काँग्रेस पक्षाच्या ‘जनमानसातील शिदोरी’ मुखपत्रावर कारवाई करणार ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री

या मुखपत्रकात ‘स्वातंत्र्यवीर सावरकर हे माफीवीर होते, समलैंगिक होते, सावरकर स्वातंत्र्यलढ्यात उतरले नाहीत’, अशा अनेक आक्षेपार्ह गोष्टी प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत.

खडके (जिल्हा जळगाव) येथील शासकीय वसतीगृहातील अल्पवयीन ५ मुलींच्यावर लैंगिक अत्याचार प्रकरणी ३ जणांना अटक !

पीडित ५ मुलींनी तक्रारी केल्या आहेत. आरोपी, त्यांची पत्नी आणि वसतीगृहाच्या अधीक्षक अरुणा पंडित आणि सचिव भिवाजी पाटील यांचाही यामध्ये सहभाग आहे.

महाराष्ट्रात आदिवासी आणि मागासवर्गीय यांच्या भूमी लाटणारी टोळी कार्यरत !

अधिकार्‍यांना हाताशी धरून या भूमी हस्तगत करण्याचा प्रयत्न अनेक वर्षे चालू आहे.  मागासवर्गियांची ७/१२ नावे असणार्‍या ‘महार वतन भूमी’ आहेत; मात्र त्यांची नावे काढून दुसर्‍याच व्यक्तीच्या नावे त्या भूमी केल्या गेल्या आहेत.

सर्पदंशावरील संपूर्ण उपचार महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून करावेत !

रुग्णाला ‘व्हेंटिलेटर’वर ठेवल्याचे सिद्ध झाले, तरच महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेतून साहाय्य मिळते, हे सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. त्यावर अध्यक्षांनी असे निर्देश दिले.

मराठावाड्यातील १ लाख शेतकरी आत्महत्या करण्याच्या विचारात ! – एकनाथ खडसे, आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस  

मराठवाड्यात १०० दिवसांत १७०० शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या !

विरोधकांची ‘इंडिया’ नकोच !

देशात लोकसभेच्‍या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. सर्वच राजकीय पक्ष त्‍याची जय्‍यत सिद्धता करतांना दिसत आहेत. याचा पहिला टप्‍पा म्‍हणून सत्ताधारी आणि विरोधक आपापल्‍या पारड्यात किती राजकीय पक्षांचे वजन आहे ?

राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी द्वेषात्मक भाषणांवर निर्बंध ! – देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री

राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या जातीय तेढ, विद्वेषात्मक वातावरण निर्माण करणार्‍या भाषणांवर निर्बंध आहेत.

सरकारविरोधात विरोधकांचे आंदोलन !

या आंदोलनात राष्‍ट्रवादी काँग्रेसचे अध्‍यक्ष शरद पवार समर्थक एकाही आमदाराची उपस्‍थिती नव्‍हती. ‘विरोधी पक्षनेते पदाच्‍या निवडीसाठी काँग्रेसच्‍या नेत्‍यांची बैठक चालू झाली आहे. विरोधी पक्षनेता हा काँग्रेसचाच असेल’, असे बाळासाहेब थोरात यांनी स्‍पष्‍ट केले आहे.

विरोधी पक्षनेत्‍याविना विधीमंडळाच्‍या पावसाळी अधिवेशनाला प्रारंभ !

अजित पवार यांनी सरकारला पाठिंबा देऊन १५ दिवस होऊनही महाविकास आघाडीकडून विरोधी पक्षनेत्‍याची निवड झालेली नाही. त्‍यामुळे विरोधी पक्षनेत्‍याविनाच विधीमंडळाच्‍या पावसाळी अधिवेशनाला प्रारंभ झाला.

प्राथमिक अपेक्षा पूर्ण करण्‍यातच कलंकित सरकार अपयशी ठरले आहे ! – अंबादास दानवे, विरोधी पक्षनेता, विधान परिषद

चहापानावर विरोधी पक्षांनी बहिष्‍कार घातला आहे, असा घणाघात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी १६ जुलै या दिवशी विधानभवनात आयोजित केलेल्‍या पत्रकार परिषदेत केला.