Ayodhya New Airport : ‘महर्षि वाल्मीकि अयोध्या धाम’ असे असणार अयोध्येतील विमानतळाचे नाव

श्रीराम आंतरराष्ट्रीय विमानतळाचे ‘महर्षि वाल्मीकि आंतरराष्ट्रीय विमानतळ अयोध्या धाम’ असे त्याचे नामकरण करण्यात आले आहे. आज पंतप्रधान मोदी करणार उद्घाटन ! याखेरीज अयोध्येच्या पुनर्विकसित रेल्वे स्थानकाचेही पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.

Ram Mandir Bell : श्रीराममंदिरात लावणार ६०० किलो वजनाची घंटा !

ही घंटा अष्टधातूंनी बनवण्यात आली आहे. यावर मोठ्या अक्षरांत ‘जय श्रीराम’ असे लिहिलेले आहे.

अयोध्येतील श्रीराममंदिरात ५ वर्षे वयाच्या प्रभु श्रीरामाची मूर्ती स्थापित होणार !

श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे चंपत राय यांनी श्रीराममंदिराच्या संदर्भात संपूर्ण माहिती नुकतीच पत्रकारांना दिली. ते म्हणाले की, ५ वर्षे वयाच्या प्रभु श्रीरामाची मूर्ती स्थापित केली जाणार आहे. ही मूर्ती देवाच्या बालस्वरूपातील असल्याने मंदिरात माता सीतेची मूर्ती नसेल.

Ayodhya Liquor Ban : अयोध्येतील ८४ कोस परिक्रमा मार्गावर मद्यबंदी !

या मार्गावर असणार्‍या दारूच्या सर्व ५०० हून अधिक दुकानांचे स्थानांतर करण्यात येणार आहे.

अयोध्येतील श्रीराम मंदिराची प्रतिकृती घराघरात पोचवण्यासाठी प्रयत्नरत ! – राजेश क्षीरसागर

अयोध्येत श्रीराम जन्मभूमीवर प्रभु श्रीराम मंदिराचे २२ जानेवारीला उद्घाटन होत आहे. या पार्श्वभूमीवर प्रत्येक नागरिकाला श्रीराम मंदिराची माहिती होण्यासाठी एका पुस्तिकेची निर्मिती केली आहे.

Ram Mandir : २९ डिसेंबरला होणार श्रीरामललाच्या मूर्तीची निवड

कांचीचे शंकराचार्य विजयेंद्र सरस्वती यांच्या सूचनेनुसार श्रीराममंदिर तीर्थक्षेत्र न्यासाचे एक पथक यांतील एक मूर्ती निवडणार आहे. दुसरी उत्सवमूर्ती म्हणून निवडली जाईल. ‘तिसरी मूर्ती कुठे ठेवायची ?’, हा निर्णयही याच दिवशी होणार आहे.

Ram Mandir VHP RSS : १ ते १५ जानेवारी या कालावधीत ६० कोटी लोकांना श्रीरामाचे चित्र आणि अक्षता देणार !

विहिंप आणि रा.स्व. संघ यांचे आयोजन !

Ram Mandir Ceremony : अयोध्येतील सर्व हॉटेल्स आणि अतिथीगृहे यांचे आरक्षण रहित !

आता २२ जानेवारीला केवळ तेच लोक अयोध्येला येऊ शकतील, ज्यांच्याकडे आयोजन समितीचे निमंत्रणपत्र असेल.

गुजरात ते अयोध्या पुन्हा रथयात्रा निघणार !

१९९० च्या दशकात निघाली होती रथयात्रा : जगभरात पोचले होते श्रीरामजन्मभूमी मुक्तीचे आंदोलन

Ayodhya Temple : श्रीराममंदिरात स्थापित होणार १ किलो सोने आणि ७ किलो चांदी यांपासून बनवलेल्या पादुका !

भाग्यनगरचे श्रीचल श्रीनिवास शास्त्री यांनी या चरणपादुका बनवल्या असून सध्या या पादुकांची देशभर मिरवणूक काढली जात आहे.