कार्तिकी यात्रेसाठी पंढरपूर येथे २ लाखांहून अधिक भाविक उपस्थित !

कोरोना संसर्गामुळे २ वर्षांनंतर भरलेल्या कार्तिकी यात्रेसाठी पंढरपूर येथे पुन्हा एकदा भक्तांची मांदियाळी जमली आहे. अनुमाने २ लाखांहून अधिक भाविक शहरात आले आहेत.

एकादशीचे माहात्म्य

दहा इंद्रिये आणि एक मन संपूर्णत पांडुरंगाला अर्पण करणे म्हणजे एकादशी ! आषाढी एकादशी आणि कार्तिक एकादशी या तिथींना पंढरपूरची यात्रा असते. पांडुरंगाच्या दर्शनासाठी वारकर्‍यांनी एकादशी करावयाची (एक + दहा) म्हणजे एक मन आणि दहा इंद्रिये संपूर्णतः पांडुरंगाला अर्पण करायची.

वारकर्‍यांना कृतार्थ करणारा पंढरपूर येथील वारीचा अलौकिक सोहळा !

सर्व इंद्रिये आणि मन यांना आनंद देणारा हा वारीचा सोहळा म्हणजे एक आनंद सोहळा आहे. काला तर वारीचा परमोच्च बिंदू आहे. उच्च-नीच भेद न मानता एकमेकांच्या तोंडात काल्याचे घास भरवणारी ही पंढरीची वारी, म्हणजे एक उत्कृष्ट प्रयोग आहे !

कार्तिकी यात्रेसाठी रेल्वेच्या ७ नव्या गाड्यांची व्यवस्था !

कार्तिकी यात्रेसाठी रेल्वेने लातूर-पंढरपूर, मिरज-पंढरपूर, लातूर-मिरज, बिदर-पंढरपूर-मिरज, अदिलाबाद-पंढरपूर, नांदेड-पंढरपूर आणि सांगली-पंढरपूर या नव्या रेल्वेगाड्या चालू करण्यात आल्या आहेत.

कार्तिकी यात्रेच्या निमित्ताने भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी परिवहन विभागाकडून खासगी वाहनांची सोय !

प्रवाशांच्या अडचणीचे निराकरण करण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे प्रवाशांसाठी २४ घंटे हेल्पलाईन चालू करण्यात आली असून प्रवाशांनी ०२१७-२३०३०९९ या दूरध्वनीवर संपर्क साधण्याचे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी केले आहे.

६५ वर्षांच्या पुढील भाविकांनाही श्री विठ्ठलाचे दर्शन घेता येणार !

प्रशासनाने कोरोना संसर्गाचे निर्बंध शिथील केल्याने वारकर्‍यांकडून या निर्णयाचे स्वागत होत आहे.

श्री विठ्ठलाला अर्पण केलेले दागिने वितळवण्यासाठी राज्य सरकारची अनुमती !

मंदिरांचे सरकारीकरण झाल्यावर काय होते, हे हिंदू आतातरी लक्षात घेतील का ?

कार्तिकी यात्रेसाठी पंढरपूर नगरपालिका प्रशासन सज्ज !

कार्तिक शुक्ल पक्ष एकादशी या दिवशी कार्तिकी यात्रा होणार असून या कालावधीत पंढरपुरात श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी भाविक मोठ्या प्रमाणात येतात. सर्व आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नगरपालिका प्रशासन सज्ज असल्याची माहिती मुख्याधिकारी यांनी दिली.

पंढरपूरकडे जाणारे मार्ग भागवत धर्माची पताका उंचावणारे महामार्ग ठरतील ! – पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंढरपूर येथे संत ज्ञानेश्‍वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्गांच्या चौपदरीकरणाच्या कामाची पंतप्रधानांच्या हस्ते पायाभरणी !