यापुढे बडव्‍यांची अपकीर्ती करण्‍याचा प्रयत्न केल्‍यास त्‍याच भाषेत उत्तर देऊ !

बडवे कुटुंबियांनी पंढरपूरच्‍या श्री विठ्ठलाची मागील सहस्रो वर्षे अविरत सेवा केली आहे. त्‍यामुळे त्‍यांचा अवमान थांबवा, असे आवाहन नाशिक येथील काळाराम मंदिराचे पुजारी महंत सुधीरदास महाराज यांनी केले आहे.

विठ्ठला, समाजातील प्रत्येक घटकाला सुखी आणि समाधानी कर ! – मुख्यमंत्र्यांचे श्री विठ्ठलचरणी साकडे

‘बळीराजाला चांगले दिवस येऊ दे, त्याच्यावरील अरिष्ट दूर होऊ दे. पाऊस पडू दे. राज्य सुजलाम्, सुफलाम् होऊ दे. शेतकरी, कष्टकरी, कामगार, वारकरी, धारकरी असा राज्यातील प्रत्येक घटक सुखी समाधानी होऊ देत. त्यांच्या आयुष्यात चांगले दिवस येऊ देत’, असे साकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घातले.

वारकरी संप्रदायाचा महामंत्र अन् त्याचा अर्थ

‘रामकृष्ण हरि ।’ याचा अर्थ ‘रामासारखे आचरण ठेवले, तरच आज ना उद्या मनाने कृष्ण होता येते आणि मनाने कृष्ण झाल्याविना जगत् हरिरूप भासत नाही.’ यालाच ‘जीवन्मुक्ती’ असे म्हणतात. ही जीवनाची इतिश्री होय.’

विठ्ठलाच्या नामजपामुळे व्याधींपासून मुक्तता मिळत असल्याचे आधुनिक वैद्यांनी सिद्ध करणे !

‘पंढरपूरची वारी ही अतिशय विस्मयकारक आणि सर्वसामान्य मानवजातीला वरदानच ठरलेली आहे. सर्व वारकर्‍यांना काही ना काहीतरी व्याधी असते. असे असूनही ‘ते अडीचशे मैल अनवाणी प्रवास करून त्यांची प्रकृती उत्तम कशी रहाते ?’, याचे उत्तर आधुनिक वैद्यांनी प्रयोगाअंती शोधून काढले…

विठ्ठलाची उपासना भक्तीभावाने करण्यास सांगणारे सनातनचे ग्रंथ !

प्रस्तुत ग्रंथात पांडुरंग, पंढरपूर इत्यादींचे माहात्म्य; तसेच वारी व वारकरी यांच्या आध्यात्मिक स्वरूपाचे वर्णन दिले आहे. आद्य शंकराचार्यविरचित ‘पांडुरंगाष्टकम्’चा अर्थही दिला आहे. भक्तीरसात डुंबवणारा हा ग्रंथ वाचून विठ्ठलभक्त व्हा !

पंढरपूर येथील श्री विठ्ठलमूर्तीचे सूक्ष्मचित्र

पंढरपूर येथील श्री विठ्ठलाच्या मूर्तीचे सूक्ष्म-दृष्टीला झालेले दर्शन

प.पू. भक्तराज महाराज यांनी भक्तीभावाने भरवलेला पेढा प्रत्यक्ष ग्रहण करणार्‍या पांडुरंगाचे भक्तवात्सल्य !

इंदूर (मध्यप्रदेश) येथील थोर संत प.पू. भक्तराज महाराज एकदा त्यांच्या भक्तांसह पंढरपूर येथे गेले होते. रात्री १० वाजता प.पू. बाबा पांडुरंगाच्या समोर उभे राहिले. बाबांनी पांडुरंगाच्या गळ्यात हार घातला आणि पेढ्याच्या पुडीतील एक पेढा उचलून पांडुरंगाच्या मुखाला लावला. तेव्हा तो गायब झाला.

वारकर्‍यांचा भाव !

‘पालखी प्रस्थानापासून पंढरपूरला विठ्ठलाचे दर्शन होईपर्यंत ‘माऊली’ कशी काळजी घेतात’, असाच भाव वारकर्‍यांच्या बोलण्यातून जाणवतो.

वारकर्‍यांच्या विविध प्रश्नांसाठी ३० जूनला पंढरपूर येथे भव्य वारकरी अधिवेशन ! – सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती

अधिवेशन परमपूज्य श्री बालयोगी महाराज मठ, दत्तघाट येथे दुपारी २ ते सायंकाळी ५ या वेळेत वारकरी संप्रदाय, हिंदु जनजागृती समिती आणि परमहंस परिव्राजकाचार्य श्री स्वामी नारायणानंद सरस्वती यांच्या संयुक्त विद्यमाने होत आहे.

आषाढी एकादशी असल्याने ‘बकरी ईद’निमित्त गोवंशियांची, तसेच अन्य पशूंची सार्वजनिक ठिकाणी होणारी हत्या रोखा !

वास्तविक अशी मागणी करण्याची वेळ हिंदुत्वनिष्ठ संघटनांवर येऊ नये. सरकारने स्वतःहून गोवंशियांची हत्या रोखण्यासाठी प्रभावी यंत्रणा राबवणे आवश्यक आहे !