लष्कराची माहिती पुरवणार्‍या आय.एस्.आय. एजंटला सुरत (गुजरात) येथून अटक !

गुजरात पोलिसांनी १३ डिसेंबर या दिवशी पाकिस्तानी गुप्तचर संस्था आय.एस्.आय.साठी काम करणार्‍या सुरत येथील दीपक साळुंखे याला अटक केली आहे.

उदयपूर (राजस्थान) येथील दुकानातून विकली जाणारी गोमांस असलेली पाकिस्तानी टॉफी जप्त !

दुकानदाराने सांगितले की, तो या टॉफी मुंबईतून मागवत असतो. याच दुकानांतून अन्य दुकादारांना याचे वितरण केले जाते. ‘चिली-मिली’ नावाने ही विकली जाते. एक पाकीट २० रुपयांना मिळते.

ओसामा बिन लादेन याचे आदरातिथ्य करणार्‍यांनी आम्हाला उपदेश करू नये !

आतंकवादाविरुद्ध जग संघर्ष करत असून अशा काळात काही लोक गुन्हेगार, तसेच आतंकवादी आक्रमणांचा कट रचणारे यांना योग्य ठरवत आहेत. त्यांच्या संरक्षणासाठी ते आंतरराष्ट्रीय व्यासपिठाचा अपवापर करत आहेत.

दिवाळखोरीकडे वाटचाल करणारा पाकिस्तान अमेरिकेतील दूतावासाची जुनी इमारत विकणार

लवकरच पाकिस्तानही विकण्यास काढण्यासारखी स्थिती येणार आहे आणि तेथील जिहादी मानसिकतेमुळे तो विकत घेण्यासाठी कुणी पुढे येणार नाही !

भारतातील गुंड बबलू श्रीवास्तव याच्याकडून हाफीज सईद याला ठार मारण्याचा प्रयत्न ! – पाकच्या गृहमंत्र्यांचा आरोप

बबलू श्रीवास्तव सध्या उत्तरप्रदेशातील बरेली येथील कारावासात आहे. बबलू भारताची गुप्तचर संस्था ‘रॉ’चा हस्तक असल्याचा दावाही सनाउल्लाह यांनी केला आहे.

पाकिस्तानी प्रेयसीवर प्रेम करणार्‍या भारतियाने विवाहित पत्नीला पाठवली घटस्फोटाची नोटीस !

गेल्या ३ वर्षांपासून हिरा मलिक नावाच्या पाकिस्तानी मैत्रिणीच्या प्रेमाच्या जाळ्यात राजकुमार अडकले. श्वेता हिने पतीच्या अवैध संबंधांना विरोध केल्यावर राजकुमार यांनी तिला घटस्फोटाची नोटीस पाठवली.

पाकचे ‘अ‍ॅप’ आणि ‘संकेतस्थळ’ यांवर भारताकडून बंदी

ही कारवाई नुकतेच प्रदर्शित झालेल्या पाकिस्तानी वेब सिरीज ‘सेवक : द कन्फेशन’ यावरून करण्यात आली आहे. या वेब सिरीजमध्ये भारत आणि हिंदू यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. 

दोघांच्या भांडणात तिसर्‍याचा लाभ !

अफगाणिस्तानमध्ये तालिबानचे सरकार येऊन जवळपास दीड वर्ष होत आले आहे. अफगाणिस्तानची आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक स्थिती अत्यंत विदारक आहे. त्यातच ज्या तालिबानच्या मागे अनेक वर्षे पाकिस्तान खंबीरपणे उभा होता, ज्या पाकिस्तानमुळे तालिबानला अफगाणिस्तानची सत्ता मिळवता आली….

पाकिस्तानी सैन्य आणि तालिबानी यांच्यात चकमक

पाकच्या सैन्याने म्हटले आहे की, आम्ही तालिबान्यांना सीमेवर चौकी बनवण्यास विरोध केल्यावर तालिबान्यांनी आमच्यावर आक्रमण केले.