वेगवान प्रवासासाठी देशात आणखी ७ बुलेट ट्रेन प्रकल्प उभारणार !

देशात आणखी ७ ठिकाणी बुलेट ट्रेनचे प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. त्यांचा सविस्तर प्रकल्प अहवाल सिद्ध करण्यात येत असल्याची माहिती नॅशनल रेल्वे हायस्पीड कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक यांनी दिली.

कोल्हापूर येथे रेल्वेच्या डब्याला लागली आग !

‘शॉर्ट सर्किट’मुळे ही आग लागली होती आणि यात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. या आगीत रेल्वेचा डबा पूर्णपणे जळून गेला आहे.

बेंगळुरू येथील ५० वर्षे जुने श्री चामुंडेश्‍वरी देवस्थान अनधिकृत ठरवून पाडण्याचा रेल्वे अधिकार्‍यांचा प्रयत्न संघटित हिंदूंनी हाणून पाडला !

हिंदू संघटित झाल्यास काय होऊ शकते, याचे हे आणखी एक उदाहरण ! हिंदूंची मंदिरे अनधिकृत ठरवून पाडण्याचा प्रयत्न करणार्‍या रेल्वे अधिकार्‍यांवर कारवाई करा !

‘रामायण एक्सप्रेस’मधील वाढप्यांच्या (वेटर्सच्या) गणवेशात भारतीय रेल्वेकडून पालट !

भारतीय रेल्वेने ‘रामायण एक्सप्रेस’ गाडीतील वाढप्यांना (वेटर्सना) साधूंप्रमाणे गणवेश परिधान करण्यासाठी दिला होता. यास संत समाज, हिंदुत्वनिष्ठ आणि धर्माभिमानी हिंदू यांनी प्रखर विरोध केल्यानंतर अंततः रेल्वेने हा गणवेश पालटला.

‘रामायण एक्सप्रेस’मधील वाढप्यांसाठी (वेटरसाठी) असलेला साधूंचा वेश पालटणार ! – आय.आर्.सी.टी.सी.

हिंदूंच्या साधूंच्या होणार्‍या अवमानाच्या विरोधात आवाज उठवणारे सनातनचे साधक डॉ. अशोक शिंदे यांचे अभिनंदन ! सर्वच हिंदूंनी यातून बोध घ्यावा !

रेल्वे गाड्यांचे क्रमांक पालटल्याने गाडीचा क्रमांक शोधण्यासाठी प्रवाशांची धावाधाव !

कोरोनाचा संसर्ग अल्प झाल्याने रेल्वेनेही देशभरातील सर्व सेवा पूर्ववत् करण्याचा निर्णय घेतला आहे. लांब पल्ल्यांच्या सर्व गाड्यांचे क्रमांकही पालटले आहेत. त्यामुळे पूर्वीचे क्रमांक ठाऊक नसल्याने प्रवाशांची धावपळ होत आहे.

कार्तिकी यात्रेसाठी रेल्वेच्या ७ नव्या गाड्यांची व्यवस्था !

कार्तिकी यात्रेसाठी रेल्वेने लातूर-पंढरपूर, मिरज-पंढरपूर, लातूर-मिरज, बिदर-पंढरपूर-मिरज, अदिलाबाद-पंढरपूर, नांदेड-पंढरपूर आणि सांगली-पंढरपूर या नव्या रेल्वेगाड्या चालू करण्यात आल्या आहेत.

कोल्हापूर-सातारा पॅसेंजर १६ नोव्हेंबरपासून होणार चालू !  

पहिल्या टप्प्यात ८ डब्ब्यांची ‘डेमो’ रेल्वेगाडी सोडण्यात येणार असून प्रारंभी केवळ एकच फेरी होणार आहे. कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्या प्रवाशांनाच यातून प्रवास करता येणार आहे.

हबीबगंज (भोपाळ) येथील रेल्वे स्थानकाला ‘राणी कमलापती’ यांचे नाव देेणार

येथील हबीबगंज रेल्वे स्थानक नव्या रूपामध्ये सिद्ध झाले आहे. याचे उद्घाटन १५ नोव्हेंबर या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केले जाणार आहे. या रेल्वे स्थानकाला ‘राणी कमलापती’ नाव देण्यात येणार आहे.

कार्तिकी यात्रेसाठी पंढरपूर नगरपालिका प्रशासन सज्ज !

कार्तिक शुक्ल पक्ष एकादशी या दिवशी कार्तिकी यात्रा होणार असून या कालावधीत पंढरपुरात श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी भाविक मोठ्या प्रमाणात येतात. सर्व आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नगरपालिका प्रशासन सज्ज असल्याची माहिती मुख्याधिकारी यांनी दिली.