लक्ष्मणपुरी (लखनौ) येथे सनातनच्या वतीने ‘साधना’ विषयावर पू. नीलेश सिंगबाळ यांचे मार्गदर्शन

सनातन संस्थेच्या वतीने येथील इंदिरानगर मानस सिटीमध्ये नुकतेच ‘साधना’ विषयावर व्याख्यान घेण्यात आले.

प्रयागराज येथील कुंभमेळ्यात ग्रंथप्रदर्शन कक्ष लावण्याची सेवा चालू असतांना वाळलेल्या चंदनाचे तुकडे पडलेले आढळणे, त्यांतून सुगंध येणे आणि त्या तुकड्यांमध्ये दैवी कण चमकतांना दिसणे

‘प्रयागराज येथील कुंभमेळ्यात ग्रंथप्रदर्शन कक्ष लावण्याची सेवा रात्री उशिरापर्यंत चालू होती. तेव्हा मला एके ठिकाणी वाळलेल्या चंदनाचे तुकडे पडलेले दिसले. मला प्रथम वाटले, ‘लाकडाचा तुकडा किंवा भुसा पडला असावा; पण वरून तसे पडण्यासारखे काही नव्हते.’

अनेक तरुणांसाठी पू. (अधिवक्ता) हरि शंकर जैन हे ऋषितुल्य आणि आधारस्तंभ आहेत ! – पू. नीलेश सिंगबाळ, हिंदु जनजागृती समिती

वर्ष २०१६ मध्ये ‘एक भारत अभियाना’च्या अंतर्गत एका सभेच्या आयोजनासाठी मी आणि काही साधकांनी पू. हरि शंकर जैन यांच्यासोबत आयोजनाची सेवा केली. तेव्हा त्यांच्यातील उत्तम नियोजनकौशल्य, आयोजनक्षमता, समयमर्यादांचे पालन करणे, उत्कृष्ट संघटन आदी गुणांचे दर्शन झाले.

२७ मे पासून गोव्यात ‘अष्टम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’चे आयोजन ! – हिंदु जनजागृती समिती

२७ मे ते ४ जून या कालावधीत श्री रामनाथ देवस्थान, फोंडा, गोवा येथे अष्टम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन’ आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती हिंदु जनजागृती समितीचे उत्तर आणि पूर्वोत्तर भारत मार्गदर्शक पू. नीलेश सिंगबाळ यांनी येथे पत्रकार परिषदेमध्ये दिली.

वाराणसी येथील सनातनच्या सेवाकेंद्रात श्री गुरुपादुका आणि ‘श्रीं’ बीजमंत्रांंकित पदक यांची प्रतिष्ठापना !

येथील सनातनच्या सेवाकेंद्रात फाल्गुन कृष्ण पक्ष तृतीया म्हणजे २३ मार्च या दिवशी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी साधकांना अखंड चैतन्याचा स्रोत मिळावा, यासाठी महर्षि भृगु यांच्या आज्ञेनुसार परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी हस्तस्पर्श केलेल्या श्री गुरुपादुका यांची प्रतिष्ठापना करण्यात आली.

सनातन संस्थेचे कार्य उत्तरोत्तर वाढत जावो ! – श्री महंत पद्मानंद सरस्वती,उत्तरप्रदेश

सनातन संस्थेने ‘मनुष्याने जीवन कसे जगावे’, ‘कसे कर्म करावे’, ‘जन्मदिवस साजरा करावा’, या संदर्भात चांगले प्रदर्शन लावले आहे. सनातन संस्था अशीच पुढे वाढत जावो, अशी मी गंगामाता आणि श्री हनुमान यांच्या चरणी प्रार्थना करतो, असे प्रतिपादन उत्तरप्रदेश येथील नागा संन्यास बरसाना आश्रमचे तथा श्री पंच दशनाम जुना आखाड्याचे सचिव श्री महंत पद्मानंद सरस्वती यांनी १९ फेब्रुवारी या दिवशी येथे केले. 

सनातनच्या ग्रंथप्रदर्शनात मोक्षप्राप्ती करण्यासाठी साधनेविषयीची माहिती देण्यात आली आहे ! – स्वामी प्रणावपुरी महाराज, मथुरा, उत्तरप्रदेश

देशातील तरुण पिढी संस्कार आणि मर्यादा विसरून धर्म अन् संस्कृती यांच्यापासून दूर जात आहे. त्या दृष्टीने सनातनची ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ची कल्पना फार चांगली आहे. या प्रदर्शनात मोक्षप्राप्ती करण्यासाठी साधना आणि माया म्हणजे काय आहे, हे सांगितले आहे.

आझाद हिंद सेनेप्रमाणे संतसेना सिद्ध केली पाहिजे ! – महंत रघुनाथ बाबा महाराज, आगरा, उत्तरप्रदेश

सुभाषचंद्र बोस यांनी जशी ‘आझाद हिंद सेना’ सिद्ध केली होती, तशी आज संतसेना सिद्ध केली पाहिजे, असे प्रतिपादन आगरा येथील महंत रघुनाथ बाबा महाराज यांनी येथे केले. सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने कुंभनगरी येथे लावण्यात आलेले अनुक्रमे ग्रंथप्रदर्शन अन् धर्मशिक्षण फलक प्रदर्शन यांना भेट दिल्यानंतर ते बोलत होते.

देश बाह्य आणि अंतर्गत शत्रूंमुळे त्रस्त झाल्याने राष्ट्रकार्य करणार्‍या सनातन संस्थेची आवश्यकता ! – महंत रामजनमदास शास्त्री महाराज, जम्मू-काश्मीर

सध्या आपला देश बाह्य आणि अंतर्गत शत्रूंमुळे त्रस्त झाला आहे. यासाठी राष्ट्रकार्य करणार्‍या सनातन संस्थेसारख्या संस्थेची अतिशय आवश्यकता आहे. हिंदु जनजागृती समितीसुद्धा जेे कार्य करत आहे, ते कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन जम्मू-काश्मीर येथील महंत रामजनमदास शास्त्री महाराज यांनी येथे केले……….


Multi Language |Offline reading | PDF