महर्षींच्या आज्ञेने रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात भावपूर्ण वातावरणात साजरा होत असलेला ‘दीपोत्सव’ !

चेन्नई येथील पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांनी रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात १३ ते १६ नोव्हेंबर या कालावधीत दीपोत्सव साजरा करण्याची आज्ञा केली. त्यानुसार १३ नोव्हेंबरपासून हा दीपोत्सव साजरा करण्यात येत आहे.

दिवाळी फटाक्यांविना साजरी होते, तर ईद प्राणी हत्येविना का नाही ? – कंगना राणावत, अभिनेत्री

कंगना यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे की, चला, दिवाळी फटाकेमुक्त (फ्री), ख्रिसमस झाडांना कापल्याविना अन् ईद प्राण्यांची हत्या केल्याविना साजरी करूया. सर्व लिबरल्स मंडळी माझ्याशी सहमत आहेत का ?

डी.एड्. अभ्यासक्रमातील ५० टक्के जागा मुसलमानांसाठी राखीव ठेवल्यावरून विहिंपची मेवात विकास प्राधिकरणाला नोटीस

हरियाणामध्ये भाजपचे सरकार असतांना अशा प्रकारची नोटीस विहिंपला का द्यावी लागते ? सरकारनेच हे आरक्षण रहित करून हिंदूंना न्याय दिला पाहिजे.

बिलीव्हर्स ईस्टर्न चर्च आणि के.पी. योहानन यांची सर्व संपत्ती जप्त करा !

राष्ट्रीय बजरंग दलाद्वारे बिलीव्हर्स ईस्टर्न चर्चच्या तिरुवल्ला मुख्यालयाजवळ निषेध मोर्चा काढण्यात आला. या वेळी के.पी. योहानन यांना अटक करून त्यांची आणि या चर्चची संपूर्ण संपत्ती जप्त करण्याची मागणी करण्यात आली.

काश्मीर खोर्‍यामध्ये ३५ वर्षांनंतर हिंदूंनी काढली धार्मिक मिरवणूक !

यापुढे जाऊन काश्मीरमध्ये हिंदूंचे पुनर्वसन करण्यासाठी सरकारने प्रयत्न करायला हवेत, असेच हिंदूंना वाटते !

बंगाल अल् कायदाचा अड्डा बनला असून काश्मीरपेक्षाही तेथे वाईट परिस्थिती ! – भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष

तृणमूल काँग्रेसच्या राज्यात ही परिस्थिती निर्माण झाली आहे आणि ती तिच्याकडून पालटली जाणार नसल्याने केंद्र सरकार हे अड्डे नष्ट का करत नाही अन् बंगालची स्थिती सुधारण्यासाठी तेथील सरकार विसर्जित का करत नाही ?, असे प्रश्‍न हिंदूंना पडतात !

हिंदु असल्याचे सांगत मुसलमान तरुणीने हिंदु तरुणाला प्रेमाच्या जाळ्यात ओढून केला विवाह !

विवाहानंतर तरुणाचे धर्मांतर आणि सुंता ! ‘लव्ह जिहाद’चे आणखी एक रूप ! हिंदु तरुण आणि तरुणी यांना धर्मशिक्षण नसल्याने ते धर्मांधांच्या प्रेमाच्या जाळ्यात फसतात. त्यामुळे त्यांना धर्मशिक्षण देण्यासाठी हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी प्रयत्न केला पाहिजे !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सिंगरौली (मध्यप्रदेश) येथे कोजागरी पौर्णिमेनिमित्त प्रवचनाचे आयोजन

कोजागरी पौर्णिमेच्या निमित्ताने हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथे विशेष ‘ऑनलाईन’ प्रवचन घेण्यात आले. या वेळी समितीचे श्री. श्रीराम काणे यांनी शरद पौर्णिमा समवेत शास्त्रानुसार कोणती साधना करणे आवश्यक आहे, या विषयावर मार्गदर्शन केले.

विवाह करण्यास नकार दिल्यावरून धर्मांधांकडून तरुणीवर चाकूद्वारे आक्रमण 

अल्पसंख्यांकांचे गुन्हेगारीत सर्वाधिक प्रमाण ! अशांना शरीयत कायद्यानुसार कठोर शिक्षा करण्याची मागणी कुणी केली, तर आश्‍चर्य वाटू नये !

हज यात्रेला जाण्यासाठी दाबोळी विमानतळ पुन्हा प्रारंभस्थळ बनवण्याची मुसलमान संघटनांची मागणी

गोव्यातून हज यात्रेला जाणार्‍यांसाठी दाबोळी विमानतळ हे प्रारंभस्थळ बनवण्याचा प्रस्ताव रहित करण्याच्या केंद्रशासनाच्या निर्णयाचा अनेक मुसलमान संघटनांनी विरोध केला आहे.