सनातनची ग्रंथमालिका : निरोगी आणि शतायुषी होण्‍यासाठी ‘आयुर्वेद’ !

‘आयुर्वेद’ या भारतीय वैद्यकशास्‍त्राचे महत्त्व पाश्‍चात्त्यांना समजले आहे; म्‍हणून ते आयुर्वेदीय औषधांचे ‘पेटंट’ घेऊ पहातात. दुर्दैवाने भारतियांना आयुर्वेदाचे महत्त्व वाटत नाही ! ‘अ‍ॅलोपॅथी’त नव्‍हे, तर आयुर्वेदात रोग मुळापासून नष्‍ट करण्‍याची क्षमता आहे. यासाठी आयुर्वेद अनुसरा !

शाळा, महाविद्यालये आदी विविध ठिकाणी हिंदु संस्‍कृती जपण्‍यास हातभार लावा !

महाविद्यालयामध्‍ये जाणार्‍या मुलींना फाटक्‍या-तुटक्‍या जीन्‍स घालण्‍याऐवजी व्‍यवस्‍थित कपडे शक्‍यतो पंजाबी पोषाख (ड्रेस) घालण्‍यास सांगा. केस मोकळे सोडण्‍यात कसली आली फॅशन ? अगदी वेणी नको; पण एखादी पिन किंवा रब्‍बर लावायला सांगू शकता ना ?

छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जाती, जात्‍यंतर्गत वैमनस्‍य आणि अहंमन्‍यता यांनी विस्‍कळीत झालेला समाज महाराष्‍ट्र धर्माकरता कोणत्‍या किमयेने एकसंधतेने बांधून ठेवला ?

तुम्‍ही ‘देवधर्मरक्षक’, ‘गोब्राह्मणप्रतिपालक’ इत्‍यादी ब्रीदे निर्भयपणाने आणि नि:संदिग्‍धपणाने मिरवूनही विभागणी का झाली नाही ? महाराष्‍ट्र धर्माकरता सहस्रोेंनी मनात किल्‍मिष आणि वैषम्‍य न बाळगता बलीदान का केले ?

९ वर्षांनी देण्यात येणारा निकाल, हे प्रशासनाला लज्जास्पद !

अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करून तिचा मृतदेह तळेगाव रेल्वेस्थानकाशेजारी टाकणार्‍या राहुल बरई, इशान कुरेशी आणि संतोष जुगदर या तिघांना न्यायालयाने मरेपर्यंत दुहेरी जन्मठेप आणि २५ सहस्र रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

वीर सावरकर उवाच !

अलेक्झांडर हा पराक्रमी होता, विजेता होता; पण जगज्जेता नव्हता ! भारतविजेता तर तो नव्हताच नव्हता ! आता जिंकण्यास जगात देश उरला नाही, अशा जाणिवेने त्याला रडू कोसळणे अशक्य होते.

राष्ट्र ही केवळ कल्पना, शब्द किंवा भूप्रदेश नव्हे – योगी अरविंद

राष्ट्र ही केवळ कल्पना, शब्द किंवा भूप्रदेश नव्हे. कोट्यवधी भारतियांच्या ऐक्यातून आणि त्यांच्या सामूहिक जाणिवांच्या संयोगातून सिद्ध होणारे ते एक चैतन्य आहे. विश्वसंस्थेच्या आरंभस्थानी असणार्‍या या आदि, अनादी आणि सनातन तत्वाचे सगुण रूप म्हणजेच राष्ट्र होय !

अनधिकृत कृत्ये होणारा मदरसा त्वरित बंद करावा, हे ग्रामस्थांना कळते, ते प्रशासनाला का कळत नाही ?

‘रुमडामळ (गोवा) येथील मदरशामध्ये अनधिकृत कृत्ये होत असल्याने हा मदरसा त्वरित बंद करावा’, अशी मागणी ग्रामस्थांनी रुमडामळ पंचायतीच्या २८ मे २०२३ या दिवशी झालेल्या ग्रामसभेत केली.

चर्चमध्ये घरे जाळायला शिकवतात का ?

२४ मे २०२३ या दिवशी ख्रिस्ती असलेल्या कुकी आतंकवाद्यांनी राज्यातील बिष्णुपूर जिल्ह्यात असलेल्या ट्रोंगलाबी येथील अनेक दुकाने, घरे आणि वाहने यांना आग लावली, तसेच गोळीबारही केला.

अजमेरमधील वासनांध मुसलमानांचा हा इतिहास लक्षात ठेवा !

‘अजमेर दर्ग्याचे सेवक आणि अन्य धर्मांध मुसलमान यांच्याकडून वर्ष १९९२ मध्ये २५० हून अधिक महाविद्यालयीन हिंदु तरुणींना ब्लॅकमेल करून त्यांच्यावर बलात्कार केल्याच्या घटना घडल्या होत्या. यांतील तरुणींना वेश्याव्यवसायात ढकलण्यात आले होते.’

प्राथमिक आरोग्यकेंद्रातील वैद्यकीय अधिकार्‍याचे रिक्त पद आणि अन्य समस्या सोडवण्यासाठी जनतेला आंदोलन करावे लागते, हे प्रशासनाला लज्जास्पद !

‘सावंतवाडी तालुक्यातील मळेवाड प्राथमिक आरोग्यकेंद्रातील वैद्यकीय अधिकार्‍याचे रिक्त पद आणि अन्य समस्या यांविषयी येथील ग्रामस्थांनी चालू केलेले दीर्घकालीन उपोषण प्रशासनाच्या आश्वासनानंतर तूर्तास स्थगित केले आहे.’