जेजुरी देवस्थानाची ११३ एकर भूमी त्यांना मिळणार !

सरकारीकरण झालेली मंदिरे आणि पवित्र स्थाने यांची स्थिती काय होऊ शकते ?, हे या उदाहरणातून लक्षात येते. यामुळे सरकारीकरण रहित करून मंदिरे भक्तांच्या कह्यात देण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करा !

पुणे येथे कोरोनाच्या संसर्गाचे कारण पुढे करत प्रशासनाकडून श्री गणेशमूर्ती विसर्जनास बंदी; मात्र संकलन केंद्रावर तुडुंब गर्दी !

कोरोनाच्या संसर्गाचे कारण पुढे करत वहात्या पाण्यात विसर्जनास बंदी घालणार्‍या प्रशासनाला संकलन केंद्रांवरील गर्दी दिसत नाही का ?

गणेशोत्सवात वाढत्या गर्दीचे नियोजन करण्याचे पोलिसांपुढे आव्हान !

गौरी विसर्जनानंतर होणार्‍या गर्दीची शक्यता लक्षात घेऊन गर्दीचे नियोजन करण्यासाठी पोलिसांकडून उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात ५ जणांवर आरोप निश्चित !

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात पुणे न्यायालयाने ५ जणांवर आरोप निश्चित केले आहेत. या वेळी पाचही आरोपींनी न्यायालयात ते निर्दोष असल्याचे सांगितले. या प्रकरणाची पुढील सुनावणी ३० सप्टेंबर या दिवशी होणार आहे.

चाकण (पुणे) येथे विनयभंगाची खोटी तक्रार मागे घेण्यासाठी नगरसेवकांकडे १५ लाखांची खंडणी मागितली !

समाज रसातळाला जात असल्याचे उदाहरण ! समाजाला नीतीवान बनवायचे असेल, तर समाजाला धर्मशिक्षण देणेच आवश्यक आहे !

महापालिकेच्या आरोग्य विभागातील तरुणाकडून चोरीचे २१ भ्रमणभाष जप्त

समाजाला धर्मशिक्षण दिल्यास कर्जफेडीसाठी असे चुकीचे मार्ग अवलंबले जाणार नाहीत !

होमिओपॅथी उपचारपद्धतीला सर्वमान्यता मिळायला हवी ! – उज्ज्वल निकम, विशेष सरकारी अधिवक्ता

अ‍ॅलोपॅथीमध्ये अनेकदा औषधांचे विपरित परिणाम होतात; परंतु होमिओपॅथी त्याला अपवाद आहे. कोणतेही शस्त्रकर्म न करता किंवा इंजेक्शन न देता केवळ पांढ‍र्‍या गोळ्या प्रभावी ठरतात.

‘बोगस शिक्षक भरती प्रकरणी’ जिल्हा परिषदेकडून पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट; गुन्हा नोंद !

बोगस शिक्षक भरती होणेच गंभीर आणि चिंताजनक आहे. यामध्ये सहभागी असणार्‍यांना लवकरात लवकर कठोर शिक्षा होणे अपेक्षित आहे

पुणे येथे ‘निर्माल्य टू निसर्ग’ या उपक्रमांतर्गत कचरावेचक घरोघरी जाऊन नागरिकांकडून निर्माल्य गोळा करणार !

कचरावेचकांनी गोळा केलेले निर्माल्य प्रक्रिया करण्यासाठी देण्याऐवजी नदीत विसर्जन करावे. निर्माल्यामध्ये आलेली पवित्रके नदीद्वारे सर्वत्र पसरून त्याचा लाभ सर्वांना होईल. निर्माल्याची प्रक्रिया करण्याऐवजी नदीत विसर्जन केल्याने धर्मपालनाचे लाभही होतील.

पुणे येथे श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी फिरत्या विसर्जन हौदांवर लाखो रुपयांचा खर्च !

महापालिकेने ११ दिवसांसाठी हौद घेतले असून त्यासाठी १ कोटी २६ लाख १९ सहस्त्र ८६० रुपये ठेकेदाराला दिले जाणार आहेत. ४ दिवसांसाठी ही निविदा काढली असती, तर विसर्जनाचा खर्च ४६ लाख रुपये इतका होता.