न्‍यायालयच असुरक्षित ?

न्‍यायालयाच्‍या कक्षाबाहेर व्‍हरांड्यात खंडणी आणि दरोडा प्रकरणातील ‘मकोका’ (महाराष्‍ट्र संघटित गुन्‍हेगारी कायदा) लागलेला आरोपी अन् त्‍याच्‍या साथीदारांवर एकाने गोळीबार केला. ही घटना ७ ऑगस्‍टला दुपारी सातारा जिल्‍ह्यातील वाई येथील न्‍यायालयात घडली.

संस्‍कृतमुळे सुसंस्‍कृत !

लंडन शहराच्‍या मध्‍यवर्ती भागात असणार्‍या ‘सेंट जेम्‍स इंडिपेन्‍डंट स्‍कूल’ या शाळेतील विद्यार्थ्‍यांसाठी संस्‍कृत भाषेचे शिक्षण सक्‍तीचे करण्‍यात आले आहे. ‘संस्‍कृत भाषेमुळे विद्यार्थ्‍यांना गणित, विज्ञान आणि इतर भाषा शिकणे सोपे जाते’, असे संस्‍कृत विभागाचे प्रमुख यांचे मत आहे.

खड्डेयुक्‍त रस्‍ते नकोत !

नुकतेच मुंबई उच्‍च न्‍यायालयाने एक महत्त्वपूर्ण टिपणी करतांना म्‍हटले, ‘‘सुस्‍थितीतील रस्‍ते मिळणे, हा नागरिकांचा अधिकार आहे. त्‍यामुळे नागरिकांना खड्डेमुक्‍त रस्‍ते उपलब्‍ध करण्‍याचे आदेश ५ वर्षांपूर्वी देण्‍यात आले होते. तरीही खड्‍ड्यांची समस्‍या ‘जैसे थे’ असून नागरिकांना नाहक जीव गमवावा लागत आहे, तसेच खुड्डेमुक्‍त रस्‍ते उपलब्‍ध करण्‍यासाठी ५ वर्षांचा कालावधी पुरेसा नाही का ? सुस्‍थितीतील रस्‍त्‍यांविषयीच्‍या ५ … Read more

कीर्तन जिहाद ?

‘सबका मालिक एक है ।’ असे म्‍हणत एका धर्मांधाने कीर्तनासाठी जमलेल्‍या भाविकांना ‘ला इलाहा इल्लल्लाह मोहम्‍मद रसूलुल्लाह’, असे म्‍हणायला लावले आणि तेथे जमलेले हिंदु भाविकही त्‍याचे अनुसरण करत होते.

गणेशभक्‍तांनो धर्महानी रोखा !

एका मूर्तीकाराने शेतकर्‍याच्‍या वेशात हातात भिंगरी असलेली प्‍लास्‍टर ऑफ पॅरिसची श्री गणेशमूर्ती सिद्ध केल्‍याचे छायाचित्र एका दैनिकात प्रसिद्ध झाले. सध्‍या ‘इको फ्रेंडली’ (पर्यावरणपूरक) म्‍हणून कागद, गोमय, तुरटी, पुठ्ठा आदींच्‍या गणेशमूर्ती बनवल्‍या जातात.

मन करा रे प्रसन्‍न…!

शरीर आणि मन सुंदर करण्‍यासाठी स्‍वतःतील दोष अन् अहं न्‍यून करून भगवंताची उपासना केली पाहिजे, तसेच दैनंदिन उपासना केल्‍यामुळे देवाचे साहाय्‍य आणि त्‍यामुळे प्राप्‍त होणारी मानसिक स्‍थिरता मिळते. शेवटी जगद़्‍गुरु तुकाराम महाराजांनी म्‍हटल्‍याप्रमाणे ‘मन करा रे प्रसन्‍न । सर्व सिद्धीचे कारण ।’ हे लक्षात ठेवले पाहिजे !

‘ऑनलाईन’ खेळ मांडियेला !

एक काळ असा होता, जेव्‍हा केवळ लहान मुलेच खेळतांना दिसत असत आणि आताचा काळ असा आहे की, लहानांपेक्षा मोठेच अधिक संख्‍येने खेळतांना दिसतात ! ‘ऑनलाईन गेम्‍स’चे आजमितीला एवढे प्रस्‍थ वाढले आहे की, एखाद्याच्‍या भ्रमणभाषमध्‍ये ‘गेमिंग अ‍ॅप’ नसणे ..

आहार-विहार सांभाळा !

सांसारिक कृती वेळेत होण्‍यासाठी सर्वसामान्‍य झटतात; पण देवाने जे अमूल्‍य असे शरीर दिले आहे, त्‍याकडे लक्ष देण्‍याची वेळ आली की, कारणे दिली जातात.

पोषण आहारातील त्रुटी !

अनेक वेळा पोषण आहारासाठी आलेले तांदूळ, डाळ हे ठेकेदार घरी घेऊन जातात आणि अल्‍प प्रतीचा तांदूळ पोषण आहारासाठी वापरतात. हे सर्व अपप्रकार थांबवण्‍यासाठी आणि पोषण आहाराविषयीच्‍या त्रुटी दूर करण्‍यासाठी शासनाने वेळीच योग्‍य पाऊल उचलणे आवश्‍यक आहे.