जळगाव येथे वाहनावर झाड कोसळल्याने पोलीस अधिकार्‍यासह चालक ठार !

या दुर्घटनेत नाशिक येथील आर्थिक गुन्हे शाखेचे साहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन दातीर यांच्यासह चालक अजय चौधरी यांचे निधन झाले आहे. ३० जून या दिवशी हा प्रकार घडला. दातीर यांच्या पश्चात पत्नी, ८ मासांचा मुलगा, आई-वडील, भाऊ आणि बहीण असा परिवार आहे.  

गोहत्या प्रकरणी कडूस परिसरात (पुणे) जमावबंदीचे आदेश लागू !

आषाढी एकादशीच्या दिवशी म्हणजेच २९ जून या दिवशी येथील अवैध पशूवधगृहावर बजरंग दलाचे कार्यकर्ते, तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या साहाय्याने पोलिसांनी धाड टाकली होती. या वेळी दिवसाढवळ्या चालू असलेला गोहत्येचा प्रकार उघडकीस आला.

जळगाव येथे २ गोवंशियांची कत्तल केल्याप्रकरणी ६ संशयित धर्मांधांना अटक !

शहरातील शिवाजीनगर येथील उस्मानिया पार्क भागात २ गोवंशियांची कत्तल केल्याप्रकरणी ६ संशयित धर्मांधांना पोलिसांनी २९ जूनच्या सकाळी अटक केली. या ठिकाणी कत्तलीसाठी आणलेल्या २७ गोवंशियांची सुटका करून त्यांची पाठवणी बाफना गोशाळेत करण्यात आली आहे.

झारखंडमध्ये क्षुल्लक कारणामुळे २ गटांमध्ये दंगल : २० जणांना अटक

इ-बॅटरीच्या चोरीच्या प्रकरणात २ गटांमध्ये मारहाण झाली. त्यानंतर वातावरण निवळले; मात्र २ घंट्यांमध्ये स्थिती पुन्हा बिघडली. एका गटाने स्थानिक नगरसेवकाचा पुतळा जाळला.

डच सरकारकडून पोलिसांना क्रॉस किंवा हिजाब परिधान करण्यावर बंदी !

पोलिसांना धर्म किंवा श्रद्धा यांची जाहीरपणे अभिव्यक्ती करणे आवश्यक नाही. पोलीसदल हे सरकारचे प्रतिनिधित्व करते. त्यांना वेळप्रसंगी बळाचाही वापर करावा लागतो.

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर खासगी बसचा भीषण अपघात : २५ प्रवासी मृत्यूमुखी

पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त, मृतांच्या कुटुंबियांना साहाय्य घोषित

देहलीत धर्मांध मुसलमानाने मंदिराजवळ टाकले म्हशीचे कापलेले शीर !

देहली भारतात आहे कि पाकिस्तानात ? अशी घटना एखाद्या चर्चबाहेर किंवा मशिदीबाहेर घडली असती, तर देहलीमध्ये एव्हाना दंगल उसळली असती ! हिंदु सहिष्णु असल्याने ते असे कृत्य करत नाहीत. तरीही हिंदूंना , , , असहिष्णु ठरवतात !

पाकिस्तानमध्ये धर्मांध मुसलमानांनी गुरुद्वारामध्ये घुसून केला गुरु ग्रंथसाहिबचा अवमान !

स्थानिकांनी पकडून दिलेल्या धर्मांधांना पोलिसांनी दिले सोडून !

गोव्यातील कॅसिनोमध्ये पैसे हरलेल्या पुण्यातील व्यावसायिकाची आत्महत्या

सदर कॅसिनोवर व्यावसायिकाची फसवणूक करून त्याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याविषयी कॅसिनोमधील २ महिला कर्मचार्‍यांवर प्रथमदर्शनी गुन्हा नोंदवण्यात यावा आणि चौकशी करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसच्या प्रतिनिधी मंडळाने केली आहे. 

मणीपूरमधील हिंसाचार आणि उपाययोजना !

मणीपूरमध्‍ये सैन्‍य वाढवून म्‍यानमार सीमा पूर्णपणे बंद करावी लागेल. अराजकीय आणि बंडखोर यांना मारावेच लागेल. प्रसंगी कठीण निर्णय घेऊन हा हिंसाचार थांबवावा लागेल. सैन्‍याच्‍या हाताखाली सर्व सुरक्षादले द्यायला हवीत.