छत्रपती संभाजीनगर येथील आदर्श महिला नागरी सहकारी बँकेत २०० कोटींचा घोटाळा उघडकीस !

सहकारी संस्‍थेच्‍या जिल्‍हा उपनिबंधकांच्‍या आदेशावरून विशेष लेखापरीक्षक धनंजय चव्‍हाण यांनी वर्ष २०१६ ते २०१९ या कालावधीतील लेखापरीक्षण केले, तसेच जून २०२३ मध्‍ये त्‍यांनी याचा अहवाल वरिष्‍ठांकडे सादर केला.

हिमाचल प्रदेशमध्ये हिंदूंच्या धर्मांतराच्या प्रयत्नात असणार्‍या ११ ख्रिस्ती मिशनर्‍यांना अटक

कठोर धर्मांतरविरोधी कायदा नसल्यानेच अशा लोकांचे फावते आहे !

कल्याण येथील आधारवाडी कारागृहात बंदीवानाकडे सापडले १५ भ्रमणभाष !

इतक्या मोठ्या प्रमाणात भ्रमणभाष कारागृहात येतातच कसे ? बंदीवानांना पोलिसांचे पाठबळ मिळत असल्याची शक्यता नाकारता येत नाही !

देशात नक्षलवाद मागे पडला ! – नक्षलवाद्यांची स्वीकृती

जोपर्यंत देशातील नक्षलवाद आणि माओवाद समूळ नष्ट होत नाही, तोपर्यंत ‘नक्षलवाद्यांपासून देशाला धोका आहे’, हे शासकर्ते आणि पोलीस यंत्रणा यांनी लक्षात ठेवले पाहिजे.  

वाहनांच्‍या विशेष पडताळणी मोहिमेत २६ वाहनांविरुद्ध कारवाई !

समृद्धी महामार्गावर २५ प्रवाशांचे बळी घेणार्‍या ट्रॅव्‍हल्‍सच्‍या अपघातानंतर ९ जुलैच्‍या रात्री त्‍या महामार्गासह अन्‍य ३ मार्गांवर वाहनांची विशेष पडताळणी मोहीम राबवण्‍यात आली.

रहाटणी (जि. पुणे) येथे धर्मांतर करण्‍यासाठी महिलेवर दबाव !

‘बायबल वाचा’, ‘येशू ख्रिस्‍त्‍यांवर विश्‍वास ठेवा’, असे सांगत पिंपरी-चिंचवडमधील रहाटणी येथील एका महिलेचे धर्मांतरासाठी मनपरिवर्तन करण्‍याचा प्रयत्न केला आहे. या प्रकरणी ३९ वर्षीय महिलेने वाकड पोलीस ठाण्‍यात तक्रार प्रविष्‍ट केली आहे.

‘थूक जिहाद’चे आणखी एक प्रकरण उजेडात !

चंडीगडमधील एका धाब्‍यावर स्‍वयंपाक करणारा मोहम्‍मद आदिल रोट्या बनवतांना त्‍यांवर थुंकत असल्‍याचा एक व्‍हिडिओ सामाजिक माध्‍यमांवर प्रसारित झाला आहे. त्‍यानंतर चंडीगड पोलिसांकडून हा ढाबा बंद करण्‍यात आल्‍याचे वृत्त आहे.

उत्तरप्रदेशात धर्मांतराचे षड्यंत्र उघड : गाझियाबाद पोलिसांकडून ३ धर्मांधांना अटक

धर्मांधांचे असे धाडस होऊ नये, असा वचक सरकारने निर्माण करणे आवश्यक आहे !

(म्हणे) ‘महानगरपालिकेची अनुमती घेतली आहे का ?’ – बेंगळुरू पोलीस

बेंगळुरू येथील पुरातन नागकट्ट्याजवळील नागदेवतेची पूजा करण्यास पोलिसांकडून आडकाठी !

गोहत्‍या थांबवण्‍यासाठी विविध उच्‍च न्‍यायालयांचे आश्‍वासक निवाडे !

‘धर्मांधांना कुठेही पशूहत्‍या, विशेषत: गोहत्‍या करण्‍यास देऊ नये, गृहनिर्माण संस्‍था आणि हिंदु वस्‍त्‍या यांठिकाणी पशूहत्‍येला बंदी करावी, तसेच कायदा आणि सुव्‍यवस्‍था यांचा प्रश्‍न निर्माण होऊ नये, यांसाठी पोलीस अन् प्रशासन यांनी प्रयत्न करावेत’,….