचरा त्‍वरित हटवण्‍यात यावा ! – स्‍थानिक भक्‍तांची मागणी

असे निवेदन का द्यावे लागते ? प्रशासनाला दिसत नाही का ? कि प्रशासन कर्तव्‍यचुकारपणा करत आहे, हे वरिष्‍ठ अधिकार्‍यांनी पहाणे आवश्‍यक !

सातारा जिल्‍ह्याला विद्यार्थ्‍यांच्‍या गणवेशासाठी सहा कोटी रुपये !

राज्‍य शालेय शिक्षण विभागाने विद्यार्थ्‍यांना गणवेश, बूट आणि पायमोजे वितरणासाठी सातारा जिल्‍ह्यास अनुमाने ६ कोटी ८३ लाख रुपये दिले आहेत. केंद्रशासनाच्‍या ‘समग्र शिक्षा अभियान’ अंतर्गत ही योजना राबवण्‍यात येत आहे.

अमली पदार्थांपासून विद्यार्थ्‍यांना परावृत्त करण्‍यासाठी ‘दप्‍तर तपासणी मोहीम’ ! – राहुल रेखावार, जिल्‍हाधिकारी, कोल्‍हापूर

मेकॉलेप्रणित शिक्षणप्रणालीचा परिणाम ! तात्‍पुरत्‍या आनंदासाठी मुले अमली पदार्थांच्‍या आहारी जात आहेत. मुलांना कायमस्‍वरूपी आनंद कसा मिळवायचा, हे लक्षात येण्‍यासाठी शाळेतून धर्मशिक्षण देणे आवश्‍यक !

दौंड (पुणे) येथे नैराश्‍यातून शिक्षकांची आत्‍महत्‍या !

आत्‍महत्‍येची गुप्‍तचर यंत्रणेकडून सखोल चौकशी करण्‍यात यावी. संबंधित अधिकार्‍यांवर कारवाई करण्‍यात यावी, अशी मागणी होत आहे.

वीरांच्‍या बलीदानाप्रती कार्यक्रम साजरे करा ! – सुनील पवार, आयुक्‍त, सांगली महापालिका

या प्रसंगी हातात दिवे लावून ‘पंचप्राण शपथ’ घेण्‍यात आली. या कार्यक्रमास उपायुक्‍त राहुल रोकडे, सभागृह नेत्‍या भारती दिगडे, नगरसचिव श्री चंद्रकांत आडके, ‘सिस्‍टीम मॅनेजर’ नकुल जकाते, नगरअभियंता पांडव, हळकुंडे उद्यानाचे अधीक्षक गिरीश पाठक, सर्व कर्मचारी, अधिकारी, तसेच जनसंपर्क अधिकारी धनंजय हर्षद उपस्‍थितीत होते.

लवकरच संत श्री बाळूमामा मंदिरात (आदमापूर) २४ घंटे ‘ऑनलाईन’ दर्शन चालू करणार ! – शिवराज नाईकवाडे, प्रशासक

या मंदिराचे वैशिष्‍ट्य म्‍हणजे हे मंदिर २४ घंटे भाविकांसाठी उघडे असते. ‘श्री महालक्ष्मीदेवीच्‍या कृपाछत्राखाली राहिल्‍यानंतर आता संत श्री बाळूमामा यांनीच मला येथे बोलावून घेतले’, अशी माझी श्रद्धा आहे. त्‍यामुळे भाविकांना ज्‍या सर्व सुविधा देणे अपेक्षित आहे, त्‍या सर्व सुविधा देण्‍याचा माझा प्रयत्न आहे.

वणी येथे रस्‍त्‍याचे काम निकृष्‍ट करूनही आस्‍थापनाकडून ५ कोटी रुपयांचे देयक !

नागरिकांना मागणी का करावी लागते ? प्रशासन स्‍वतःहून कारवाई का करत नाही ?

मुंबई-गोवा महामार्गाच्‍या दुरवस्‍थेविरोधात बोंबाबोंब आंदोलन !

या संदर्भात मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे, सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्‍हाण, पालकमंत्री उदय सामंत, खासदार सुनील तटकरे आणि खासदार श्रीरंग बारणे, महिला आणि बालकल्‍याण मंत्री अदिती तटकरे यांनाही संदेश पाठवण्‍यात आले.

विलंब झाल्‍यामुळे संतप्‍त प्रवाशांनी दिवा स्‍थानकावर लोकलगाडी रोखून धरली !

ही लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला निघाली होती; मात्र विलंब झाल्‍याने दिवा रेल्‍वेस्‍थानकावर प्रवाशांची गर्दी वाढली. अनेक प्रवासी रेल्‍वे डब्‍याला लोंबकळत असल्‍यामुळे काही महिलांनी मोटरमनच्‍या केबिनमध्‍ये शिरून लोकल थांबवायला लावली.

पुणे येथील भीमाशंकर मंदिर परिसरात भ्रमणभाषच्या वापरावर बंदी !

असा स्तुत्य निर्णय सर्वच मंदिर व्यवस्थापकांनी घ्यावा !