सरकारवर विश्‍वास दाखवणार्‍या जनतेसमोर मी नतमस्तक होतो ! – पंतप्रधान मोदी

वर्ष २०१४ मध्ये याच दिवशी (२६ मे या दिवशी) आम्ही भारतात पालट घडवण्यासाठी कामाला प्रारंभ केला. गेल्या ४ वर्षांत विकासाला एका चळवळीचे रूप प्राप्त झाले. प्रत्येक भारतियाने या विकासयात्रेत योगदान दिले.

जनतेच्या प्रतिदिनच्या सोयीपेक्षा स्वत:ला महत्त्व देणारे पंतप्रधान मोदी !

‘उत्तरप्रदेशातील गाझियाबाद आणि हरियाणाच्या पलवल शहराला जोडणार्‍या देहलीतील पूर्व द्रुतगती महामार्गाचे उद्घाटन करण्यासाठी पंतप्रधानांची वाट पहाण्याची आवश्यकता नाही.

वाट चुकलेल्या तरुणांकडून होणार्‍या दगडफेकीमुळे काश्मीर अस्थिर ! – पंतप्रधान नरेंद्र मोदी

वाट चुकलेल्या तरुणांकडून होणारी दगडफेक आणि उगारल्या जाणार्‍या शस्त्रांमुळे जम्मू-काश्मीर आणि देश अस्थिर होत आहे. या अस्थिरतेमधून काश्मीरच्या जनतेने बाहेर पडावे. स्वतःचा भविष्यकाळ, देश आणि जम्मू-काश्मीरचा विकास….

नेपाळविना आमचे श्रीराम अपूर्ण ! – पंतप्रधान मोदी

नेपाळविना श्रीराम अपूर्ण आहेत, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेपाळ येथे केले. ते ११ मेपासून २ दिवसांच्या नेपाळ दौर्‍यावर गेले आहेत. नेपाळच्या जनकपूर येथील जानकी मंदिरात जाऊन त्यांनी पूजा केली.

पंतप्रधानांकडे उद्घाटनासाठी वेळ नसेल, तर देहलीतील द्रुतगती महामार्ग लोकांसाठी खुला करा ! – सर्वोच्च न्यायालयाचा आदेश

उत्तरप्रदेशातील गाझियाबाद आणि हरियाणाच्या पलवल शहराला जोडणार्‍या देहलीतील ‘इस्टर्न एक्स्प्रेस वे’चे (पूर्व द्रुतगती महामार्गाचे) उद्घाटन करण्यासाठी पंतप्रधानांची वाट पहाण्याची आवश्यकता नाही.

जगातील शक्तीमान १० नेत्यांमध्ये पंतप्रधान मोदी ९ वे ! – ‘फोर्ब्स’ नियतकालिकाची सूची

‘फोर्ब्स’ नियतकालिकाने प्रसिद्ध केलेल्या जगातील सर्वांत शक्तीमान नेत्यांच्या एका सूचीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ९ वे स्थान मिळाले आहे.

इंदिरा गांधी यांच्या काळापासून काँग्रेसने गरिबांना मूर्ख बनवले ! – नरेंद्र मोदी

काँग्रेस गेल्या अनेक वर्षांपासून ‘गरीब, गरीब, गरीब’ करत आहे; पण त्यांना गरिबांसाठी काहीही करता आलेले नाही. आता त्यांनी ‘गरीब’ बोलणे बंद केले आहे

मोदींनाही नेहरूंप्रमाणे ‘बुद्ध’च हवा का ? – सामनाच्या अग्रलेखातून रोखठोक प्रश्‍न

मोदी यांना चीनच्या सीमेवर शांतता हवी आहे. पुढील वर्षी देशात लोकसभा निवडणुका होणार आहेत. निदान निवडणूककाळात चीनने कटकटी वाढवू नयेत. एकदा निवडणूक होऊन जाऊ द्या,

डोकलाम नव्हे, तर सीमेवरील तणाव दूर करणे आणि पर्यावरणातील पालट यांवर चर्चा !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चीन दौर्‍यात डोकलाम आणि चीन-पाकिस्तान आर्थिक महामार्ग यांसदर्भात थेट चर्चा झालेली नाही; मात्र सीमेवरील तणाव न्यून करणे, दोन्ही देशांच्या नेतृत्वामधील संवाद वाढवणे आणि व्यापार संबंध सुधारण्यावर भर देण्याविषयी दोन्ही नेत्यांचे एकमत झाले

डोकलामवरून मोदी चीनला खडसावणार का ? – काँग्रेसचा प्रश्‍न

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यातील चर्चेमध्ये मोदी भारताच्या रणनैतिक हितांचे रक्षण करून डोकलामविषयी चीनकडे रोखठोक विचारणा करतील का ?, अशी विचारणा काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ‘ट्वीट’द्वारे केली आहे.


Multi Language |Offline reading | PDF