अविनाश पवार यांच्या पोलीस कोठडीत २ दिवसांची वाढ

नालासोपारा येथे कथित स्फोटके सापडल्याच्या प्रकरणी घाटकोपर येथून अटक करण्यात आलेले श्री. अविनाश पवार यांना ४ सप्टेंबर या दिवशी मुंबई सत्र न्यायालयात उपस्थित करण्यात आले.

श्रीकांत पांगारकर यांच्या पोलीस कोठडीत ६ सप्टेंबरपर्यंत वाढ, तर वैभव राऊत आणि सुधन्वा गोंधळेकर यांना १५ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी

नालासोपारा प्रकरणी अटक करण्यात आलेल्यांपैकी श्री. श्रीकांत पांगारकर यांची पोलीस कोठडी ६ सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे, तर सर्वश्री वैभव राऊत आणि सुधन्वा गोंधळेकर यांना १५ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आली.

सनातन सत्यदर्शन विशेषांक !

नालासोपारा प्रकरणानंतर पुरोगामी आणि प्रसारमाध्यमे यांनी सनातन संस्थेला अन् हिंदुत्वनिष्ठ संघटनांना लक्ष्य केले आहे. या संदर्भात सनातनची सत्य बाजू मात्र ऐकून किंवा समजून घेतली जात नाही. सनातनची सत्य बाजू समाजासमोर यावी, या उद्देशाने सनातन संस्था न्यासाच्या वतीने लवकरच प्रसिद्ध करत आहोत !

अविनाश पवार यांच्या पोलीस कोठडीत ४ दिवसांची वाढ !

नालासोपारा येथे स्फोटक सापडल्याच्या प्रकरणातील घाटकोपर येथून अटक केलेले पाचवे आरोपी अविनाश पवार यांच्या पोलीस कोठडीत १४ दिवसांची वाढ करण्याची मागणी आतंकवादविरोधी पथकाने सत्र न्यायालयात केली होती

छत्रपती शिवाजी महाराजांचा निष्ठावान भक्त असणारा अविनाश गैरकृत्य करणारच नाही ! – अविनाश पवार यांचे मित्र आणि शेजारी यांचे ठाम प्रतिपादन

घाटकोपर येथून हिंदुत्वनिष्ठ अविनाश पवार यांना अटक केल्यावर ‘धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांत नेहमीच पुढाकार घेणारा अविनाश गैरकृत्य करणारच नाही’, असे त्याचे शेजारी आणि मित्र ठामपणे सांगत आहेत.

संशयित सचिन अंधुरे यांना ३० ऑगस्टपर्यंत केंद्रीय अन्वेषण विभागाची कोठडी

अंनिसचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणी अटकेत असलेले संशयित आरोपी सचिन अंधुरे यांना ३० ऑगस्टपर्यंत केंद्रीय अन्वेषण विभागाची (सीबीआयची) कोठडी सुनावण्यात आली आहे.

प्रसारमाध्यमांचे सुटलेले ताळतंत्र !

गोरक्षक वैभव राऊत यांच्या अटकेनंतर प्रसारमाध्यमांमध्ये हिंदुत्वनिष्ठांवर कठोर कारवाई झाली पाहिजे येथपासून चालू झालेली चर्चा सनातन संस्थेवर बंदी, या एकाच विषयापर्यंत येऊन ठेपली आहे. प्रतिदिन नवीन कपोलकल्पित कथा घेऊन वृत्तवाहिन्यांवरील दिवसाचा प्रारंभ होतो आणि दिवसभर सनातनचे विरोधक त्यामध्ये हात धुऊन स्वत:च्या प्रसिद्धीची हौस भागवून घेतात.

सातारा येथे हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि करंजे ग्रामस्थ यांच्या वतीने ‘हिंदुत्व सन्मान मोर्चा’ !

छत्रपती शिवाजी महाराज यांनी ज्याप्रमाणे हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, त्याप्रमाणेच आपणालाही हिंदु राष्ट्राची स्थापना होईपर्यंत प्रयत्न करायचे आहेत. डॉ. दाभोलकरांच्या स्मृतीदिनानिमित्त पुरोगाम्यांना खुष करण्यासाठी पोलिसांनी हे पाऊल उचलले आहे.

निरपराध्यांची अपकीर्ती करणार्‍या षड्यंत्राचा शोध घ्या !

डॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या प्रकरणाशी कोणताही संबंध नसतांना २३ ऑगस्ट या दिवशी तासगाव येथील श्री. सूरज पोळ आणि श्री. सचिन कुलकर्णी या दोन सनातनच्या साधकांची नावे सामाजिक संकेतस्थळ, प्रसिद्धीमाध्यमे, तसेच दूरचित्रवाहिन्या यांद्वारे समोर आणण्यात आली.

सातारा येथे सुधन्वा गोंधळेकर आणि सनातन संस्था यांच्या समर्थनार्थ १ सहस्त्राहून अधिक हिंदुत्वनिष्ठ रस्त्यावर !

नगरपालिकेशेजारील आनंदवाडी दत्तमंदिर येथून मोर्च्यास प्रारंभ झाला. ‘एटीएस् का षड्यंत्र – नही सहेंगे । नही सहेंगे ।’, ‘आम्ही सारे सनातन-सनातन’ अशा घोषणांनी मोर्चेकर्‍यांनी परिसर दणाणून सोडला होता.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now