अकोला येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलनात वायूप्रदूषण करणार्‍या फटाक्यांवर बंदी घालण्याची धर्माभिमान्यांची मागणी

येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने वायूप्रदूषण करणार्‍या फटाक्यांवर केवळ दिवाळीतच नाही, तर नाताळ आणि ३१ डिसेंबरच्या काळातही बंदी घाला, पंढरपूर येथील झीज होणार्‍या श्री विठ्ठलाच्या मूर्तीवर रासायनिक लेपन न करता धर्मशास्त्रानुसार मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करावी

इतिहासाचे विकृतीकरण करणार्‍या संजय लीला भन्साळी यांना अटक करा ! – सौ. नयना भगत, प्रवक्त्या, रणरागिणी शाखा, हिंदु जनजागृती समिती

इतिहासातील प्रसंग चित्रपटांतून चुकीच्या पद्धतीने मांडल्याने पहाणार्‍यांना तेच सत्य वाटते आणि समाजात चुकीचा संदेश जातो.

ताजमहाल ही वास्तू इस्लामी थडगे कि हिंदु वास्तू आहे, हे सिद्ध होईपर्यंत तेथे चालू असलेले नमाजपठण बंद करावे ! – सौ. सुधा घाटगे, हिंदु जनजागृती समिती

कथित प्रेमाचे प्रतीक समजली जाणारी ताजमहाल ही वास्तू मुसलमानांची नसून हिंदूंची आहे. ही वास्तू ताजमहाल नामक मुमताजचे थडगे आहे कि हिंदु वास्तूकलेचा उत्कृष्ट नमुना आहे, याविषयीचा सत्य इतिहास समोर येण्यासाठी शासनाने त्वरित इतिहासतज्ञांची समिती नेमावी, तिचा अहवाल मागवावा.

महाराष्ट्रात ‘पद्मावती’ प्रदर्शित झाल्यास हिंदु समाज रस्त्यावर उतरेल ! – आमदार सुरेश भोळे

चित्रपटाच्या माध्यमांतून होणारा हिंदूंच्या देवता आणि राष्ट्रपुरुष यांचा अवमान आम्ही कदापी सहन करणार नाही. याविषयी १६ नोव्हेंबरला मी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन हा चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित होऊच नये, अशी विनंती केली आहे. पद्मावती चित्रपटातून हिंदूंच्या भावना दुखावण्यात आल्या आहेत. जळगाव शहरात हा चित्रपट चालू देणार नाही.

ताजमहाल येथील वास्तू ही हिंदु वास्तू आहे कि इस्लामी थडगे याचे संशोधन होईपर्यंत तेथील नमाजपठण बंद ठेवा !

हिंदु नेते आणि कार्यकर्ते यांवर सातत्याने होणारी आक्रमणे अन् त्यांच्या होणार्‍या निर्घृण हत्या यांमागील षड्यंत्राचे केंद्रीय अन्वेषण यंत्रणेकडून सखोल अन्वेषण केले जावे, अशा विविध मागण्या येथे घेण्यात आलेल्या राष्ट्रीय हिंदू आंदोलनात करण्यात आल्या.

पोलीस आणि प्रशासन यांनी वेळीच कारवाई न केल्यास हिंदुत्वनिष्ठ नायजेरियन नागरिकांना धडा शिकवतील ! – शिवकुमार पांडे, बजरंग दल

वसई, विरार क्षेत्रातील पोलीस ठाण्यांमध्ये नायजेरियन नागरिकांवर दखलपात्र गुन्ह्याची नोंद असतांनासुद्धा त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात येत नाही.

क्रूर टिपू सुलतानची जयंती नव्हे, तर क्रांतीकारकांच्या जयंत्या साजर्‍या करा ! – फुलचंद उबाळे, जिल्हा सचिव, उत्तर-पश्‍चिम मुंबई, भाजप

आज देशातील निरपराध हिंदूंना वेचून ठार मारले जात आहे; मात्र तरीही बहुसंख्य हिंदू झोपले आहेत. हिंदूंनी जागृत होणे आवश्यक आहे. ज्या क्रूरकर्मा टिपू सुलतानने हिंदूंच्या हत्या केल्या, त्या टिपूची जयंती का साजरी करायची ?

भारताच्या सुरक्षेला घातक असलेल्या रोहिंग्या मुसलमानांना त्वरित देशाबाहेर काढा ! – धर्मप्रेमी हिंदूंची एकमुखी मागणी

म्यानमार येथून विस्थापित झालेले रोहिंग्या मुसलमान देशाच्या अनेक राज्यांत घुसखोरी करून रहात आहेत. त्यांना देशात थारा देण्यात येऊ नये या मागणीसाठी हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने ३१ ऑक्टोबर या दिवशी बेळगाव येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले.

यवतमाळ येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन

रोहिंग्या मुसलमानांना देशाबाहेर हाकला, सिंहगड किल्ल्याच्या बांधकामात भ्रष्टाचार करणार्‍यांवर कायदेशीर कारवाई करावी, हिंदु धर्म, धर्मग्रंथ, देवता, संत यांच्यावर टीका करणारे कर्नाटक येथील प्रा. के. एस्. भगवान यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी या मागण्यांसाठी येथे २८ ऑक्टोबरला राष्ट्रीय हिंदू आंदोलन घेण्यात आले.

हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्‍यांना भारतात स्थान नाही ! – श्री. मुरलीकृष्णा हसंतडका, प्रांत गोरक्षा प्रमुख, बजरंग दल

हिंदु देवतांचा अवमान करून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्‍यांना भारतामध्ये स्थान नाही, असे प्रतिपादन बजरंग दलाचे प्रांत गोरक्षा प्रमुख तथा मंगळुरू विभाग संचालक श्री. मुरलीकृष्णा हसंतडका यांनी केले.


Multi Language |Offline reading | PDF