मराठा आरक्षणप्रश्‍नी राज्यपालांनी पंतप्रधान आणि राष्ट्रपती यांच्याशी चर्चा करावी ! – विरोधी पक्षांतील नेत्यांची मागणी

मराठा समाजात असंतोषाची भावना आणि उद्रेक होऊ शकतो. नेत्यांना मतदारसंघात फिरणे अवघड आहे. कायदा-सुव्यवस्था धोक्यात आली आहे. मराठा समाज आत्महत्या करत आहे.

मुंबई येथील काळी-पिवळी टॅक्सी आजपासून बंद होणार !

गेल्या ६ दशकांपासून मुंबईची ओळख असलेली ‘प्रीमियर पद्मिनी’ टॅक्सी ३० ऑक्टोबरपासून बंद होणार आहे. ही टॅक्सी सेवा ‘काली-पिली’ म्हणून प्रसिद्ध होती.

योजना ‘सरकार आपल्या दारी’; मात्र नागरिकांची गर्दी मंत्रालयाच्या बाहेर !

प्रशासकीय यंत्रणा अकार्यक्षम असल्यामुळे नागरिकांना मंत्रालयात जावे लागते. अशी जनताद्रोही यंत्रणा कधी तरी जनहित साधणार का ?

कुर्ला (मुंबई) येथे हुकूमशहा सद्दाम हुसेन याचे छायाचित्र असलेल्या फटाक्यांची विक्री !

आतंकवादाचे खुले समर्थन करणार्‍या हुकूमशाहाला फासावर लटकवण्यात आले; परंतु त्या क्रूरकर्मा सद्दामचे म्हणजेच आतंकवादाचे समर्थक भारतात मोठ्या प्रमाणात असणे, ही धोक्याची घंटा आहे !

मराठा समाजाला आरक्षण न दिल्यास हिवाळी अधिवेशन बंद पाडू !

मराठा समाजाला आरक्षण मिळाले नसल्याने राज्यातील गावांमध्ये नेते आणि मराठा आंदोलक यांच्यात वाद वाढत आहे. अनेक ठिकाणी नेत्यांना समाजाच्या रोषालाही सामोरे जावे लागले; मात्र आमदार नीलेश लंके यांना कोणत्याही प्रकारचा विरोध झाला नाही.

उद्योगपती मुकेश अंबानी यांना ठार मारण्याची धमकी !

एका अज्ञात व्यक्तीने त्यांना ‘इ-मेल’ पाठवून २० कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली आहे. ‘हे पैसे न दिल्यास देशातील सर्वोत्कृष्ट नेमबाजांकडून तुम्हाला मारून टाकू’, असे धमकी देणार्‍याने सांगितले आहे.

मुंबई विमानतळावरून प्रतिदिन ९७५ विमाने उडणार !

मुंबई विमानतळ प्राधिकरणाने २९ ऑक्‍टोबर २०२३ ते ३० मार्च २०२४ पर्यंत हिवाळी वेळापत्रकाची घोषणा केली आहे.

१२३ कंत्राटी कामगार बेस्‍ट उपक्रम सेवेत कायमस्‍वरूपी होणार !

उपक्रमातील ७२५ पैकी १२३ कंत्राटी कामगारांना बेस्‍ट उपक्रम सेवेत कायमस्‍वरूपी करण्‍यात येईल, असे आश्‍वासन महापालिका आयुक्‍त आणि बेस्‍ट महाव्‍यवस्‍थापक यांच्‍याकडून देण्‍यात आले.

जे करणे शक्‍य नाही, त्‍याचा शब्‍द कधीच देऊ नये ! – शरद पवार, अध्‍यक्ष, राष्‍ट्रवादी काँग्रेस

सरकारच्‍या भूमिकेमुळेच मराठा आरक्षण आंदोलनाचा प्रश्‍न चिघळला आहे. सरकारने मनोज जरांगे यांना ३० दिवसांच्‍या मुदतीत मराठा समाजाला आरक्षण देण्‍याचा शब्‍द दिला होता; पण..

ए.पी.एम्.सी. परिसरातील जागा अनधिकृतपणे बळकावणार्‍या व्‍यावसायिकांवर कारवाई !

सामासिक जागा (मार्जिनल स्‍पेस) बळकावणार्‍या ५० हून अधिक मोठ्या व्‍यावसायिकांवर नवी मुंबई महानगरपालिकेच्‍या वतीने कारवाई करण्‍यात आली.