मंदिरांचे सरकारीकरण थांबवा !

वारंवार मागणी करूनही मंदिरांचे सरकारीकरण काही थांबत नाही. भाजप सत्तेत असलेल्या राज्यांतही मंदिरांचे सरकारीकरण होते, हे हिंदूंना रूचलेले नाही. त्यामुळे केंद्रीय स्तरावरच कायदा करून मंदिरे सरकारीकरणापासून मुक्त करण्यासाठी मोहीम हाती घेणे आवश्यक आहे. केंद्र सरकारने हे लक्षात घेऊन यासाठी पावले उचलणे अपेक्षित आहे !

मंगलमय स्वस्तिक !

स्वस्तिकच्या प्रकरणात हिंदूंनी वेळीच आवाज उठवला नसता, तर कॅनडामध्ये त्याच्यावर बंदी घातली गेली असती. जागतिक पातळीवर हिंदूंना त्यांच्या अधिकारांसाठी वेळोवेळी लढावे लागते; मात्र हिंदूंमध्ये शुभ आणि मंगलमय असलेल्या स्वस्तिकसाठी हिंदूंनी वैध मार्गाने दिलेला लढा हा नक्कीच आशादायी होता !

कॉन्व्हेंट शाळा धर्मांतराची केंद्रे होत असून त्याला राजकीय पाठिंबा आहे ! – अर्जुन संपथ, अध्यक्ष, हिंदु मक्कल कत्छी

धर्मांतरामुळे तमिळनाडूमधील कन्याकुमारीसारख्या जिल्ह्यात आज हिंदू अल्पसंख्य झाले आहेत. राज्यातील सरकार ख्रिस्तीधार्जिणे आहे. मुख्यमंत्री स्टॅलिन यांनीच ‘हे सरकार केवळ अल्पसंख्यांकासाठी आहे’, असे एका बैठकीत जाहीरपणे सांगितले होते.

हिंडलगा (बेळगाव) कारागृहातील स्वातंत्र्यवीर सावरकरांची प्रतिमा हटवल्याने संताप : हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी जाब विचारून पुन्हा नवी प्रतिमा लावली !

स्वातंत्र्यवीर सावरकर हे प्रखर हिंदुत्वनिष्ठ असल्यानेच हिंदुद्वेषापोटी कारागृह प्रशासन त्यांची प्रतिमा हटवण्याची कृती करते !

बांगलादेशातील वैद्यकीय महाविद्यालयात सर्व धर्माच्या विद्यार्थिनींसाठी हिजाब अनिवार्य !

कर्नाटकमधील हिजाबविरोधी आंदोलनांवरून भारतात अल्पसंख्यांचे धार्मिक अधिकार चिरडले जात असल्याची ओरड करणारे इस्लामी देश बांगलादेशातील अल्पसंख्य हिंदूंच्या चिरडल्या जाणार्‍या धार्मिक अधिकारांविषयी चकार शब्दही काढत नाहीत !

मुसलमानांची बाजू मांडणारे अधिवक्ता देवदत्त कामत यांच्यावर सामाजिक माध्यमांतून टीका

कर्नाटक उच्च न्यायालयात चालू असलेला हिजाबचा खटला
अधिवक्ता कामत काँग्रेसचे पदाधिकारी !

हिंदुद्वेषी अभिनेत्री स्वरा भास्कर यांच्यावर सामाजिक माध्यमांतून टीका !

स्वरा भास्कर यांनी यापूर्वीही जे.एन्.यू.मधील आंदोलनाला पाठिंबा देऊन, तसेच इतरही अनेक घटनांत स्वतःची हिंदुद्वेषी वृत्ती उघड केली होती ! हिंदूंनी अशा हिंदुद्वेषी अभिनेत्रींच्या चित्रपटांवर बहिष्कार घालून त्यांना धडा शिकवला पाहिजे !

हिजाब आणि बुरखा हवा असेल, तर मदरशांत जावे ! – आमदार टी. राजा सिंह

शाळा आणि महाविद्यालये येथे जाण्यासाठी  हिजाबचा हट्ट धरलात, तर भिकारी आहात आणि भिकारीच रहाल, असे विधान त्यांनी पत्रकारांशी बोलतांना केले.

बनारस हिंदु विद्यापिठाच्या प्राध्यापकाकडून देवतांचा अवमान !

हिंदूंना धर्मशिक्षण मिळत नसल्याचाच हा परिणाम आहे ! असे प्राध्यापक विद्यार्थ्यांसमोर कोणता आदर्श ठेवत आहेत ?

राणा अय्युब यांची चोरी !

सामाजिक कार्याच्या नावाखाली पैसे हडपणारे पत्रकार, हा पत्रकारितेला लागलेला कलंकच ! राणा अय्युब यांचा पत्रकारितेच्या नावाखाली असलेला आतंकी बुरखा भारतीय पत्रकारितेने फाडावा !