कृत्रिम मांजा बनवणार्‍या कारखान्‍यांचा शोध घेऊन कारवाई करणार !

कृत्रिम मांजामुळे होणारे वाढते मृत्‍यू रोखण्‍यासाठी राज्‍यशासनाचा निर्णय ! मुंबई, २५ ऑगस्‍ट (वार्ता.) – पतंग उडवण्‍यासाठी वापरण्‍यात येणार्‍या कृत्रिम मांजामुळे राज्‍यात काही नागरिकांच्‍या मृत्‍यूच्‍या घटना घडल्‍या आहेत. मांजामुळे प्रतिवर्षी राज्‍यात शेकडो पक्ष्यांचा मृत्‍यू होतो. या घटना रोखण्‍यासाठी प्‍लास्‍टिक आणि सिंथेटिक धाग्‍यांची निर्मिती करणार्‍या कारखान्‍यांचा शोध घेऊन कारवाई करणारी कार्यप्रणाली राज्‍यशासनाने सिद्ध केली आहे. याविषयी २५ … Read more

जिल्‍हा परिषद शाळांच्‍या रिकाम्‍या खोल्‍या अंगणवाड्यांसाठी वापरणार 

राज्‍यातील अनेक अंगणवाड्या भाडेतत्त्वावरील खोल्‍यांमध्‍ये चालवल्‍या जात आहेत. अंगणवाड्यांना स्‍वमालकीच्‍या इमारतीसह वीज, पाणी आदी पायाभूत सुविधा दिल्‍या पाहिजेत. या अनुषंगाने ग्रामीण भागातील जिल्‍हा परिषद शाळांच्‍या रिकाम्‍या वर्गखोल्‍या अंगणवाड्यांसाठी वापरण्‍याविषयी धोरण सिद्ध करण्‍याचे निर्देश उपमुख्‍यमंत्री अजित पवार यांनी दिले.

मुंबईतील पत्रकार अधिस्‍वीकृती समितीच्‍या अध्‍यक्षपदी ‘हिंदुस्‍थान पोस्‍ट’चे दीपक कैतके यांची निवड !

पत्रकार अधिस्‍वीकृती समितीच्‍या मुंबई विभागाच्‍या अध्‍यक्षपदी ज्‍येष्‍ठ पत्रकार दीपक कैतके यांची निवड करण्‍यात आली आहे. २४ ऑगस्‍ट या दिवशी मंत्रालयात आयोजित समितीच्‍या बैठकीत ही निवड करण्‍यात आली.

नवी मुंबईतील वरिष्‍ठ पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक निलंबित !

केवळ निलंबन नको, तर बडतर्फीची कारवाई हवी !

मुंबई विमानतळावरील विमानात बाँब ठेवल्याचा दूरभाष !

संपूर्ण विमानतळाची पडताळणी करण्यात आली. तातडीने वरिष्ठ अधिकार्‍यांची बैठकही आयोजित करण्यात आली. पोलिसांनी अधिक अन्वेषण केले असता वरील प्रकार समोर आला.

‘आरोग्य आधार’ अ‍ॅपद्वारे धर्मादाय रुग्णालयांतील खाटा राखीव करता येणार ! – डॉ. तानाजी सावंत, आरोग्यमंत्री

या प्रकरणामध्ये अपप्रकार करणार्‍या संबंधितांवर कठोर कारवाई होणेही आवश्यक आहे !

समृद्धी महामार्गावरील वाढत्‍या अपघातांमुळे वाहतूक थांबवण्‍यासाठी नागपूर खंडपिठात याचिका प्रविष्‍ट

नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर वाहतुकीला अनुमती देण्‍यापूर्वी सुरक्षाविषयक उपाययोजना करण्‍यात याव्‍यात, तसेच सुरक्षिततेच्‍या समस्‍यांचे निराकरण होईपर्यंत महामार्गावरून वाहतूक तात्‍पुरती थांबवण्‍यात यावी, असे या याचिकेत म्‍हटले आहे.

‘इस्रो’ चंद्रावर पोचली, ‘अंनिस’ अजून अंधश्रद्धेच्‍या डबक्‍यातच ! – रमेश शिंदे, हिंदु जनजागृती समिती

श्री. रमेश शिंदे पुढे नमूद करतात की, प्रत्‍येक कामाचा आरंभ हा देवतेच्‍या आशीर्वादाने करणे, त्‍यातील अडथळे दूर होण्‍यासाठी प्रार्थना करणे, विधी करणे, ही हिंदु धर्मपरंपरा आहे.

अश्‍वमेध’ यज्ञाच्‍या निमित्ताने समाजात उत्तम व्‍यवस्‍था उभी करायची आहे ! – मंगल सिंह गढवाल, शांती कुंज हरिद्वार, गायत्री परिवार मुख्‍यालय

अश्‍वमेध यज्ञ म्‍हणजे सूक्ष्म जगतात देवतत्त्वाची वृद्धी करण्‍याचा प्रयोग आहे. या निमित्ताने समाजात जे चांगले लोक आहेत, त्‍यांना संघटित करणे, त्‍यांना समाजनिर्मितीच्‍या कार्यात सहभागी करून घेणे आवश्‍यक आहे.

अपात्रतेविषयी शिवसेनेच्‍या १६ आमदारांचे लेखी म्‍हणणे विधानसभा अध्‍यक्षांना सादर !

या प्रकरणी विधीमंडळाने निर्णय घेण्‍याचा निर्णय न्‍यायालयाकडून देण्‍यात आला होता. ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांनी याविषयी विधानसभेच्‍या अध्‍यक्षांनी लवकरात लवकर निर्णय घ्‍यावा, यासाठी सर्वोच्‍च न्‍यायालयात याचिका केली होती.