एकतर्फी प्रेमातून येरवडा (पुणे) कारागृहातील महिला शिपायाला पेटवून देण्‍याचा प्रयत्न !

तिच्‍या अंगावर पेट्रोल टाकून तिला पेटवून देण्‍याचा प्रयत्न केला. त्‍या वेळी महिला आरोपीला धक्‍का देऊन आतील खोलीत लपून बसल्‍याने अनर्थ टळला. येरवडा पोलिसांनी गुन्‍हा नोंदवून घेत आरोपी पाटील यांना अटक केली आहे.

‘ओळख श्री ज्ञानेश्‍वरीची’ हा संस्‍कारक्षम उपक्रम अनेक शाळांमध्‍ये यशस्‍वी !

भावी पिढी संस्‍कारक्षम व्‍हावी, तसेच त्‍यांना संत विचारांच्‍या अध्‍यात्‍माची ओळख, आवड निर्माण व्‍हावी, हे ध्‍येय घेऊन हा कार्यक्रम हाती घेतला असल्‍याचे, ‘आळंदी देवस्‍थान’च्‍या वतीने प्रमुख विश्‍वस्‍त योगेश देसाई यांनी सांगितले.

मोई (पुणे) गावाचा विकास करणारे माजी उपसरपंच गोरख गवारे पालकमंत्र्यांच्‍या हस्‍ते ‘प्रभात आदर्श सरपंच पुरस्‍कारा’ने सन्‍मानित !

राष्‍ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्‍या विचारांचा वारसा जपणार्‍या गावांमध्‍ये खेड तालुक्‍यातील मोई गावाचा समावेश होतो. माजी उपसरपंच गोरख गवारे यांच्‍या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायतीने स्‍वयंस्‍फूर्तीने पुढाकार घेत विकासाची कामे वेगाने हाती घेतली.

पंतप्रधानांच्‍या विरोधात घोषणा दिल्‍यानेे ‘भारत मुक्‍ती मोर्चा’च्‍या  १५० जणांवर गुन्‍हा नोंद !

पंतप्रधान नरेंद्र मोदी, तसेच राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघाचे प.पू. सरसंघचालक मोहन भागवत यांच्‍याविषयी असभ्‍य भाषेत घोषणा दिल्‍याच्‍या प्रकरणी ‘भारत मुक्‍ती मोर्चा’च्‍या अध्‍यक्षांसह १५० जणांविरोधात पोलिसांनी गुन्‍हा नोंद केला आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्‍या शाळा समुपदेशकाविनाच !

शिक्षण विभागाकडून ३२ मानसोपचार समुपदेशकांची नेमणूक करण्‍यात येणार आहे. महापालिकेच्‍या १०५ प्राथमिक शाळांमध्‍ये ४० सहस्र, तर १८ माध्‍यमिक विद्यालयांत ८ सहस्रांवर विद्यार्थीसंख्‍या आहे.

पुणे येथे लग्‍नाचे आमीष दाखवून बलात्‍कार केल्‍याप्रकरणी शिक्षकाला सक्‍तमजुरी !

पीडिता वर्ष २००६ मध्‍ये सांगली येथे डी.एड्.चे शिक्षण घेत होती. तेव्‍हा ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. तेव्‍हापासून वर्ष २०१२ पर्यंत आरोपी लग्‍नाचे आमीष दाखवून पीडितेशी शारीरिक संबंध प्रस्‍थापित करत होता.

कायदे कडक असतील, तरच परंपरा जपली जाईल ! – अधिवक्‍ता (श्री.) अश्‍विनीकुमार उपाध्‍याय, सर्वोच्‍च न्‍यायालय

इंग्रजांनी बनवलेले कायदे हे त्‍यांना हितकारक होते. त्‍यामुळे त्‍या कायद्यांमध्‍ये पालट करणे आवश्‍यक आहे. कायदे कडक नसतील, तर अराजकता माजल्‍याविना रहाणार नाही. कायदे कडक असतील, तरच ही परंपरा जपली आणि वाढवली जाईल.

‘एल्‍गार’ प्रकरणात ‘कबीर कला मंच’ संघटनेशी संबंधित पुण्‍यातील तिघांना अटक !

या प्रकरणी यापूर्वी सुधा भारद्वाज, अरुण फरेरा, गौतम नवलाखा, कवीवर हिरा राव, वर्णन गोन्‍साल्‍विस, रोना विल्‍सन, सुरेंद्र गडलिंग, सोमा सेन, सुधीर ढवळे, महेश राऊत, आनंद तेलतुंबडे, हनी बाबू यांना अटक करण्‍यात आली आहे.

औंध (पुणे) येथे टवाळखोराच्‍या त्रासाला कंटाळून अल्‍पवयीन मुलीचा आत्‍महत्‍येचा प्रयत्न

या प्रकरणी चतु:शृंगी पोलिसांनी  सागर कांबळे (वय २८ वर्षे) याच्‍या विरोधात गुन्‍हा नोंद केला आहे. मुलीच्‍या वडिलांनी चतु:शृंगी पोलीस ठाण्‍यात तक्रार दिली आहे.

कोरेगाव पार्क (पुणे) येथील ‘फ्रिक सुपर क्‍लब’मध्‍ये राष्‍ट्रध्‍वजाचा अवमान !

राष्‍ट्रध्‍वजाचा अवमान करणार्‍या कलाकारांच्‍या कार्यक्रमांवर कायमस्‍वरूपी बहिष्‍कार घालायला हवा !