अशा चित्रपटांना ‘सेन्सॉर’चे प्रमाणपत्र मिळतेच कसे ?

अभिनेते आमीर खान यांच्या ‘लालसिंह चढ्ढा’ या चित्रपटात त्यांच्या तोंडी ‘पूजा-पाठ केल्याने मलेरिया पसरतो, दंगली होतात’, असा संवाद आहे. यास भाजपच्या युवा मोर्चाचे सदस्य शिखर बक्षी यांनी विरोध केला आहे.

मुसलमान संघटनांच्या विरोधानंतर मंगळुरू विश्‍वविद्यालयात भारतमातेची पूजा रहित !

हिजाब हा धार्मिक, तर भारतमाता हा राष्ट्रीय अस्मितेचा  विषय आहे. जर कुणी तिची पूजा करत असेल, तर त्यात चुकीचे काय ? जे भारतमातेलाच मानत नाहीत, तेच अशा प्रकारचा विरोध करतात ! अशांच्या विरोधाला विश्‍वविद्यालयाने बळी पडू नये !

कानपूरमध्ये राष्ट्रध्वजावर मशीद, चंद्र आणि तारा रेखाटले !

हिंदु संघटनांकडून पोलिसांकडे तक्रार प्रविष्ट

छत्तीसगड येथे ख्रिस्ती मिशनर्‍यांच्या विरोधात गावकर्‍यांचे आंदोलन !

देशात धर्मांतरविरोधी कायदा नसल्याने ख्रिस्ती मिशनर्‍यांचे फावते आहे, हे पहाता लवकरात लवकर हा कायदा करून संबंधितांवर कठोर कारवाई होणे आवश्यक !

हिंदुद्वेषी नियतकालिक ‘द वीक’ने प्रकाशित केले भगवान शंकर आणि कालीमाता यांचे अश्‍लाघ्य चित्र !

हिंदु देवतांचे विडंबन करणारी ‘द वीक’सारखी नियतकालिके कधीतरी मुसलमान किंवा ख्रिस्ती यांच्या श्रद्धास्थानांचा अनादर करतात का ? हिंदूंच्याच पैशांवर मोठ्या झालेल्या अशा नियतकालिकांवर आता हिंदूंनी बहिष्कार घालून त्यांना वठणीवर आणले पाहिजे !

‘सनबर्न महोत्सव’ यंदा ३ ऐवजी ४ दिवस ! – रोहन खंवटे, पर्यटनमंत्री

‘ईडीएम’ महोत्सव युवा पिढीला व्यसनाधीन बनवणारे आणि पाश्चात्य विकृतीचे उदात्तीकरण करणारे आहेत. ‘ईडीएम’चे आयोजन करणे, हा संस्कृतीद्रोह आहे !

‘मासूम सवाल’ या हिंदी चित्रपटाच्या भित्तीपत्रकावर ‘सॅनिटरी पॅड’वर भगवान श्रीकृष्णाचे चित्र

इतक्या खालच्या स्तरावर जाऊन हिंदूंच्या देवतांचा अवमान केला जात असूनही अशांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी, त्यांना कठोर शिक्षा होण्यासाठी कठोर कायदा केला जात नाही, हे हिंदूंना लज्जास्पद !

आगामी ‘रक्षाबंधन’ चित्रपटाच्या लेखिका कनिका धिल्लन यांनी अर्ध्या घंट्यात हटवले पूर्वीचे १७ हिंदुद्वेषी ट्वीट्स !

यामुळे हिंदुद्वेषी वृत्ती थोडीच पालटली जाणार आहे ! आता हिंदूंनीही अशांच्या चित्रपटांवर बहिष्कार घालून त्यांना हिंदूऐक्याची चुणूक दाखवून द्यावी !

चोपडा येथील ‘पोद्दार इंटरनॅशनल’ ही अनधिकृत शाळा बंद करण्यासंदर्भात गट शिक्षणाधिकार्‍यांकडून नोटीस !

पोद्दार शाळेने वेगळ्या उद्देशाने हा वातावरण दूषित करणारा उपक्रम राबवला आहे. त्यामुळे शाळेचे विश्‍वस्त, तसेच संबंधित शिक्षक यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी.

अभिनेते आमीर खान यांचा ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपट पहाण्यास प्रेक्षकांचा स्पष्ट नकार !

‘हिंदू जागृत होत असून देवतांची विटंबना करणार्‍या आणि भारताविषयी अनुद्गार काढणार्‍या अभिनेत्याला जागा दाखवून देण्यास सिद्ध आहेत’, हेच यावरून स्पष्ट होत आहे !