(म्हणे) ‘मोदी पुन्हा निवडून आले, तर पुतीन यांच्याप्रमाणे विरोधकांना संपवतील !’

देशाला मेटाकुटीला आणणार्‍या पाकपुरस्कृत धर्मांधांच्या कारवाया आणि इस्लामी आतंकवाद यांविषयी मूग गिळून गप्प रहाणारे निखिल वागळे यांचा मोदीद्वेष !

पुणे येथील ‘अक्षरनामा’ संकेतस्थळाचे संपादक आणि तिचे मालक यांच्यासह लेखक निखील वागळे यांच्या विरोधात मानहानी भरपाईसाठी न्यायालयात दावा दाखल

‘अक्षरनामा’ या संकेतस्थळावर १६ ऑगस्ट २०१८ या दिवशी ‘सनातनच्या मुसक्या कोण बांधणार? ’ या मथळ्याखाली अपकीर्तीकारक लेख प्रसिद्ध करून सनातनची अपकीर्ती करण्यात आली होती.

(म्हणे) ‘शबरीमला आंदोलन म्हणजे राममंदिराचा निर्णय धर्मांध हिंदुत्ववाद्यांच्या विरोधात गेलाच, तर रस्त्यावर उतरण्याची रंगीत तालीम !’ – निखिल वागळे

शबरीमलाविषयी न्यायालयाचा आदेश धुडकावण्यात येत आहे. ही उद्याच्या राममंदिराच्या निर्णयाची सिद्धता आहे. हे आंदोलन म्हणजे राममंदिराचा निर्णय धर्मांध हिंदुत्ववाद्यांच्या विरोधात गेलाच, तर रस्त्यावर उतरण्याची रंगीत तालीम आहे

(म्हणे) ‘सनातन ही आतंकवादी संघटना असल्यामुळे तिच्यावर कारवाई झाली पाहिजे !’ – वादग्रस्त पत्रकार निखिल वागळे

‘सनातनची बॉम्ब फॅक्टरी’ सापडल्यानंतर त्यांच्यावरील ‘फोकस’ दूर करण्यासाठी या ५ कार्यकर्त्यांना (नक्षलप्रेमींना) अटक करण्यात आली. सनातनला वाचवण्यासाठी सरकार हे करत आहे. तुम्ही ‘सीमी’वर बंदी घालता, डॉ. झाकीर नाईक यांच्यावर बंदी घालता.

(म्हणे) ‘सनातन हिंदुत्ववादी आतंकवादी संघटना; गोळी घालणार्‍यांसमवेत मास्टरमाईंड जयंत आठवले यांनाही अटक करावी !’

आतंकवादाला कोणता धर्म नसतो, मग धर्म केवळ सिमीला आहे का ? सनातन संस्था हिंदु संघटना आहे, असे मी मानत नाही. ही संघटना हिंदुत्वाचा अपमान करत आहे. तिला आपण हिंदुत्ववादी आतंकवादी म्हणू शकतो.

(म्हणे) ‘ज्यांची माणूस बनण्याची प्रक्रिया पूर्ण होत नाही, ते नथुराम बनतात किंवा डॉ. जयंत आठवले बनून दंगली घडवतात !’

माणूस ज्या वेळी माणूस म्हणून जन्माला येतो, तेव्हा तो माणूस नसतो. त्याच्यात जनावराचा अंश शिल्लक असतो. आयुष्यात माणूस बनण्याची प्रकिया होते. ज्याची प्रक्रिया पूर्ण होते, ते डॉ. दाभोलकर बनतात.

(म्हणे) ‘डॉ. दाभोलकर, कॉ. पानसरे यांच्या हत्येतील संशयित सनातन संस्थेशी संबंधित असल्याने सनातनवर कायद्याने बंदी घालावी !’ – निखिल वागळे यांची सनातनविरोधी गरळओक

डॉ. दाभोलकर, कॉ. पानसरे यांच्या हत्येमध्ये सनातन संस्थेशी संबंधित संशयित सापडले आहेत. या संस्थेवर अजूनही बंदी आणली नाही.

वागळे आणि पीत पत्रकारिता !

टीव्ही ९ मराठी या वृत्तवाहिनीवरून निखिल वागळे यांचा सडेतोड कार्यक्रम बंद झाला आणि चर्चा चालू झाली. खरेतर अशा चर्चांमध्ये फार कुणाला रस नसतो; पण ज्यांना धास्ती असते, त्यांना मात्र आगपाखड करावीच लागते. पुढचा क्रमांक कुणाचा, याची धास्ती लागून रहाते.

मोदी यांच्या दबावाने ‘टीव्ही ९’ वाहिनीने ‘सडेतोड’ कार्यक्रम बंद केल्याचा निखिल वागळे यांचा कांगावा उघड !

वृत्तवाहिन्यांवर निवेदक म्हणून समतोल भूमिका न घेता तार्किक युक्तीवादाऐवजी आकांडतांडव करणारे पत्रकार निखिल वागळे यांचा दांभिकपणा पुन्हा एकदा उघड झाला आहे.


Multi Language |Offline reading | PDF