पुणे शहरात २ सहस्र रुपयांच्या नोटा खात्यात जमा करण्यावर भर !

नागरिकांनी नोट पालटून घेण्यापेक्षा ती खात्यात जमा करण्यास भर दिल्याचे दिसून आले. तसेच नोटा पालटून घेण्याची प्रक्रिया सोपी असल्याचेही दिसून आले.

पाठ्यपुस्तकांना वह्यांची पाने जोडून बालभारतीची पुस्तके सिद्ध !

पाठ्यपुस्तकांना वह्यांची पाने जोडून बालभारतीची पुस्तके सिद्ध झाली असून लवकरच ही नवी कोरी पुस्तके शाळांमध्ये वितरित होणार आहेत.

पुणे येथील व्यावसायिक अभय संचेती यांच्याकडून ३५ गायींचे संगोपन !

समाजातील प्रत्येक व्यक्तीने गायीची सेवा केली पाहिजे, या उदात्त हेतूने ‘ओम् गुरु आनंद गोशाळे’च्या माध्यमातून ३५ गायींचे संगोपन करण्यात येत आहे. मार्केट यार्ड येथे रहाणारे व्यावसायिक अभय संचेती आणि त्यांचे कुटुंबीय हे सेवाकार्य गेल्या १० वर्षांपासून करत आहेत.

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानने सासवड येथे ६०० हून अधिक मुली आणि महिलांना दाखवला ‘द केरल स्टोरी’ चित्रपट !

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान पुरंदर यांनी तिकीट काढून आतापर्यंत ६७० तरुण मुली आणि महिला यांसाठी सत्य घटनेवर आधारित असणारा ‘द केरल स्टोरी’ हा चित्रपट दाखवला आहे.

‘धर्मवीर शंभूराजे’ पुण्यतिथीसाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून २ लाख ९९ सहस्र रुपये निधी संमत !

आमदार महेश लांडगे यांच्या विशेष प्रयत्नांतून प्रतीवर्षीच्या पुण्यतिथी कार्यक्रमासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने २ लाख ९९ सहस्र रुपये निधी संमत करण्यात आला.

#Exclusive : हिंदु समाज क्षुद्र राजकारणात विभागला जाऊ नये, यासाठी हिंदूंनी स्वातंत्र्यवीर सावरकरांमधील ‘हिंदूसंघटक’ हा गुण अंगीकारणे महत्त्वाचे ! – विद्याचरण पुरंदरे, इतिहास अभ्यासक, पुणे

‘या देशाने तुम्हाला कोणत्या गोष्टीसाठी लक्षात ठेवावे ?’, असा प्रश्न विचारल्यावर सावरकर उत्तरले, ‘‘मला या देशाने ‘हिंदूसंघटक’ म्हणून लक्षात ठेवावे, अशी माझी इच्छा आहे !’’

एकाने चूक केली म्हणून परिवार चुकीचा असे म्हणणे चूक ठरेल ! – चंद्रकांत बावनकुळे, भाजप प्रदेशाध्यक्ष

हनी ट्रॅप’ प्रकरणातील डी.आर्.डी.ओ.चे संचालक डॉ. प्रदीप कुरुलकर असो कि समीर वानखेडे असो आरोपींवर कारवाई झाली पाहिजे. सध्या चौकशी चालू असल्याने त्याविषयी अधिक बोलता येणार नाही, अशी भूमिका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांनी प्रसारमाध्यमांसमोर मांडली.

#Exclusive : १ लाख लोकसंख्येहून अल्प असलेल्या गावांतही सावरकर यांचा परिचय करून द्यायला हवा ! – श्रीकांत ताम्हणकर, सावरकर अभ्यासक, पुणे

२१ ते २८ मे २०२३ या कालावधीत सावरकर यांच्या जयंतीनिमित्त आम्ही ‘शतपैलू सावरकर’ ही वृत्तमालिका चालू करत आहोत. या माध्यमातून सावरकर यांच्या जीवनप्रवासातील विविधांगी पैलू उलगडण्यास, तसेच युवा पिढीमध्ये जाज्ज्वल्य राष्ट्राभिमान निर्माण होण्यास साहाय्य होईल.