धर्मांतर हे भारताला विभाजनाच्या दिशेने घेऊन जात असल्याने ते रोखण्यासाठी हिंदु धर्माचा प्रसार करणे आवश्यक ! – मोहन गौडा, प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

हिंदु धर्माचा प्रसार सर्वत्र करून धर्मशिक्षण घेऊन धर्माभिमान बाळगल्यास धर्मांतरासारख्या समस्यांना आळा बसेल.

लेखकांनी हिंदुत्वनिष्ठ संघटनांची अपकीर्ती करणारे पुस्तक मागे घेतले !

विश्व हिंदु परिषदेच्या कार्यकर्त्याने दिलेल्या नोटिसीचा आणि प्रविष्ट केलेल्या तक्रारीचा परिणाम ! या लेखकांचे अन्य धर्मियांच्या संघटनांविषयी अशा प्रकारे लिहिण्याचे धाडस झाले असते का ?

रशिया-युक्रेनच्या युद्धावर बोलणारे काश्मीरमधील हिंदूंवर झालेल्या अत्याचारांविषयी का बोलत नाहीत ? – प्रा. रेणुका धर बजाज, देहली विद्यापीठ

‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट ७०० काश्मिरी कुटुंबांशी चर्चा करून आणि ३ वर्षे अभ्यास केल्यानंतर हिंदूंची वस्तूस्थिती मांडणारा बनवण्यात आला आहे. या चित्रपटातून काश्मिरी हिंदूंवर झालेल्या अत्याचाराचे भीषण सत्य भारतियांपर्यंत पोचवण्याचे काम केले आहे.

मडगाव (गोवा) येथील ‘आयनॉक्स’मध्ये ‘द कश्मीर फाइल्स’ ‘हाऊसफूल’ नसतांना तशी सूचना !

गोव्यात आता ‘चित्रपट जिहाद’ला प्रारंभ झाला आहे. ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटाची तिकीटविक्री दाबून ठेवणे आणि चित्रपटाला लोकांची पसंती नसल्याचा आभास निर्माण करणे, असा प्रकार गोव्यात चालू झाला आहे.

महाराष्ट्रातील ‘इक्रा आय.ए.एस्.’ संस्थेत मार्गदर्शन करणार्‍या प्राध्यापकाकडून ओसामा बिन लादेन याचे उदात्तीकरण !

‘इक्रा आय.ए.एस्.’सारख्या हिंदुद्वेषी संस्था बुद्धीभेद करत असल्यामुळे भारतीय प्रशासनात बहुतांश हिंदुद्वेष्ट्यांचा भरणा आहे, हे लक्षात घ्या ! अशांवर सरकारने त्वरित कारवाई करणे हिंदूंना अपेक्षित आहे !

तमिळनाडू सरकारने अवैध मशिदीवर कारवाई न केल्यास आंदोलन करणार ! – भारत हिंदु मुन्नानी

मूळात अशी मागणी का करावी लागते ? सरकार स्वतःहून अवैध बाधकामांवर कारवाई का करत नाही ?

सूरत (गुजरात) येथील महानगरपालिकेच्या सार्वजनिक शौचालयाच्या भिंतीवर रेखाटण्यात आलेले श्री गणेशाचे चित्र हिंदु संघटनांनी पुसले !

सूरत महानगरपालिकेचे असे चित्र रेखाटण्याचे धाडस होतेच कसे ?

सावदा (जिल्हा जळगाव) येथील सार्वजनिक शौचालयाच्या भिंतीवर स्वस्तिक, तुळस आणि वारकरी यांची चित्रे रंगवून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावण्याचा अश्लाघ्य प्रकार !

अन्य धर्मियांच्या पवित्र चिन्हांच्या संदर्भात असा प्रकार करण्याचे कुणाचे धाडस झाले असते का ?

अशा चित्रपटांवर बहिष्कारच हवा !

साजिद नाडियावाला निर्मित आणि फर्हद सामजी दिग्दर्शित ‘बच्चन पांडे’ या आगामी चित्रपटात ‘होली पे गोली’ असे आक्षेपार्ह वाक्य असल्याने हिंदूंकडून या चित्रपटाला सामाजिक माध्यमांद्वारे मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे.

तमिळनाडूत मंदिराच्या मालकीच्या भूमीत मृतदेह पुरण्याचा धर्मांध ख्रिस्त्यांचा प्रयत्न हिंदुत्वनिष्ठांनी हाणून पाडला !

तमिळनाडूत हिंदुद्वेषी द्रमुकचे सरकार सत्तेत असल्यामुळे तेथे धर्मांध ख्रिस्त्यांच्या कारवाया वाढल्या आहेत. तेथे हिंदु धर्मावर होणारे आघात रोखण्यासाठी परिणामकारक हिंदूसंघटन आवश्यक आहे !