प्रदूषणाकडे दुर्लक्ष करणार्‍या अकोला आणि अमरावती महानगरपालिकांवर कारवाई कधी ? – श्री. सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती

प्रदूषण रोखण्यासाठी कोणतीही कारवाई न करणार्‍या अकोला आणि अमरावती या महानगरपालिकांविरुद्ध प्रदूषण नियंत्रण मंडळ कधी कारवाई करणार ?, असा प्रश्‍न हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुनील घनवट यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे विचारला.

पावसामुळे पुण्याच्या प्रदूषणात घट !

३ शहरांच्या तुलनेत पुणे शहराची हवेची गुणवत्ता चांगली असल्याचे निरीक्षण

भारत, पाकिस्तान आणि बांगलादेश येथे वायूप्रदूषणामुळे प्रतिवर्षी ३ लाख ५० सहस्र गर्भपात !

भारत, पाकिस्तान आणि बांगलादेश या देशांत मोठ्या प्रमाणात होणार्‍या वायुप्रदूषणामुळे प्रतिवर्षी ३ लाख ४९ सहस्र ६८१ गर्भपात होतात, असे लँसेट हेल्थ जर्नलच्या संशोधनामध्ये दिसून आले आहे.

ख्रिस्ती नववर्षानिमित्त आलेल्या पर्यटकांनी समुद्रकिनार्‍यांवर फेकलेल्या मद्याच्या रिकाम्या बाटल्यांच्या काचा लागल्याने अनेकांना गंभीर इजा

‘दृष्टी मरिन’ यांनी दिलेल्या माहितीनुसार फुटलेल्या बाटल्यांवर पाय पडल्याने पायाला दुखापत होण्याच्या मागील काही दिवसांत १० हून अधिक घटना घडल्या आहेत. स्थानिक मासेमार आणि ‘वॉटरस्पोर्ट’चे कर्मचारी यांनाही काच लागल्याने दुखापत झाली आहे.

पंचगंगा नदी प्रदूषित करणार्‍या कारखान्यांना थेट टाळे लावा ! – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

मुख्यमंत्र्यांनी घेतलेली भूमिका अभिनंदनीय असून त्यावर कठोरपणे कारवाई व्हायला हवी !

पंचगंगा प्रदूषणाच्या समस्येवर खासदार धैर्यशील माने यांची प्रोसेसर्स असोसिएशन समवेत बैठक

कारखानदारांनी ‘झिरो डिस्चार्ज’च्या दृष्टीने पाऊल उचलावे, म्हणजे पंचगंगा नदीत प्रोसेस युनिटच्या माध्यमातून जाणारे प्रदूषित पाणी पूर्णपणे थांबेल.

पंचगंगेचे प्रदूषण रोखण्यासाठी इचलकरंजी नगर परिषदेने आराखडा करावा ! – पालकमंत्री सतेज पाटील

पंचगंगा नदी प्रदूषण नियंत्रण मंडळाने ठोस कृती न करता किती दिवस बैठकींचा फार्स करणार ?

मेरठच्या ग्रामीण भागातील वाढत्या प्रदूषणामुळे ७ शिक्षकांची स्थानांतराची मागणी

संपूर्ण देशात प्रदूषणात वाढ होत असल्याने स्थानांतर कुठे करायचे ? या वाढत्या प्रदूषणावर नियंत्रण न ठेवायला अतापर्यंतचे सर्वपक्षीय शासनकर्तेच उत्तरदायी आहेत !

तेरवाड (जिल्हा कोल्हापूर) बंधार्‍यावर सहस्रो मासे मृतावस्थेत आढळल्याने नागरिकांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकार्‍यांना बांधून ठेवले

इचलकरंजी नगरपालिका मुख्याधिकारी यांच्यावर गुन्हा नोंद करण्याचे आदेश

दळणवळण बंदी नंतर पुण्यातील अतिसूक्ष्म धूलिकणांत ५ पटीने वाढ

दळणवळण बंदी नंतर पुण्यासह राज्यातील अल्प झालेले सूक्ष्म धूलिकणांचे प्रमाण परत वाढले आहे. पुणे शहरातील धूलिकणांचे प्रमाण ५ पटीने वाढले आहे.