बांधकाम व्यावसायिकाच्या लाभासाठी ओढ्याचा नैसर्गिक प्रवाह बदलण्याचा घाट घालण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप

आंबिल ओढा परिसरात अतिक्रमण हटवण्यासाठी पोलीस पोचले असता या वेळी स्थानिकांकडून जोरदार विरोध करण्यात आला. पोलीस आणि नागरिक यांमध्ये झटापट झाली, तर काही नागरिकांनी अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्नही केला.

नियमांचे उल्लंघन केल्यामुळे रिझर्व्ह बँकेची ३ बँकांवर कारवाई, पुणे जिल्ह्यातील २ बँकांचा समावेश !

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नियमांचे उल्लंघन केल्यामुळे मुंबईतील मोगवीरा सहकारी बँक लिमिडेटसह इंदापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक आणि बारामती सहकारी बँक लिमिटेड या ३ सहकारी बँकांना २३ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.

अतिक्रमणे म्हणजे चोरीच !

विशाळगडावर अतिक्रमणे करणार्‍या १२ जणांना ही अतिक्रमणे काढून घेण्यासाठी १५ दिवसांची नोटीस देण्यात आली आहे. अतिक्रमणे काढून न घेतल्यास पुढील कार्यवाही केली जाणार आहे.’  

परकीय चलन अपव्यवहारप्रकरणी व्यावसायिक अविनाश भोसले यांच्यावर ‘ईडी’ची कारवाई

परकीय चलन अपव्यवहार प्रकरणात येथील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले, तसेच त्यांचे कुटुंबीय यांची ४० कोटी ३४ लाख रुपयांची मालमत्ता २१ जून या दिवशी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) जप्त केली आहे.

मंत्रालयात नोकरी देण्याच्या निमित्ताने तरुणाची फसवणूक !

मंत्रालयात महसूल विभागाच्या राखीव कोट्यातून तलाठ्याची नोकरी लावतो, असे आमीष दाखवून दोघांनी अकोला तालुक्यातील तरुणाची १८ लाख रुपयांची फसवणूक केली.

शाळेत मुलीची प्रवेश प्रक्रिया न झाल्याने मंत्रालय बॉम्बने उडवण्याची धमकी देणारा पुणे पोलिसांच्या कह्यात !

ई-मेलद्वारे मंत्रालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणार्‍या शैलेश शिंदे यांना पुणे पोलिसांनी घोरपडी येथून २१ जून या दिवशी कह्यात घेतले आहे.

ग्लोबल मेअर्सच्या अंतिम फेरीत पुण्याचा समावेश !

इलेक्ट्रिक वाहनांचा भविष्यासाठी महत्त्वपूर्ण पाया ही योजना या स्पर्धेत सादर केली होती.

लोणावळ्यातील प्रसिद्ध आधुनिक वैद्य खंडेलवाल यांच्या घरावर सशस्त्र दरोडा !

असुरक्षित महाराष्ट्र ! काही अंतरावर पोलीस ठाणे असतांनाही चोरी होणे, हे चोरांना पोलिसांचे भय नसल्याचे दर्शवते !

आधुनिक वैद्यांवर होणार्‍या आक्रमणाच्या निषेधार्थ आय.एम्.ए.च्या आधुनिक वैद्यांचे काळ्या फिती लावून काम !

जीव वाचवणार्‍या डॉक्टरांचे रक्षण करा, असे या कार्यक्रमाचे घोषवाक्य आहे.

पुण्यातील सांडपाण्यावर प्रक्रिया करणार्‍या जायका प्रकल्पाला विलंब होण्याची शक्यता !

वर्ष २०१५ मध्ये प्रकल्पाचा करार झाला असतांना ६ वर्षे उलटली तरी अजून निविदा प्रक्रियेवर काम चालू आहे. त्यामुळे कामामध्ये टाळाटाळ होत असल्याचा संशय नागरिकांना आल्यास चूक ते काय ? या प्रकरणी संबंधित अधिकार्‍यांची चौकशी करून ते दोषी असल्यास त्यांना निलंबित करायला हवे !