राज्यातील सर्व साकवांची दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात येईल ! – रवींद्र चव्हाण, सार्वजनिक बांधकाममंत्री

यापूर्वी साकवांची दुरुस्ती जिल्हा परिषदेच्या द्वारे करण्यात येत होती; मात्र यापुढे साकवांची दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात येईल. त्यासाठी स्वतंत्र शीर्ष सिद्ध करण्यात येईल.

वाशिममधील ‘एम्.आय्.डी.सी.’कडील ३२१ पैकी २९४ भूखंड पडून ! – उद्योगमंत्री उदय सामंत

वाशिम जिल्ह्यात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे ३२१ भूखंड आहेत. त्यांतील २५५ भूखंडांचे वाटप करण्यात आले आहे; मात्र त्यांतील केवळ २७ भूखंडांवर उद्योग चालू आहेत, अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी २८ जुलै या दिवशी विधानसभेत दिली.

सांगलीसह कोल्हापूर जिल्ह्यातील पूर नियंत्रणासाठी उपाययोजना करणार ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

वर्ष २०१९ च्या पावसाळ्यात जुलै आणि ऑगस्ट मासांत कृष्णा खोर्‍यात अती पर्जन्यमानामुळे पूर परिस्थिती उद्भवली होती. सांगली आणि कोल्हापूर जिल्हे मोठ्या प्रमाणात बाधित झाले. या भागातील पूर नियंत्रणासाठी शासनाने सुचवलेल्या उपाययोजना कामांसाठी जागतिक बँक अर्थसाह्य करणार आहे.

समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांचे विधान

‘द काश्‍मीर फाइल्‍स’ हा चित्रपट खोट्या कथेवर आधारित आहे. मागील ३० वर्षांत काश्‍मीरमध्‍ये ७००-८०० मुसलमान मारले गेले आहेत आणि केवळ ८९ हिंदु पंडित हुतात्‍मा झाले आहेत, असे विधान समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी महाराष्‍ट्राच्‍या विधानसभेत केले.

राज्‍यभर पावसाचा जोर कायम !

मुंबई, ठाणे आणि रायगड या जिल्‍ह्यांना अतीदक्षतेची चेतावणी देण्‍यात आली आहे. यवतमाळ, पालघर, चंद्रपूर यांना ‘ऑरेंज अलर्ट’ देण्‍यात आला आहे.

खडके (जिल्हा जळगाव) येथील शासकीय वसतीगृहातील अल्पवयीन ५ मुलींच्यावर लैंगिक अत्याचार प्रकरणी ३ जणांना अटक !

पीडित ५ मुलींनी तक्रारी केल्या आहेत. आरोपी, त्यांची पत्नी आणि वसतीगृहाच्या अधीक्षक अरुणा पंडित आणि सचिव भिवाजी पाटील यांचाही यामध्ये सहभाग आहे.

महाराष्ट्रात आदिवासी आणि मागासवर्गीय यांच्या भूमी लाटणारी टोळी कार्यरत !

अधिकार्‍यांना हाताशी धरून या भूमी हस्तगत करण्याचा प्रयत्न अनेक वर्षे चालू आहे.  मागासवर्गियांची ७/१२ नावे असणार्‍या ‘महार वतन भूमी’ आहेत; मात्र त्यांची नावे काढून दुसर्‍याच व्यक्तीच्या नावे त्या भूमी केल्या गेल्या आहेत.

लाचखोर अधिकारी पुन्हा कार्यरत होतात, यासाठी कायद्यात पालट करण्याविषयी अभ्यास करणार ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

लाचखोरीच्या प्रकरणांमध्ये निलंबित केलेल्या अधिकाऱ्यांना ९ मासानंतर पुन्हा कार्यकारी पदावर नियुक्त केले जाते. त्याच पदावर येऊन ते पुन्हा अपहार करतात.

‘मोबाईल गेमिंग’च्या माध्यमातून धर्मांतर, भारताच्या सुरक्षेला धोका ! – आमदार नीतेश राणे, भाजप

सीमा हैदर ‘ऑनलाईन’ ओळखीतूनच भारतात आली. मोबाईल गेमिंगच्या माध्यमातून लव्ह जिहाद आणि धर्मांतर यांच्या धोका निर्माण झाला असून यातून भारताच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे.

अनाथ मुलांना उच्च शिक्षणातील सर्व अभ्यासक्रमांमध्ये सामावून घेऊ ! – आदिती तटकरे, महिला व बालकल्याणमंत्री

वयाची १८ वर्षे पूर्ण झालेल्या अनाथ मुला-मुलींना शासकीय नोकरीमध्ये १ टक्का आरक्षण दिलेले आहे. त्यांना नोकरीसाठी अनेक सवलतीही देण्यात आलेल्या आहेत, तसेच त्यांना सर्व उच्च शिक्षणातील अभ्यासक्रमामध्ये सामावून घेण्याचा प्रयत्न करू.