पुणे येथे सव्‍वासहा कोटी रुपयांचे अमली पदार्थ नष्‍ट !

४७ गुन्‍ह्यांमध्‍ये दीड सहस्र किलो गांजा आणि चरस हे अमली पदार्थ जप्‍त करण्‍यात आले होते. न्‍यायालयीन प्रक्रियेनंतर २९ गुन्‍ह्यांतील गांजा आणि चरस नष्‍ट करण्‍याची अनुमती मिळाली.

डॉ. रामोड यांच्‍या कुटुंबियांच्‍या खात्‍यात मिळाले ४७ लाख रुपये !

महामार्ग लगतच्‍या भूमी प्रकरणात सकारात्‍मक निकाल देण्‍यासाठी शेतकर्‍याकडून ८ लाख रुपयांची लाच स्‍वीकारणारे अप्‍पर विभागीय आयुक्‍त डॉ. अनिल रामोड आणि त्‍यांच्‍या कुटुंबातील सदस्‍य यांच्‍या अधिकोशातील १७ खाती केंद्रीय गुन्‍हे अन्‍वेषण विभागाने पडताळली असून या खात्‍यांमध्‍ये सीबीआयला ४७ लाख रुपये मिळाले आहेत.

सामाजिक माध्‍यमांवरील ‘वर्क फ्रॉम होम’च्‍या विज्ञापनाद्वारे महिलेची १८ लाखांची फसवणूक !

सध्‍या सामाजिक माध्‍यमांवरील फेसबूक, इन्‍स्‍टाग्राम, व्‍हॉट्‍सअ‍ॅप, टेलिग्राम यांतून रोजगारांची अनेक विज्ञापने दिसून येतात. अनेक तरुण-तरुणी रोजगार मिळेल, या आशेने तिथे संपर्क साधतात; मात्र काही वेळा त्‍यांची फसवणूक होत असल्‍याचे प्रकार समोर आले आहेत.

ठाण्यात मुनव्वर याने अल्पवयीन हिंदु तरुणीचा विनयभंग करून इस्लाम स्वीकारण्यासाठी आणला दबाव !

मुनव्वर आणि त्याचा मित्र अजीम यांना अटक !

हल्द्वानी (उत्तराखंड) येथे गायीवर बलात्कार करणार्‍या मुसलमान तरुणाला स्थानिकांनी पकडून चोपले !

अशा विकृत वासनांधांना कठोर शिक्षा होत नसल्यानेच सतत अशा घटना घडत आहेत. याविरोधात कठोर कायदा करण्याची आवश्यकता आहे !

जत (तालुका सांगली) तलाठी संघटनेच्‍या अध्‍यक्षांवर दुसर्‍यांदा लाच घेतांना गुन्‍हा नोंद !

प्रशासनात ग्रामसेवकापासून उच्‍चपदस्‍थ अधिकार्‍यांपर्यंत भ्रष्‍टाचार मुरला आहे. साधी कामे करण्‍यासाठीही जनतेकडून लाच घेतली जाते, हे गंभीर आहे. स्‍वातंत्र्यानंतरच्‍या ७५ वर्षांत एकही राजकीय पक्ष देश भ्रष्‍टाचारमुक्‍त करू शकलेला नाही. त्‍यामुळे भ्रष्‍टाचार्‍यांच्‍या एवढेच तो न रोखणारेही दोषीच आहेत !

उरण (नवी मुंबई) पोलीस ठाणे येथील लाचखोर पोलीस उपनिरीक्षक कह्यात

अशा लाचखोरांची सर्व संपत्ती जप्‍त करून त्‍यांना कठोर शिक्षा करायला हवी !

नागपूरमधील मेयो रुग्‍णालयात महिला आधुनिक वैद्याच्‍या वेशात फिरणार्‍या धर्मांधाला अटक !

येथील मेयो रुग्‍णालयामध्‍ये महिला आधुनिक वैद्याच्‍या वेशात बुरखा घालून फिरणार्‍या जावेद शफी शेख (वय २५ वर्षे) याला अटक करण्‍यात आली. गेल्‍या १५ दिवसांपासून तो रुग्‍णालयात अधूनमधून महिलेच्‍या वेशात फिरत होता.

रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांचे महिलांना आवाहन

प्रवासादरम्यान आपल्याला एखाद्या इसमाच्या संशयित अथवा विकृत हालचाली दिसून येताच लागलीच ११२, अथवा हेल्पलाईन नंबर १०६१ किंवा पोलीस नियंत्रण कक्ष (०२३५२) २२२२२२ या क्रमांकावर संपर्क साधावा.

हिंदु कुटुंबावर धर्मांतरासाठी आमीष दाखवून दबाव टाकणार्‍या दोघा पाद्य्रांसह चौघांवर गुन्हा नोंद !

धर्मांतरविरोधी कठोर कायदा नसल्यानेच असे प्रयत्न सातत्याने होत आहेत, हे लक्षात घ्या !