मुंबई आतंकवादविरोधी पथकाच्या २ अधिकार्‍यांना एन्.आय.ए.च्या विशेष न्यायालयातून बाहेर जावे लागले !

मालेगाव बाँबस्फोटप्रकरणी बचाव पक्षाच्या अधिवक्त्यांचा २ अधिकार्‍यांच्या उपस्थितीवर आक्षेप !

मुर्शिदाबाद (बंगाल) येथून ६ गावठी बाँब जप्त

बंगालच्या मुर्शिदाबाद जिल्ह्यातील कांदी भागामधून ६ जिवंत गावठी बाँब जप्त करण्यात आले आहेत. पोलिसांनी हे बाँब निकामी केले आहेत. या प्रकरणी अनारुल शेख याला अटक करण्यात आली आहे.

मुंबईसह महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शहरांत ‘ड्रोन’द्वारे आतंकवादी आक्रमण होण्याची शक्यता !

महाराष्ट्र राज्याच्या सायबर विभागाने याविषयी दिलेल्या अहवालामध्ये म्हटले आहे की, आतंकवादी संघटना ड्रोन, सायबर, तसेच रासायनिक आक्रमण करण्याविषयी ‘डार्कनेट’वर चर्चा करत असल्याचे म्हटले.

‘इस्लामिक स्टेट’मध्ये सहभागी होण्यासाठी गेलेल्या मुंबईतील २ धर्मांधांना ८ वर्षांचा कारावास !

असे किती धर्मांध अशा आतंकवादी संघटनांत सहभागी होण्यासाठी गेले होते आणि किती जणांना सरकारने अटक करून कारागृहात टाकले, याचीही माहिती जनतेला कळली पाहिजे !

पंतप्रधान मोदी यांच्या पंजाबमधील सुरक्षेच्या प्रकरणातील सर्व नोंदी सील करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंजाबमधील दौर्‍याच्या वेळी सुरक्षेमध्ये झालेल्या अक्षम्य चुकीविषयी सर्वोच्च न्यायालयाने प्रवासाची नोंद आणि अन्वेषण यंत्रणांना सापडलेल्या पुराव्यांना सुरक्षित ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.

कर्नाटकमध्ये इस्लामिक स्टेटशी संबंध असणार्‍या महिला जिहादी आतंकवाद्याला अटक !

इस्लाममध्ये धर्मांतर केल्यानंतर हिंदु तरुणींचे पुढे काय होते, ही स्थिती दर्शवणारे आणखी एक उदाहरण !

लुधियाना येथील बाँबस्फोटामागे खलिस्तानी आतंकवादी संघटना बब्बर खालसाचा हात असल्याची शक्यता

बंदी घालण्यात आलेली असतांनाही खलिस्तानी संघटना तिच्या कारवाया कशा काय करू शकत आहे ? काँग्रेसच्या राज्यात कायदा आणि सुव्यवस्था नाही का ?

सार्वजनिक बांधकाम खात्यात ७० कोटी रुपयांचा नोकरभरती घोटाळा झाल्याचा सत्ताधारी भाजपच्याच मंत्र्याचा आरोप !

वजन माप खात्यात भरतीच्या वेळी मंत्र्याच्या स्वीय सचिवाला लेखी परीक्षेत पैकीच्या पैकी म्हणजे १०० गुण दिल्याचा आरोप

सुधा भारद्वाज यांच्या जामिनाच्या विरोधातील ‘एन्.आय.ए.’ची याचिका सर्वाेच्च न्यायालयाने फेटाळली !

आरोपपत्र समयमर्यादेमध्ये प्रविष्ट न केल्याने मुंबई उच्च न्यायालयाने भारद्वाज यांना जामीन दिला आहे.

सरकारी निर्बंध येण्याच्या शक्यतेमुळे ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’चा लहान संस्था स्थापन करून कार्यरत रहाण्याचा प्रयत्न

डावपेचात हुशार असणार्‍या जिहादी संघटना ! केंद्र सरकारने याच विचार करून लवकरात लवकर राष्ट्रघातकी कारवाया करणार्‍या अशा संघटनांवर बंदी घालावी !