हिंदूंनो, धर्मातील वर्णांचे महत्त्व लक्षात घ्या !

‘हिंदु धर्मात चार वर्ण आहेत. त्यावर टीका करतांना बुद्धीप्रामाण्यवाद्यांना आणि इतर धर्मियांना कळत नाही की, सर्वच क्षेत्रांत तसे आहे. साधनेच्या संदर्भात इतके भेद असणे, हे हिंदु धर्माचे अद्वितीयत्व दर्शवते.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

पारतंत्र्याचा लज्जास्पद इतिहास पुसा !

‘हिंदूंनो, गेल्या ९०० वर्षांच्या पारतंत्र्याचा लज्जास्पद इतिहास पुसण्यासाठी आता जागृत व्हा !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

अध्यात्मविहीन ‍विज्ञानाचे मूल्य शून्य !

‘मानवाला साधना आणि अध्यात्म न शिकवता त्याला ‘सुखी जीवन जगता यावे’, यासाठी विविध उपकरणे देणार्‍या विज्ञानाचे मूल्य शून्य आहे !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

केवळ यांनाच निवडणुकीत मत द्यायचा अधिकार असावा !

‘ज्यांच्या मनात राष्ट्र आणि धर्म यांच्याविषयी प्रेम आहे आणि जे त्यासाठी काही करतात, त्यांनाच निवडणुकीत मत द्यायचा अधिकार असावा. केवळ त्यानंतरच राष्ट्राची सर्वांगांनी प्रगती होईल.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

असे झाल्यास आश्चर्य वाटायला नको !

‘काश्मीरनंतर भारतातील ज्या ज्या गावांत धर्मांध बहुसंख्य आहेत, त्यांनी ‘आम्हाला पाकिस्तानशी जोडा’, अशी मागणी केल्यास आश्चर्य वाटणार नाही !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

साधनेचे अनन्यसाधारण महत्त्व !

‘साधनेमुळे ‘देव पाहिजे’, असे वाटायला लागले की, ‘पृथ्वीवरचे काही हवे’, असे वाटत नाही. त्यामुळे कोणाचा हेवा, मत्सर किंवा द्वेष वाटत नाही, तसेच इतरांबरोबर दुरावा, भांडण होत नाही.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

निवडणुकीसाठी उभे रहाणार्‍या उमेदवारांनो, हे लक्षात घ्या !

‘राष्ट्रप्रेम आणि धर्मप्रेम नसलेल्या अन् निवडणुकीसाठी उभे असलेल्या उमेदवाराकडून पैसे घेऊन त्याला मते देणार्‍या जनतेचे लोकप्रतिनिधी म्हणून निवडून येण्यापेक्षा ‘ईश्वराने भक्त म्हणून निवडणे अनंत पटींनी महत्त्वाचे आहे’, हे लक्षात घ्या !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

राजकीय पक्षांचा एककलमी कार्यक्रम !

‘राजकीय पक्षांचा एककलमी कार्यक्रम असतो, ‘जात्यंध आणि धर्मांध यांना खुश करून त्यांची मते मिळवणे !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

बुद्धीप्रामाण्यवाद्यांचे अज्ञान !

‘बुद्धीप्रामाण्यवाद्यांना जिज्ञासा नसल्याने ते स्वतःला आहे, तेवढ्या छोट्याशा ज्ञानात (अज्ञानात) रहातात. त्यांना पुढचे पुढचे काहीच कळत नाही.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

हिंदु धर्माचे सर्वश्रेष्ठत्व !

‘इतर धर्मीय पैशांची लालूच दाखवून हिंदूंना आपल्या धर्मात घेतात, तर हिंदु धर्मात शिकवलेल्या साधनेचे महत्त्व कळल्यावर त्याग करणारे इतर धर्मीय हिंदु धर्माचे पालन करतात.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले