मालखेड (अमरावती) येथे मालगाडीचे २० डबे घसरले !

या अपघातामुळे ५६ गाड्यांच्या वाहतुकीवर परिणाम झाला असून १२ रेल्‍वेगाड्या रहित करण्‍यात आल्‍या आहेत, तर इतर गाड्यांचा मार्ग वळवण्‍यात आला आहे. सध्या रेल्वेकडून बचावकार्य चालू आहे. रेल्वे मार्ग अद्याप पूर्ववत् झालेला नाही.

ट्रॅकमन्समुळे रेल्वेचा अपघात टळला

कल्याण येथे जलद डाऊन मार्गावरील रेल्वेच्या रुळाला तडा गेल्याचे लक्षात आल्यानंतर कर्तव्यावर असलेल्या २ ट्रॅकमन्सनी (रूळ दुरुस्त करणारे कर्मचारी)  प्रसंगाचे गांभीर्य लक्षात घेत लाल सिग्नल दाखवून एक्सप्रेस थांबवण्याचा यशस्वी प्रयत्न केला.

वागळे (चाळीसगाव) येथे पाटलीपुत्र एक्सप्रेसचे डबे आणि इंजिन वेगळे झाले !

चाळीसगाव रेल्वे स्थानकाच्या जवळच्या वागळे गावाजवळ एक्सप्रेसचे डबे आणि इंजिन वेगळे झाले. या घटनेत कुठलीही जीवित किंवा अनुचित घटना घडलेली नाही.

मुंबईत लोकल रुळावरून घसरल्याने लोकलची सेवा २ घंटे विस्कळीत !

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल (सी.एस्.एम्.टी.) स्थानकामध्ये लोकल रुळावरून घसरल्याने २ घंटे हार्बर मार्गावरील लोकलची सेवा विस्कळीत झाली होती. सकाळी ९.४० ते दुपारी १२.११ या गर्दीच्या वेळेत प्रवाशांना मनःस्ताप सहन करावा लागला. सुदैवाने या घटनेत कुणीही घायाळ झाले नाही.

चीनमध्ये बुलेट ट्रेन रुळावरून घसरल्याने चालकाचा मृत्यू  

चीनच्या गुइझोऊ प्रांतात भूस्खलनामुळे बुलेट ट्रेनचे २ डबे रुळावरून घसरल्यामुळे चालकाचा मृत्यू झाला, तर ७ प्रवासी घायाळ झाल्याची घटना ४ जून या दिवशी घडली.

शिस्तच हवी !

भारतातील लोकसंख्या पहाता जनतेला स्वयंशिस्त लावायची असेल, तर धर्मशिक्षण दिल्यास प्रत्येकाला स्वतःचे कर्तव्य योग्य पद्धतीने पार पाडण्याचे महत्त्व लक्षात येईल. यातून जनतेची आध्यात्मिक उन्नतीही होईल आणि तिला शिस्तही लागेल. अशा प्रकारचे वातावरण हिंदु राष्ट्रात असेल !

१६ घंट्यांनंतर मुंबईतील अपघातग्रस्त मार्गावरून रेल्वे वाहतूक पूर्ववत् चालू !

माटुंगा रेल्वे स्थानकाजवळ १५ एप्रिलच्या रात्री झालेल्या रेल्वे अपघातामुळे रूळ आणि बाजूचे खांब यांची पुष्कळ प्रमाणात हानी झाली होती. १६ घंटे अविरत दुरुस्तीचे काम केल्यानंतर या मार्गावरील वाहतूक पूर्ववत् चालू झाली आहे.

एल्.टी.टी.-जयनगर एक्सप्रेसचे काही डबे रुळावरून घसरले !

नाशिक येथे एल्.टी.टी.-जयनगर एक्सप्रेसचे काही डबे ३ एप्रिल या दिवशी लहवित आणि देवळाली स्थानकांच्या दरम्यान दुपारी ३.१५ वाजता रूळावरून घसरले. मध्य रेल्वेच्या वतीने ट्वीट करून यासंदर्भातील माहिती देण्यात आली.

बंगालमध्ये रेल्वेगाडीच्या अपघातात ३ जणांचा मृत्यू !

अपघातामध्ये रेल्वेगाडीचे ६ डबे रुळावरून घसरले, तर एकूण १२ डब्यांची हानी झाल्याचे वृत्त आहे.

रेल्वेने प्रवास करतांना अपघात झालेल्या महिलेला रेल्वे पोलिसांकडून तातडीने वैद्यकीय साहाय्य

अशी तत्परता सर्व प्रशासकीय कामकाजात आल्यास व्यवस्था पालटायला वेळ लागणार नाही ! रेल्वे प्रशासनाने अशी तत्परता सर्व कामकाजात आणल्यास रेल्वेच्या कारभाराची प्रतिमा उंचावेल !