नक्षलवाद्यांच्या धमक्यांना भीक घालत नाही, विकासकामे चालूच ठेवणार ! – एकनाथ शिंदे, पालकमंत्री

जिल्ह्याचे पालकमंत्री पद स्वीकारतांना अशा धमक्या येण्याची शक्यता मी आधीच गृहित धरली होती. नक्षलवाद्यांच्या धमक्यांना मी स्वतः भीक घालत नाही. जिल्ह्याच्या विकासासाठी मी सतत प्रयत्नशील असून विकास हेच नक्षलवाद समाप्तीचे प्रमुख लक्षण आहे आणि जिल्ह्यातील नागरिकांना आता ते समजून चुकले आहे

आनंद तेलतुंबडे यांच्या जामीन अर्जावर २ आठवड्यांत उत्तर द्या !

जुलै २०२० मध्ये तेलतुंबडे यांनी जामिनासाठी केलेला अर्ज न्यायालयाने फेटाळला होता. अन्वेषण यंत्रणेने केलेले सर्व आरोप तेलतुंबडे यांनी फेटाळले आहेत.

गडचिरोली येथे नक्षलवाद्यांच्या पेरमिली दलम्चा सदस्य मंगरू मडावी याला अटक !

जिल्ह्यातील अहेरी पोलीस उपविभागाच्या अंतर्गत येणार्‍या पेरमिली क्षेत्रात गोपनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे गडचिरोलीचे विशेष अभियान राबवण्यात आले. पथकाच्या सैनिकांनी पेरमिली अरुण्य परिसरात नक्षलविरोधी अभियान राबवले. त्या वेळी रात्री पहारा देत असतांना नक्षलवाद्यांचा पेरमिली दलम्चा सदस्य मंगरू मडावी याला….

गडचिरोली येथे जहाल नक्षलवादी अजय हिचामी याला अटक !

कित्येक दशकांपासून चालू असलेला नक्षलवाद संपवू न शकणे, हे आतापर्यंतच्या शासनकर्त्यांचे अपयश !

नक्षलवादाची समस्या एका वर्षात सोडवा ! – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा

नक्षलवाद्यांच्या विरोधातील लढा आता अंतिम टप्प्यात पोचला आहे आणि त्याला जलद आणि निर्णायक बनवण्याची आवश्यकता आहे. नक्षलवाद्यांच्या हिंसाचारामुळे होणार्‍या मृत्यूंची संख्या एका वर्षात घटून २०० वर आली आहे.

केवळ एक वर्ष !

आतंकवादाला जेथून शिक्षण मिळते त्यावर आघात केला पाहिजे. अशी कुठली विचारसरणी आहे, हे उघड करून त्याविरोधात देशात चर्चा घडवून आणली पाहिजे, हे तरी सरकारने पुढील एक वर्षांत करावे, असेच राष्ट्रप्रेमींना वाटते !

नक्षलवादाविषयीच्या बैठकीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देहली येथे जाणार !

केंद्रीय गृहमंत्रालयाने बोलावलेल्या नक्षलग्रस्त राज्यांतील मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला उपस्थित रहाण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे २६ सप्टेंबर या दिवशी देहली येथे दौर्‍यावर जाणार आहेत.

मुंबई येथे ५० लाख रुपयांच्या खंडणीचे पत्र देऊन पसार झालेल्या बुरख्यातील नक्षलवादी महिलेसह दोघांना अटक !

येथील गोरेगाव पूर्व वनराई पोलीस ठाण्याच्या क्षेत्रात रहाणारे आधुनिक वैद्य डॉ. शाह (वय ७५ वर्षे) यांना पत्र पाठवून ५० लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केल्याप्रकरणी पोलिसांनी एका बुरख्यातील नक्षलवादी महिलेला अटक केली आहे.

नक्षली कारवायांच्या आरोपाखाली अटकेत असलेले वरवरा राव यांच्या वैद्यकीय जामिनात वाढ !

नक्षली कारवायांच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेले तेलगु कवी वरवरा राव यांना प्रकृती अस्वास्थामुळे मुंबई उच्च न्यायालयाने त्यांच्या वैद्यकीय जामिनाचा कालावधी वाढवून दिला आहे.

‘पांचजन्य’ मधील ‘इन्फोसिस’ विरोधी लेखाशी आमचा संबंध नाही ! – रा.स्व. संघ

पांचजन्यमधील इन्फोसिसविरोधी लेखाशी आमचा संबंध नाही, असा खुलासा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचारप्रमुख सुनील आंबेकर यांनी केला.