‘बदायू’चे पूर्वीचे नाव ‘वेदामऊ’ होते ! – योगी आदित्यनाथ

प्राचीन काळामध्ये ‘बदायू’चे नाव ‘वेदामऊ’ होते. ते वेदांच्या अध्ययनाचे स्थान होते. असेही म्हटले जाते की, गंगानदीला पृथ्वीवर आणणारे महाराजा भगीरथ यांनी येथेच तपस्या केली होती, असे प्रतिपादन उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले.

धार्मिक पर्यटनाला चालना देण्यासाठी रेल्वेच्या ‘श्री रामायण यात्रा’ विशेष रेल्वे गाडीला प्रारंभ !

आय.आर्.सी.टी.सी.ने (‘इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन’ने) धार्मिक पर्यटनाला चालना देण्यासाठी ‘श्री रामायण यात्रा’ रेल्वे गाडीची योजना आखली आहे. ही यात्रा ७ नोव्हेंबरपासून चालू करण्यात आली आहे.

आतंकवाद्यांना धर्म असतो, हे जाणा !

उत्तरप्रदेशातील महत्त्वाची ४६ रेल्वे स्थानके बाँबने उडवून देण्याची धमकी लष्कर-ए-तोयबाकडून देण्यात आली आहे. यानंतर राज्यातील सर्व रेल्वे स्थानकांवरील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांनाही ‘युनिव्हर्सल पास’ सक्तीचा !

मध्य आणि पश्चिम रेल्वे उपनगरीय मार्गावर दोन लसी घेतलेल्या एकूण २५ लाखांहून अधिक जणांनी मासिक पास घेतला आहे.

कोकण रेल्वेमार्गावरील प्रवासी वाहतूक पूर्ववत् करा अन्यथा ‘रेल्वे बंद’ आंदोलन करणार ! – राष्ट्रीय काँग्रेसची चेतावणी  

कोरोनाच्या कालावधीत कोकण रेल्वेमार्गावर काही विशेष गाड्या चालू करण्यात आल्या. या गाड्यांच्या तिकिटांचे दर नियमितच्या गाड्यांच्या तिकिटांपेक्षा अधिक आहे. आता कोरोनाचा संसर्ग उणावला असल्याने ‘विशेष रेल्वे’च्या नावाखाली चालू असलेली प्रवाशांची लूट थांबवून नियमितच्या गाड्या चालू कराव्यात अन्यथा…

कोकण रेल्वेमार्गावर कोकिसरे येथे भुयारी मार्गाच्या कामाला तब्बल १० वर्षांनंतर प्रारंभ होणार

कोकिसरे रेल्वे फाटकाजवळ मान्यता मिळालेल्या भुयारी मार्गासाठीच्या भूमी मोजणीच्या कामाचा शुभारंभ कोकिसरे येथे माजी आमदार जठार यांच्या हस्ते झाला.

मराठवाडा मध्य रेल्वेला जोडावे ! – संभाजीनगर येथील खासदारांची मागणी

‘मराठवाड्यात रेल्वेचे विविध प्रकल्प रखडलेले आहेत. छोट्या रेल्वे स्थानकांवर सुविधा मिळत नाहीत, तसेच कोरोनापूर्वी बंद झालेल्या रेल्वे पुन्हा चालू करण्यात आलेल्या नाहीत. यावरून नांदेड विभागावर अन्याय होत असल्याचे स्पष्ट होत आहे.

रायपूर (छत्तीसगड) रेल्वे स्थानकावरील स्फोटात सी.आर्.पी.एफ.चे ६ सैनिक घायाळ

रायपूर रेल्वे स्थानकावर एका रेल्वे गाडीमध्ये झालेल्या स्फोटात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (सी.आर्.पी.एफ.चे) ६ सैनिक घायाळ झाले. या रेल्वेतून दलाच्या २११ व्या बटालियनचे सैनिक जम्मूला जात होते.

लखनऊहून मुंबईला येणार्‍या ‘पुष्पक एक्सप्रेस’वर दरोडा

प्रवाशांची संख्या अधिक असूनही ते चोरट्यांसमोर काही करू शकले नाहीत ! प्रवाशांनी संघटितपणे चोरट्यांचा प्रतिकार केला असता, तर चोरटे काही करू शकले नसते.

१० ऑक्टोबरला मडगाव रेल्वेस्थानकानजीक ‘मेगाब्लॉक’ असल्यामुळे कोकण रेल्वेमार्गावरील ८ गाड्या रहित

दक्षिण-पश्चिम रेल्वे मडगाव रेल्वेस्थानकानजीक रेल्वेरुळांचे काम करण्यासाठी १० ऑक्टोबरला ‘मेगाब्लॉक’ घेणार आहे. या ‘मेगाब्लॉक’मुळे १० ऑक्टोबर या दिवशी कोकण रेल्वेमार्गावरून धावणार्‍या ८ गाड्या रहित करण्यात आल्या आहेत, तर काही गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे.