मुंब्रा येथे राज्य राखीव पोलीस दलाची तुकडी तैनात

राज्यात संचारबंदी असून ठाणे शहरात  ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे. नाकाबंदीही करण्यात येत आहे.

राज्यातील वीजदरात कपात करण्याचा शासनाचा निर्णय

राज्यशासनाने वीजदरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये घरगुती दरात ५ ते ७, व्यावसायिक दरात १० ते १२, तर औद्योगिक उपयोगाच्या दरात १० ते ११ टक्के कपात करण्यात येणार आहे.

ठाण्यातील जांभळी नाका येथील भाजी मंडई सेंट्रल मैदान येथे स्थलांतरित

कोरोनाचा प्रादुर्भाव आणि भाजी घेण्यासाठी जांभळी नाका येथील घाऊक बाजारात होणारी गर्दी यांमुळे ठाणे पश्‍चिम येथील सेंट्रल मैदान येथे हा भाजीबाजार स्थलांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ठाण्यात कोरोनाबाधितांची संख्या १० वर, तर ६३ जण अलगीकरण कक्षात !

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर ठाणे येथे २९ मार्चपर्यंत १ सहस्र ९७४ जणांची पडताळणी करण्यात आली आहे. यांपैकी ९६९ नागरिक विदेशातून आलेले असून त्यांच्या संपर्कात आलेल्या १ सहस्र ५ जणांचा त्यात समावेश आहे.

वरळीमधील कोळीवाड्यात कोरोनाचे ४ संशयित रुग्ण

वरळीमधील कोळीवाड्यात कोरोनाचे ४ संशयित रुग्ण आढळल्याने हा परिसर मुंबई पोलिसांकडून बंद करण्यात आला आहे. परिसरात ‘बॅरिकेट्स’ उभारले असून कुणालाही बाहेर येण्यास किंवा आतमध्ये जाण्यास मनाई करण्यात येत आहे.

विदर्भात बुलढाणा येथे कोरोनामुळे पहिला मृत्यू !

विदर्भात कोरोनामुळे ४५ वर्षीय व्यक्तीचा बुलढाणा जिल्ह्यात पहिला मृत्यू झाला आहे. ‘न्यूमोनिया’ या आजारामुळे ही व्यक्ती खासगी रुग्णालयात उपचार घेत होती.

गरीब, कष्टकरी यांची तात्पुरती निवास आणि भोजन यांची व्यवस्था करा ! – शासनाचा जिल्हाधिकार्‍यांना आदेश

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांमुळे ज्या गरीब आणि गरजू नागरिक यांच्या भोजनाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे, त्यांच्या भोजनाची व्यवस्था करा.

अत्यावश्यक सेवा आणि वस्तू यांची वाहतूक करणार्‍या वाहनांना ई-पासची सुविधा उपलब्ध

देशभरात लागू असलेल्या दळणवळण बंदीच्या पार्श्‍वभूमीवर राज्यात अत्यावश्यक सेवा आणि वस्तू यांची वाहतूक करणार्‍या वाहनांना पोलीस यंत्रणेच्या वतीने ई-पास देण्यात येणार आहेत.

नाशिकमध्ये पहिला कोरोनाबाधित रुग्ण आढळला

जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील ३० वर्षांच्या तरुणाला कोरोनाची लागण झाली आहे. काही दिवसांपूर्वी पीडित तरुण लासलगाव येथे ग्रामीण रुग्णालयात उपचारांसाठी गेला असता ‘न्यूमोनिया’सदृश लक्षणे दिसत असल्यामुळे तो स्वत: उपचारांसाठी भरती झाला.

पुणे येथे कोरोनाग्रस्त व्यक्तीचा मृत्यू; रुग्ण अन्य अनेक व्याधींनी ग्रस्त

येथील दीनानाथ मंगेशकर या खासगी रुग्णालयात कोरोनाबाधित ५२ वर्षीय एका रुग्णाचा ३० मार्च या दिवशी मृत्यू झाला. ही व्यक्ती मधुमेह, उच्च रक्तदाब आणि फुफ्फुुसांच्या व्याधीने त्रस्त होती.