जगभरातील सर्वाधिक प्रदूषित ३० शहरांपैकी २२ शहरे भारतात !

देशातील सर्वपक्षीय शासनकर्त्यांनी हे रोखण्यासाठी आतापर्यंत काहीच न केल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे. देशातील सर्व प्रकारचे प्रदूषण रोखण्यासाठी कठोर पावले उचलण्याची आवश्यकता आहे !

सीओपीडी मुळे होणार्‍या मृत्यूंचे प्रमाण सर्वाधिक !

घरोघरी होणार्‍या वायू प्रदूषणामुळे क्रॉनिक ओबस्ट्रक्टिव पल्मनरी डिसीज हा आजार होण्याची दाट शक्यता !

गणेशोत्सवामध्ये जलप्रदूषण रोखण्यासाठी नागरिकांना शाडू मातीच्या श्री गणेशमूर्ती उपलब्ध करून द्या ! – हिंदु जनजागृती समितीचे कोल्हापूर आयुक्तांना निवेदन

गेली अनेक वर्षे कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने गणेशोत्सवाच्या कालावधीमध्ये गणेशमूर्ती विसर्जनामुळे होणारे जलप्रदूषण रोखण्याच्या नावाखाली श्री गणेशमूर्ती विसर्जन न करता दान करण्याची अशास्त्रीय मोहीम शहरात राबवली जाते.

प्रदूषणामुळे तेरवाड (जिल्हा कोल्हापूर) नंतर आता शिरोळ बंधार्‍यात सहस्रो मासे मृत्यूमुखी

निष्क्रीय आणि दायित्वशून्य प्रदूषण मंडळ !

साहाय्यक नद्यांतील दूषित पाणी नर्मदा नदीत मिसळू देणे देशासाठी घातक ! – द्वारका आणि ज्योतिष पीठांचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती  

शहरांतील नाल्यांचे पाणी नदीमध्ये सोडले जाते याचे दायित्व सरकार आणि स्थानिक प्रशासन यांचे आहे. नर्मदेला आम्ही ‘आई’ मानतो आणि प्रत्येकाची तिच्यावर श्रद्धा आहे.

वाळव्याच्या बहे (जिल्हा सांगली) येथील रामलिंग बेटाजळ कृष्णा नदीच्या पात्रात दूषित पाण्यामुळे सहस्रो मासे मृत्यूमुखी

वारंवार सहस्रो मासे मृत्यूमुखी पडूनही त्याविरोधात कोणतीही ठोस कृती न करणारे निष्क्रीय प्रदूषण मंडळ !

कोळसा खाणींमुळे वणी ताक्यातील शेती व्यवसायाची पुष्कळ हानी

परिसरातील कोळसा खाणींमुळे प्रदूषणात झालेली वाढ, कृत्रिम टेकड्या आणि जंगले यांमुळे शेती व्यवसायाची पुष्कळ हानी झाली आहे. अकार्यक्षम प्रदूषण नियंत्रण मंडळामुळे खाण प्रशासन उद्दाम झाले आहे. प्रदूषणामुळे उत्पन्न अल्प झाले आहे.

८ वर्षे जुनी गाडी असलेल्यांना आता ‘हरित कर’ भरावा लागणार !

८ वर्षे जुन्या वाहनांवर लवकरच हरित कर (‘ग्रीन टॅक्स’) आकारला जाण्याची शक्यता आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने ‘ग्रीन टॅक्स’ आकारण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे.

कोट्यवधी रुपये व्यय करूनही पिंपरी-चिंचवड शहरातील नद्या प्रदूषितच !

यातून कोट्यवधी रुपये वाया गेले असेच झाले. संबंधितांची चौकशी करून तात्काळ कारवाई होणे अपेक्षित !

रसायनयुक्त जुन्या साड्या नदीपात्रात धुवून पंचगंगा नदी प्रदूषित करणार्‍या घटकांवर कठोर कारवाई करा ! – करवीर शिवसेना

ग्राहकांची फसवणूक करणार्‍यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, या मागणीचे निवेदन करवीर शिवसेनेच्या वतीने उपविभागीय अधिकारी, करवीर विभाग यांचे स्वीय सहाय्यक श्री. संजय घोरपडे यांना देण्यात आले.