मुंबईत आंतरराष्ट्रीय महोत्सवासाठी ‘फाऊंडेशन’ स्थापन !

मुंबईत आंतरराष्ट्रीय महोत्सवाच्या आयोजनासाठी ‘मुंबई आंतरराष्ट्रीय महोत्सव फाऊंडेशन’ गठीत करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आला.

उत्तरप्रदेशमध्ये आरोपी जोस पापाचेन आणि शिजा यांना जामीन संमत !

उत्तरप्रदेशातील आंबेडकर नगर जिल्ह्यात २४ जानेवारी २०२३ या दिवशी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या लोकांना ख्रिस्ती धर्म स्वीकारण्यासाठी आमीष दाखवल्याच्या प्रकरणी तक्रार प्रविष्ट करण्यात आली होती. 

उदयनिधी स्टॅलिन यांच्यावर ‘हेटस्पीच’चा गुन्हा नोंदवण्यात यावा ! – आनंद जाखोटिया, प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

मागील काही कालावधीत हिंदुत्वनिष्ठांवर ‘हेटस्पीच’ (द्वेषपूर्ण वक्तव्य) अंतर्गत गुन्हे नोंद झाले आहेत. सर्वाेच्च न्यायालयानेही ‘हेटस्पीट’च्या अंतर्गत गुन्हे नोंदवण्याचे निर्देश दिले आहेत.

शिवरायांची वाघनखे १६ नोव्हेंबरला लंडनहून मुंबईत ! – मुनगंटीवार, सांस्कृतिक कार्यमंत्री

छत्रपती शिवाजी महाराज यांनी ज्या वाघनखांनी अफजलखानाचा कोथळा काढला ती वाघनखे लंडनमधील ‘व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट’ वस्तूसंग्रहालयात आहेत. ती महाराष्ट्रात आणण्यासाठी इंग्लंडसमवेत सामंजस्य करार करण्यात आला आहे.

अयोध्येतील श्रीराममंदिराचे २२ जानेवारी २०२४  या दिवशी उद्घाटन होण्याची शक्यता !

पुढील वर्षी, म्हणजे २२ जानेवारी २०२४ या दिवशी येथील श्रीरामजन्मभूमीवर बांधण्यात येणार्‍या भव्य श्रीराममंदिराचे उद्घाटन होणार असल्याचे वृत्त आहे.

‘जी-२०’मध्ये जगन्नाथ मगर नैसर्गिक शेतीविषयीची यशोगाथा सादर करणार !

श्री. मगर यांनी शेतीमध्ये गायीचे शेण आणि गोमूत्र यांचा वापर केल्याने भूमीचा सेंद्रिय कर्ब वाढला.

पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारतविरोधी कारवाया करणार्‍या कुख्यात आतंकवाद्याची हत्या

जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय सुरक्षादलाच्या विरोधातील अनेक आक्रमणात अबू कासिम याचा सहभाग होता. तो पाकव्याप्त काश्मीरमधील लष्कर-ए-तोयबाच्या आतंकवाद्यांना जम्मू-काश्मीरमध्ये घुसवण्याचे काम करत होता.

काश्मीरमध्ये ५ आतंकवाद्यांना अटक

पोलिसांनी गेल्या २४ घंट्यांत एकाच वेळी ४ वेगवेगळ्या ठिकाणी आतंकवादविरोधी कारवाया करून या ५ जणांना अटक केली. त्यांच्याकडून शस्त्रसाठाही जप्त करण्यात आला.

राजस्थानच्या काँग्रेस सरकारचे बडतर्फ मंत्री राजेंद्र गुढा यांचा शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत गुढा यांनी त्यांच्या मूळ गावी पक्षात प्रवेश केला.

जम्मू-काश्मीरमधील पाक सीमेवरून भारतीय सैनिक बेपत्ता

सुरक्षा दलाकडून बेपत्ता सैनिक अमित पासवान याचा शोध घेण्याचा प्रयत्न चालू आहे; मात्र अद्याप यश आलेले नाही.