कोरोनाची तिसरी लाट आल्यास उपचारांसाठी ३०० हून अधिक खाटांची व्यवस्था ! – राजेश पाटील, आयुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिका

कोरोनाची तिसरी लाट आल्यास महापालिका प्रशासनाने लहान मुलांकरिता वाय.सी.एम्. रुग्णालयामध्ये १५० ऑक्सिजन बेड, ३० आयसीयू बेड आणि जिजामाता रुग्णालयात १५० खाटांची व्यवस्था केली आहे.

पुणे येथे किरकोळ वादातून भरदिवसा रस्त्यात कोयत्याने वार करून तरुणाची हत्या

औद्योगिक वसाहत चाकण परिसरातील म्हाळुंगे येथे आस्थापनात पाणीपुरवठा करण्याच्या वादातून भरदिवसा रस्त्यात ६ जणांनी मिळून कोयत्याने वार करून हत्या केली.

पुणे जिल्ह्यात विनाकारण फिरणार्‍यांचे वाहन जप्त करण्याचे पोलिसांना अधिकार

जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी पोलिसांना यासंदर्भातील अधिकार दिले असून दळणवळण बंदी संपेपर्यंत किंवा आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू असेपर्यंत वाहने परत देऊ नयेत, अशा सूचना त्यांनी पोलिसांना दिल्या आहेत.

पुणे येथे गोरक्षकासह त्याच्या मित्रांना मारहाण करणार्‍या ३ धर्मांधांना अटक

बेवारस गायी-गुरांची सेवा करणारे बद्रीनाथ पार्थसारथी या गोरक्षकासह त्याच्या मित्रांना ३ धर्मांधांनी रॉडसह लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली. या प्रकरणी वानवडी पोलिसांनी शाहबाज कुरेशी, अफजल कुरेशी आणि हसीना कुरेशी यांना अटक केली आहे.

निवृत्त भूमी अभिलेख अधिकार्‍याकडे ८८ लाख रुपयांची बेहिशेबी मालमत्ता

अधिवक्त्याकडून १ कोटी ७० लाख रुपयांची लाच स्वीकारण्याच्या प्रकरणात बाळासाहेब वानखेडे यांना अटक करण्यात आली होती. त्यांची चौकशी केली असता त्यांच्याकडे उत्पन्नापेक्षा ८८ लाख ८५ सहस्र रुपयांची मालमत्ता अधिक असल्याचे आढळून आले.

राज्यात लाचलुचपत विभागाच्या कारवाईत वर्षभरात ३७६ आरोपींना अटक

गेल्या वर्षीच्या तुलनेत ही आकडेवारी ३३ टक्क्यांनी वाढलेली आहे. लाचखोरांच्या कारवाईत नेहमीच आघाडीवर असलेला पुणे विभाग यंदा तिसर्‍या स्थानावर आला आहे. त्यामुळे पुणे विभागात लाचखोरीच्या तक्रारी अल्प आल्या कि कारवाई करण्यात विभाग अल्प पडत आहे, असा प्रश्‍न निर्माण होत आहे.

ईश्‍वराला प्रार्थना आणि अग्निहोत्र करण्यासह विविध उपाय करून नियमित साधना करा ! – सद्गुरु नंदकुमार जाधव, धर्मप्रचारक, सनातन संस्था

चर्चासत्रामध्ये वक्त्यांनी कोरोना महामारीच्या कालावधीमध्ये नागरिकांनी शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक स्तरावर कोणती काळजी घ्यावी ? याविषयीची अत्यंत महत्त्वपूर्ण सूत्रे सांगितली. ती येथे देत आहोत.

उत्तरप्रदेशात संशयित आरोपीला कह्यात घेण्यासाठी गेलेल्या पुणे पोलिसांच्या पथकावर जमावाचे आक्रमण

पुणे येथील एका पोलीस कर्मचार्‍याच्या हत्या प्रकरणात संशयित आरोपीला कह्यात घेण्यासाठी पुणे पोलिसांचे उत्तरप्रदेशात पथक गेले होते. साध्या वेशात असलेल्या पोलिसांना नागरिक समजून फरासखाना पोलीस ठाण्याच्या पथकावर उत्तरप्रदेशातील गाझियाबाद येथे जमावाने आक्रमण केले.

पुणे येथील ‘अपेक्षा’ मासिकाचे सहसंपादक सम्राट नाईक यांचे निधन

‘अपेक्षा’ मासिकाचे सहसंपादक, ज्येष्ठ साहित्यिक, कवी, वात्रटिकाकार, व्यंगचित्रकार, गायक, वादक, कलाकार असे व्यक्तिमत्त्व असणारे सम्राट नाईक (वय ६७ वर्षे ) यांचे १० मे या दिवशी अल्पशा आजाराने निधन झाले.

महानगरपालिका न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करणार !

न्यायालयाने सादर केलेल्या आकडेवारीमुळे नागरिकांच्या मनात संभ्रम निर्माण होत असून याविषयी न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करणार असल्याची माहिती मुरलीधर मोहोळ यांनी दिली. पुण्यामध्ये कडक दळणवळण बंदीची गरज नसून परिस्थिती नियंत्रणात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.