जनसामान्यांमध्ये राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांविषयीची कृतीशीलता निर्माण करणार्‍या प्रबोधनपर ध्वनी-चित्रचकत्या दाखवण्याकरता प्रोजेक्टरांची आवश्यकता !

हिंदु राष्ट्राची स्थापना करणे, हे ध्येय साकार होण्यासाठी सनातन संस्था कटीबद्ध आहे. विविध ग्रंथ, सनातन प्रभात नियतकालिके तसेच प्रबोधनपर ध्वनी-चित्रचकत्या या माध्यमांतून संस्थेच्या वतीने राष्ट्र अन् धर्म यांविषयी जनसामान्यांमध्ये जागृती केली जात आहे.

संकेतस्थळाशी संबंधित तंत्रज्ञानाच्या विविध सेवांसाठी जाणकारांची तातडीने आवश्यकता !

‘धर्मशिक्षण, धर्मजागृती आणि राष्ट्ररक्षण हे व्यापक कार्य शीघ्रतेने करण्याचे प्रभावी माध्यम म्हणजे संकेतस्थळ (वेबसाईट) ! विविध संकेतस्थळांद्वारे आंतरराष्ट्रीय स्तरावर केल्या जाणार्‍या धर्मप्रसाराच्या कार्यात दिवसेंदिवस वृद्धी होत आहे. त्यामुळे संकेतस्थळाशी संबंधित सेवा करणार्‍या साधकांची संख्या अपुरी पडत आहे.

हिंदु जनजागृती समितीचे ठाणे आणि रायगड या जिल्ह्यांतील डिसेंबर २०१७ च्या मासातील धर्मप्रसाराचे कार्य !

३.१२.२०१७ या दिवशी कल्याण (पूर्व) येथील जिल्हा परिषद शाळेच्या पटांगणात शौर्य जागरण कार्यक्रम झाला. हिंदु राष्ट्र सेनेचे श्री. आशिष पांडे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले.

कानपूर येथील जगद्विख्यात ‘आयआयटी’कडून हिंदूंचे धार्मिक ग्रंथ आणि पुराण यांची माहिती ऑडिओ आणि लिखित स्वरूपात उपलब्ध

श्रीमद्भगवद्गीता, रामचरितमानस्, ब्रह्मसूत्र, योगसूत्र, श्रीराम मंगल दासजी, नारद भक्ती सूत्र, रामायणातील सुंदरकांड आणि बालकांड, असे एकूण ९ धार्मिक ग्रंथ या पोर्टलवर ठेवण्यात आले आहेत.

राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. भरतबुवा रामदासी यांना संत ज्ञानोबा-तुकाराम पुरस्कार !

बीड येथील प्रसिद्ध राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. भरतबुवा रामदासी यांना संभाजीनगर येथील कला वैभव या सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने नुकताच संत ज्ञानोबा-तुकाराम हा पुरस्कार राष्ट्रसंत आनंदचैतन्य महाराज आणि सहआयुक्त अमित घेवले यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

पुणे येथे होणार्‍या हिंदु धर्मजागृती सभेनिमित्त हिंदुत्वनिष्ठ आणि धर्मप्रेमी यांची बैठक पार पडली

हिंदु जनजागृती समितीचे श्री. पराग गोखले यांनी हिंदु धर्माची सद्यस्थिती सांगून हिंदूसंघटनाची आवश्यकता याविषयी उपस्थितांना अवगत केले. श्री. अभिजित देशमुख यांनी हिंदु राष्ट्राची आवश्यकता याविषयी उपस्थितांना अवगत केले.

दैनिक सनातन प्रभातच्या माध्यमातून हिंदु धर्माला अपेक्षित असे व्यासपीठ लाभले आहे ! – श्रीनिवास पेंडसे, कीर्तनकार, प्रवचनकार आणि व्याख्याते

हिंदु धर्मामध्ये वेगवेगळे संप्रदाय, अनेक उपास्यदेवता, अनेक प्रार्थनापद्धती अशी प्रत्येकाची आवड, प्रत्येकाची रुची भिन्न आहे; मात्र ही भिन्नता आपल्या हिंदु धर्माच्या संस्कृतीशी एकरूप होते. आमचा धर्म महान आहे, त्याचे अनुयायी अनेक आहेत; परंतु धर्माला अपेक्षित असे व्यासपीठ नाही. मत मांडण्याचे साधन नाही, हे आमचे दुर्दैव आहे. आता मात्र दैनिक सनातन प्रभातच्या माध्यमातून हिंदु धर्माला अपेक्षित … Read more

संत श्री गजानन महाराजांच्या महादर्शन सोहळ्यात सनातन संस्थेच्या वतीने धर्मप्रसार

एक भक्त श्री. आणि सौ. देवरणकर यांच्या निवासस्थानी संत श्री गजानन महाराजांच्या पादुकांच्या दर्शन सोहळ्याचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते.

विविध गावांमध्ये घेण्यात येणार्‍या बैठकांना समाजातून उत्स्फूर्त प्रतिसाद

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथे ७ जानेवारीला हिंदु धर्मजागृती सभेचे आयोजन करण्यात आले आहे. त्या निमित्ताने श्रीरामपूर तालुक्यासह पारनेर, जामखेड, नेवासा, राहुरी, संगमनेर हे ५ तालुके आणि संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुका येथील गावांमध्ये, तसेच शहरी भाग येथे एकूण ९० हून अधिक बैठका झाल्या आहेत.

के.पी. योहान्नन : भारतातून हिंदूंचे उच्चाटन करण्याचा विडा उचललेले ख्रिस्ती धर्मोपदेशक !

‘भारत ही एक शापित भूमी आहे आणि भारतातील जनता पापी जीवन जगत आहेत. भारतातील स्त्रिया त्यांचा चरितार्थ चालवण्यासाठी वेश्याव्यवसाय करतात’, अशी अफवा ‘द गॉस्पेल ऑफ इंडिया’ या संस्थेचे संस्थापक के.पी. योहान्नान पसरवत आहेत. 


Multi Language |Offline reading | PDF