(म्हणे) ‘माझ्या जिवाला धोका असल्याने मी मायदेशी परतण्यास असमर्थ !’ – नीरव मोदी

माझ्याविषयीच्या प्रकरणाचा राजकारणासाठी उपयोग केला जात आहे. माझ्या प्रतिमा जाळल्या जात आहेत. माझ्याविरुद्ध लोकांना चिथावणी दिली जात आहे. यामुळे माझ्या जिवाला धोका असल्याने मी मायदेशी परतण्यास असमर्थ आहे

मेहूल चोक्सी यांच्या विरोधात ‘रेड कॉर्नर’ नोटीस

पंजाब नॅशनल बँकेतील कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याच्या प्रकरणी फरार असलेले मेहूल चोक्सी यांच्या विरोधात ‘इंटरपोल’ने ‘रेड कॉर्नर’ नोटीस काढली आहे.

माझी साक्ष नोंदवायची असेल, तर अँटिग्वाला या ! – मेहूल चोक्सीचा उद्दामपणा

पंजाब नॅशनल बँकेतील १३ सहस्र कोटी रुपयांच्या घोटाळ्याच्या प्रकरणी पसार असलेला आरोपी मेहूल चोक्सी याने ‘मी आजारी आहे. अंमलबजावणी संचालनालयाला माझी साक्ष नोंदवायची असेल, तर त्यांनी ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’द्वारे घ्यावी अथवा अँटिग्वाला यावे’, असे सांगितले.

पंजाब नॅशनल बँकेला फसवून परदेशात पळालेले हिरे व्यापारी मेहुल चोकसी भारतात परतणार !

पंजाब नॅशनल बँकेला साडेतेरा सहस्र कोटी रुपयांना फसवून परदेशात पसार झालेले हिरे व्यापारी मेहुल चोकसी हे भारतात परत येणार असून तसे त्यांनी त्यांच्या आस्थापनाच्या कर्मचार्‍यांना कळवले आहे.

कर्जबुडव्या मेहूल चोकसीची २१८ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त

पंजाब नॅशनल बँकेचे शेकडो कोटी रुपयांचे कर्ज बुडवणारे घोटाळेबाज मेहूल चोकसी यांची २१८ कोटी रुपयांची मालमत्ता अंमलबजावणी संचालनालयाने जप्त केली. यापूर्वी नीरव मोदीसह त्यांचा भाऊ, तसेच त्यांचे अन्य ४ साथीदार यांची ६३७ ….

घोटाळेबाज हिरे व्यापारी नीरव मोदी यांच्या विदेशातील ६३७ कोटी रुपयांच्या संपत्तीवर टाच

पंजाब नॅशनल बँकेची सुमारे १३ सहस्र कोटी रुपयांची फसवणूक करून विदेशात पसार झालेले हिरे व्यापारी नीरव मोदी यांच्या विदेशातील ६३७ कोटी रुपयांच्या संपत्तीवर अंमलबजावणी संचलनालयाने (‘ईडी’ने) टाच आणली आहे.

(म्हणे) ‘जमावाच्या मारहाणीत मरायचे नसल्याने भारतात येत नाही !’

भारतात एखाद्या प्रकरणात दोषी सापडलेल्या माणसाला जमावाकडून मारहाण करण्यात येते, अशा काही घटना गेल्या काही दिवसांत उघड झाल्या आहेत.

भारतीय पारपत्राच्या आधारावर नीरव मोदी लंडनमधून पसार

पंजाब नॅशनल बँकेचे १३ सहस्र कोटी रुपये बुडवून विदेशात पसार झालेले हिरे व्यापारी नीरव मोदी एक मासापूर्वीच लंडनमधून पसार झाले आहेत, तसेच ते भारतीय पारपत्रावरच जगभरात फिरत आहेत, अशी माहिती इंटरपोलने सीबीआयला दिली आहे.

नीरव मोदीचा सावत्र भाऊ नेहल पसार

पंजाब नॅशनल बँकेला १४ सहस्र कोटींचा चुना लावून परदेशात पळालेल्या नीरव मोदीचा सावत्र भाऊ नेहल हाही नीरव मोदीच्या रिटेल आऊटलेटमध्ये विक्रीला ठेवलेले ५० किलो सोने घेऊन फरार झाला आहे.

पंजाब नॅशनल बँक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर !

पंजाब नॅशनल बँकेला (पीएन्बीला) दिवाळखोर घोषित करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हिर्‍यांचे व्यापारी नीरव मोदी यांनी केलेल्या घोटाळ्याचा फटका पंजाब नॅशनल बँकेला बसणार आहे.


Multi Language |Offline reading | PDF