यापुढे धार्मिक भावना दुखावल्यास कारवाई करू ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

ख्रिस्त्यांचे देव सत्य आहेत आणि हिंदूंचे देव खोटे अन् आंधळे आहेत, असेच या पाद्रयांकडून इतरांना सांगितले जाते. असा उद्देश असलेल्या आंतरधर्मीय चर्चा घेणे म्हणजे धर्मांधताच होय !

ब्रिटनमधील ५३.४ टक्के पाद्य्रांनी केले समलैंगिक विवाहाचे समर्थन !

पाद्य्रांकडून मुले, महिला यांचे लैंगिक शोषण करण्यात आल्याच्या शेकडो घटना आतापर्यंत उघड झालेल्या असल्याने पाद्य्रांकडून यापेक्षा वेगळ्या विचारांची अपेक्षाच करता येणार नाही !

गोव्यात शिवछत्रपती यांच्या पुतळ्यावर ११ ठिकाणी सामूहिक दुग्ध-जलाभिषेक !

पाद्रयांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी केलेले आक्षेपार्ह विधान, यानंतर करासवाडा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची झालेली विटंबना या पार्श्वभूमीवर समस्त शिवप्रेमींनी संपूर्ण गोवाभर ‘श्री शिवछत्रपती सामूहिक दुग्ध-जलाभिषेक अभियान’ राबवण्याचा संकल्प केला.

धार्मिक स्थळाचा वापर २ धर्मांमध्ये तेढ निर्माण करण्यासाठी करू नये ! – वाहतूकमंत्री मावीन गुदिन्हो

चिखली चर्चचे पाद्री बोलमॅक्स पेरेरा यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान केल्याने त्यांच्या विरोधात गुन्हा प्रविष्ट झाला आहे. या पार्श्वभूमीवर वाहतूकमंत्री मावीन गुदिन्हो वास्को येथे स्वातंत्र्यदिन कार्यक्रमात बोलतांना हे आवाहन केले.

सत्र न्यायालयाने चिखली (गोवा) येथील पाद्री बोलमॅक्स पेरेरा यांना अंतरिम जामीन नाकारला !

पाद्री बोलमॅक्स पेरेरा यांच्या विरोधात कलम २९५(अ) आणि ५०४ कलमांखाली गुन्हा नोंदवला गेला आहे. यानंतर पाद्री बोलमॅक्स पेरेरा यांनी मडगाव येथील अतिरिक्त सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता.

(म्हणे) ‘गोव्यात ‘मणीपूर’सारखी स्थिती निर्माण होऊ शकते !’ – ‘गोवा आणि दमण आर्चडायोसीस’ यांच्या पाक्षिक पुस्तिकेत लेख

चिथावणीखोर लिखाण करून लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करणारा लेख प्रसिद्ध करणार्‍या ‘गोवा आणि दमण आर्चडायोसीस’ यांच्या पाक्षिक पुस्तिकेची गंभीरतेने नोंद घेऊन गोवा सरकारने संबंधितांवर कारवाई करावी, असेच शांतीप्रिय जनतेला वाटते !

गोवा : पाद्री पेरेरा यांची अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अवमानकारक टिपण्णी करून हिंदु धर्मीय आणि शिवप्रेमी यांच्या भावना दुखावल्याच्या प्रकरणी पाद्री पेरेरा यांच्या विरोधात वास्को पोलीस ठाण्यात कलम २९५ आणि ५०४ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला. यानंतर त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली !

पाद्री पेरेरा यांच्या विरोधात गोव्यात दुसर्‍या दिवशीही तक्रार प्रविष्ट : मोर्चा, सभा आणि पत्रकार परिषद यांच्या माध्यमातून जनक्षोभ चालूच !

पाद्री पेरेरा यांनी केलेल्या विधानावरून राज्यातील शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने ४ ऑगस्टला वास्को पोलीस ठाण्यापर्यंत मोर्चा काढला आणि पाद्री पेरेरा यांना अटक करण्याची जोरदार मागणी केली.

स्‍वराज्‍यकर्ता ‘देवतुल्‍य’च !

जरी ही घटना गोव्‍यात घडलेली असली, तरी सर्वत्रच्‍या शिवप्रेमींनी पेरेरा यांच्‍या विरोधात आवाज उठवून त्‍यांना पळता भुई थोडी करावी. हिंदूंनो, आता देशद्रोह खपवून घेऊ नका ! पेरेरा यांना वैध मार्गाने त्‍यांची जागा दाखवा. छत्रपती शिवरायांप्रमाणे इतिहास घडवून ऐतिहासिक घटनांचे साक्षीदार व्‍हा !

पाद्री पेरेरा यांच्या विरोधात गोव्यात ४ तक्रारी : कारवाईची मागणी

आजपर्यंत हिंदूंनी अशा तर्‍हेच्या विधानांना कोणताही प्रतिकार न करता सहन केले आहे. खोटा इतिहास आणि पोर्तुगिजांची चमचेगिरी सहन केली जात आहे. सहनशीलतेलाही अंत असतो, याचे भान या विकृतांनी ठेवावे, नाहीतर ही परधार्जिणी प्रवृत्ती ठेचण्याची वेळ यायला विलंब लागणार नाही, हे सत्य !