सद्गुरु राजेंद्र शिंदे यांच्या चरणी वाहिलेली शब्दसुमनांजली !

असे आहेत आपले सद्गुरु दादा ।
प्रीती, प्रेमभाव गुणांना नाही मर्यादा ॥ १ ॥

साधकांचे व्यष्टीसमवेतच समष्टी साधनेचे प्रयत्न तळमळीने आणि भावपूर्णरित्या होण्यासाठी त्यांना दिशा देऊन सर्वांगाने घडवणारे सद्गुरु राजेंद्र शिंदे !

सद्गुरु राजेंद्र शिंदे देवद आश्रमातील साधकांच्या व्यष्टी साधनेचा आढावा घेतात. सद्गुरु राजेंद्रदादा घेत असलेल्या आढाव्यांमुळे साधकांमध्ये लक्षणीय पालट होत असल्याचे जाणवत आहे. त्यांनी सांगितलेली ही सूत्रे सर्व साधकांपर्यंत पोचून त्याप्रमाणे त्यांनी स्वतःत पालट केल्यास सर्वजण आनंदी होतील.

देवद आश्रमाचा कायापालट करणार्‍यांपैकी एक असलेले सद्गुरु राजेंद्र शिंदे यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे आणि त्यांची लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये !

एखादी निर्जीव वस्तू, उदा. धातू, लाकूड, दगड इत्यादीपासून उत्तम शिल्प बनवणे, ही पुष्कळ कठीण गोष्ट आहे आणि त्यातही दैवी स्पंदने निर्माण करणारे शिल्प सिद्ध करणे, तर महाकठीण ! यासाठी शिल्पकारही दैवीच हवा.

सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी सांगितल्यानुसार स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया राबवल्यानंतर साधकाला झालेले लाभ !

स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन होण्यासाठी आपण स्वयंसूचना सत्रे करतो. त्यासह आपल्यातील स्वभावदोषाच्या विरोधातील गुण वाढवण्यासाठी आपण प्रयत्न केल्यास स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करणे सोपे होते.

सद्गुरु राजेंद्र शिंदे यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे अन् त्यांच्या संदर्भात आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती !

सद्गुरु राजेंद्र शिंदे दिवाळीनिमित्त सनातनच्या रामनाथी आश्रमात आले होते. मी सुमारे एक वर्षानंतर सद्गुरु राजेंद्रदादांना भेटले. त्यांनी माझ्या प्रकृतीची चौकशी करून मला सध्या होत असलेल्या त्रासांविषयी विचारले.

अध्यात्मप्रसाराचे गुरुकार्य सर्वत्र पोेचण्यासाठी नाविन्यपूर्ण संकल्पना राबवणारे आणि साधकांमध्ये साधनेची तळमळ जागृत करणारे सनातनचे ८ वे सद्गुरु राजेंद्र शिंदे !

सद्गुरु राजेंद्रदादा ठाणे सेवाकेंद्रात असतांना ते भ्रमणभाषवरून सतत साधकांच्या संपर्कात असायचे. त्या वेळी सेवाकेंद्राच्या खिडकीच्या ‘मार्बल’वर ते सेवेसंबंधी निरोप खडूने लिहून ठेवायचे. ते सेवा लगेच पूर्ण करून खडूने लिहिलेला निरोप पुसून टाकायचे.

रुग्णाइत असतांना साधिकेने अनुभवलेली सद्गुरु आणि संत यांची प्रीती !

‘३१.१०.२०१८ ते ९.१.२०१९ या कालावधीत मला पाठ आणि उजवा पाय यांमध्ये वेदना होत असल्यामुळे मी आजारी होते. त्या काळात मी रामनाथी आश्रमात होते. संतांच्या कृपेमुळेच आज मी चालू शकत आहे.

परात्पर गुरु डॉक्टरांच्या कार्यात सर्वार्थाने समर्पण करून त्यांची निस्सीम भक्ती करणारे परात्पर गुरु पांडे महाराज !

वेळ हे अमूल्य धन आहे. एकदा गेलेली वेळ पुन्हा कधीच येत नाही. त्यामुळे वेळेचा योग्य वापर होण्यासाठी परात्पर गुरु पांडे महाराज अखंड सेवारत रहायचे. अगदी पहाटे आणि सायंकाळी चालतांनाही ते त्यांच्या समवेत असलेल्या साधकाला चालू घडामोडी आणि साधना यांविषयी अमूल्य मार्गदर्शन करायचे.

परात्पर गुरु पांडे महाराज यांच्या दशक्रिया विधीच्या ठिकाणी सद्गुरु (श्री.) राजेंद्र शिंदे यांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

‘१२.३.२०१९ या दिवशी सनातनच्या देवद, पनवेल येथील आश्रमात परात्पर गुरु पांडे महाराज यांचा दशक्रिया विधी झाला. दुपारी २ वाजून ४० मिनिटांनी मी त्या ठिकाणी गेलो आणि साधारण ५ – ६ मिनिटे तेथे थांबलो. त्या वेळी मला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती पुढे देत आहे.


Multi Language |Offline reading | PDF